रायगडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस 

0
749

रायगड जिल्हयात मागच्या पंधरा दिवसात चांगला पाऊस झाल्यानं भातपिकाची लावणी पूर्ण झाली असली आणि जिल्हयातील लघुपांटबंधारे विभागाचे 28 जलसिंचन प्रकल्प  तसेच  नद्या,नाले भरून वाहत असले  तरी जिल्हयात सरासरीच्या 49 टक्केच पाऊस झाल्याने जिल्हयातही चिंतेचे सावाट कायम आहे. जिल्हयाला अद्याप .51 टक्के   पावसाची प्रतिक्षा आहे. जूनच्या आरंभी जिल्हयात जोरदार पाऊस झाला .जूनचा   कोटाही  पावसानं पहिल्या काही दिवसातच भरून काढला.  त्यामुळं शेतीची कामं  सुरू झाली होती मात्र  त्यानंतर पावसाने ओढ घेतल्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आले .  जुलै आणि ऑग्स्स्टमध्ये अधून मधून पाऊस येत गेला.त्यामुळं शेती तर  टिकली पण  पुरेसा पाऊस झालाच नाही.1 जून ते 10 ऑगस्ट या  सव्वादोन महिन्यात जिल्हयात सरासरी  केवळ 1,518  मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.   प्रत्येक्षात जिल्हयात दरवर्षी   3,142 मिली मिटर पावसाची नोंद होते.म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत  आजपर्यत 51 टक्के पाऊस कमी झालेला आहे. पावासाळ्याचा अजून अर्धा  ऑगस्ट आणि  सप्टेंबर हा  महिना आहे।  20 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा ंअंदाजही  हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळं थोडी आशा कायम असली तरी  नारळी पोर्मिमेनंतर जिल्हयातील पावसाचे प्रमाण कमी होत जाते असा अनुभव असल्याने  पाऊस आपली दरवर्षीची सरासरी गाठेल की नाही याबद्दल शेतकरी साशंक आहेत..जिल्हयात 1 लाख 15 हजार हक्टेरवर भात पिकाची तर 10 हजार हेक्टरवर नाचणीच्या पिकाची लागवड झालेली आहे. शेतीसाठी आणखी पावासाची गरज असल्याने  पुढील काळात पुरेसा पाऊस झाला नाही तर खरिपाचा हंगाम धोक्यात येऊ शकतो अशी साधार भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शोभना देशमुख अलीबाग रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here