बीड येथील झुंजार नेता दैनिकाचे संपादक रत्नाकर वरपे यांच्या निधनाने बीड जिल्हा एका झुंजार पत्रकारास मुकला असल्याची प्रतिक्रिया पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
मोतीराम वरपे यांनी झुंजार नेतास जन्म दिला.मात्र त्यांच्या पश्चात रत्नाकर वरपे यांनी झुंजार नेताचा केवळ सांभाळच केला असं नाही तर झुंजार नेताला आधुनिक रूप देत जिल्हयातील नंबर एकचे दैनिक बनविले.जिल्हयातील प्रश्नांची जाण असलेला आणि जनसामांन्यांशी बांधिलकी सांगणारा संपादक आज आपण गमविला असल्याचे देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.झुंजार नेता परिवाराच्या दुःखात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद सहभागी आहोत.