नागपूर आणि पुण्यात पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या.

0
1149

पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या दोन घटना आज राज्यात समोर आल्या.पहिली घटना आहे उपराजधानी नागपूर विभागातली.पारशिवनीचे पत्रकार देवानंद शेंडे सकाळसाठी बातमीदार म्हणून काम करतात.27सप्टेंबरच्या अकांत ‘पारशिवनी येथील कोंडवाडयात तीन बकर्‍यांचा मृत्यू” या मथळ्याखाली एक बातमी प्रसिध्द झाली.त्यामुळे संतप्त झालेले पारशिवनीचे संरपंच प्रकाश डोमकी यांनी आज देवानंद शेडे यांना फोन करून अश्‍लील शिविगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या संबंधीची तक्रार त्यांनी पारशिवनी पोलिस ठाण्यात दिली आहे.प्रकाश डोमकी यांच्या भांदवी 294 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे.प्रकाश डामके यांनी पत्रकारांना धमक्या किंवा मारहाण करण्याची ही पहिलीच वेळ नाही.12 डिसेंबर 2011 रोजी पत्रकार सतीश साकोरे यांना भर चौकात मारहाण केली होती.
दुसरी घटना पुणे जिल्हयातील.मुळशी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा पुढारीचे प्रतिनिधी संतोष उर्फ किसन सोमा बाणेकरी यांनी एक बातमी छापल्याच्या रागातून त्यांना धमकीचे पत्र आले आहे.मुळशी तालुक्यातील लवळे येथील सरपंच आणि अन्य चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची एक याचिका माजी उपसरपंचांनी उच्च न्यायालात दाखल केली आहे.त्या बाबतची बातमी पुढारीच्या 31 ऑगस्टच्या अकात प्रसिध्द झाली आहे.त्याचा राग धरून खुनाची धमकी दिली गेली आहे.तसे पत्र बाणेकर यांना पाठविले आहे.या बाबतची तक्रार बाणेकर पोलिसात देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here