मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीन पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनचा मुद्दा सातत्यानं लाऊन धरलेला आहे.आजही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत किरण नाईक यांनी पत्रकार पेन्शन आणि कायद्याबाबत होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त करीत सरकार हा कायदा कधी करणार आहे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला.त्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार आरोग्य योजना तसेच पत्रकार पेन्शन योजनेबाबतचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदाही तयार कऱण्यात आला आहे असं सांगितलं.तिनही मागण्यांबाबत पत्रकार संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद कायदा होईपर्यत याचा पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत राहणार आहेत असंही किरण नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.–