दबंग दुनिया या हिंदी दैनिकाचे संपादक सत्यनारायण तिवारी यांना 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.’तुम्ही सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात बातम्या देण्याचे थांबविले नाही तर तुमच्यासह संपूर्ण स्टाफला कार्यालयात येऊन गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.तुम्ही किती वाजता कार्यालयात येता आणि परत जाता याची पूर्ण खबर आम्हाला आहे’ असेही फोन कर्त्याने म्हटले आहे.या धमकीच्या फोनची तक्रार कफ परेड पोलिसांत नोंदविण्यात आली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या धमकीचा निषेध करीत असून पोलिसांनी तातडीने आरोपीला शोधून काढावे आणि त्यांना अटक करावी अशी मागणी समिती करीत आहे.अशी मागणी करणारे एक पत्रही समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.–