पत्रकार संरक्षण कायदा आता खरोखरच अंतिम टप्प्यात ?

0
900

त्रकार संरक्षण कायद्याचा प्रश्‍न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागेल अशी चिन्हे सध्या तरी दिसताहेत.त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहेच त्याच बरोबर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे देखील कायद्यासाठी आग्रही आहेत.पावसाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी “एक महिन्यात कायद्याचा मसुदा तयार करण्याचे” आश्‍वासन दिले होते.त्याला आता चार महिने झाले आहेत.सरकारने विधानपरिषदेत दिलेले आश्‍वासन कोणत्या स्तरावर आहे याची माहिती घेण्यासाठी आज विधान परिषद सभापती मा.श्री.रामराजे निंबाळकर यांनी विधान भवनात संबंधित आमदारांची बैठक लावली होती.या बैठकीस स्वतः रामराजे निंबाळकर,गृहराज्य मंत्री राम शिंदे,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते.”या बैठकीत उपस्थित राहून आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यावी” अशी विंनंती आम्ही सभापतीकडे केली.मात्र अपेक्षेप्रमाणे ती मान्य झाली नाही.तथापि “बैठकीनंतर आपले म्हणणे ऐकून घेऊ” असे सभापतींनी सांगितले होते.त्याप्रमाणे बैठक संपल्यानंतर सभापती महोदयांच्या दालनात स्वतः रामराजे निंबाळकर,गृहराज्य मंत्री राम शिंदे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याशी आम्हाला चर्चा करता आली.यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने एस.एम.देशमुख,किऱण नाईक तसेच मिलिंद अष्टीवकर उपस्थित होतो.या बैठकीत एक सकारात्मक बदल असा दिसला की,पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष तसेच सभापती कायद्याला अनुकुल दिसले.

यावेळी बोलताना राम शिंदे यांनी आश्‍वासन दिल्याप्रमाणे कायद्याचा मसुदा तयार आहे,तो अवलोकनार्थ मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असून येत्या अधिवेशनापुर्वी त्याला अंतिम रूप दिले जाईल असे स्पष्ट केले.”यावर मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापुर्वी तो मसुदा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला दाखवावा” अशी विनंती मी गृह राज्यमंत्र्याना केली.त्यांनी ती मान्य केली असून अधिवेशनापुर्वी हा मसुदा समितीला दाखविण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.नागपूर अधिवेसऩात कायद्यासंबंधी बिल मांडण्याते येईल असेही त्यानी सांगितले.
धनंजय मुडें यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर होता तेव्हा पासून पत्रकार संरक्षण कायद्याचे समर्थन केले असून वेळोवेळी सभागृहात आवाजही उठविला आहे..आजही ते आग्रही आहेत.”येत्या अधिवेशनात हे विधेयक येईल त्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू” असे आश्‍वासन मुंडे यानी दिले आहे तर रामराजे निंबाळकर यांनी गेली अनेक दिवस पत्रकार संऱक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे तो तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना सरकारला केल्या आहेत.कायद्याच्या मुद्यांबाबत रामराजे निंबाळकर,राम शिंदे आणि धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
सरकार आणि विरोधी पक्ष कायद्याला अनुकुल झाल्याचे दिसत असले तरी पत्रकारांमधीलच काही “झारीतील शुक्राचार्य” “पत्रकार कोणाला म्हणायचे याची व्याख्या अगोदर करा” अशी जुनीच टेप वाजवत बुध्दीभेद करीत आहेत.काहींनी मुख्यमंत्र्यांकडेही त्याबाबत नकारघंटा वाजविली असल्याचे सांगण्यात येते.
वास्तवात 1955 च्या केंद्राच्या वर्किंग जर्नालिस्ट अ‍ॅक्टमध्येच पत्रकार कोणाला म्हणायचे याची व्याख्या केलेली आहे.ती पुरेशी बोलकी आणि सुस्पस्ट आहे।
Working journalist means a person whose principal avocation journalist and (who are employes as such either whole time or part time in,or it one or more newspaper establishment) and includes an editor,a leader writer,sub-editor,feature editor,copy-tester,reporter,correspondent,news photographer and proof reader.but does not include any such person
1) Is employed mainly in a managerial or adminstrative capacity 0r
2) Being employed in a supervisory capacity,performs, either by the nature of attached to his office of by reason of the power vested in him and function managerial nature.(1955 सालच्या या व्याख्येत नंतर काही बदल किंवा दुरूस्ती झाली असेल आणि ती कोणाला माहिती असेल तर ती त्याने येथे द्यायला हरकत नाही).–
ही व्याख्या सरकारनेच केलेली असल्याने ती मान्य होण्यात कोणाला अडचण येणार नाही. या व्याख्येत इलेक्टॉनिक मिडिया अथवा ब्लॉगर आणि वेबसाईट चालविणार्‍या पत्रकारांचां उल्लेख नाही.तो उल्ल्ेख करून हीच व्याख्या गृहित धरल्यास गेली दहा वर्षे सारी चर्चा जी याच मुद्याभोवती फिरविली जात आहे ती एकदाची संपेल.कायदा आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणीही त्याला अपशकून कऱण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती.(एस एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here