थोडं हक्कासाठी..थोडं ..

0
1017

दोन घटना.म्हटलं तर क्षुल्लक.म्हटलं तर फार महत्वाच्या.पहिली घटना महाडची.महाडमधील पत्रकार मनोज खांबे यांनी कॉलेजच्या विरोधात बातमी दिल्याने संतापलेल्या प्राचार्यांनी कॉलेजमध्ये जागा शिल्लक असतानाही पत्रकार मनोद खांबे यांच्या मुलीस प्रवेश नाकारला .पत्रकारांना टॉर्चर करण्याचा हा एक प्रकार होता.या प्रकाराच्या विरोधात सारेच पत्रकार पेटून उठले.प्रांतांना निवेदन दिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ही दादागिरी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कानावर घातली.मग काय सूत्रं हालली.मनोज खांबे यांच्या मुलीला प्रवेश द्यावा लागला.आज तिचा प्रवेश झाला.पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीचा हा विजय आहे,असं मला वाटतं.आपण एक राहिलो तर काय होऊ शकतं याचं हे छोटसं उदाहऱण.

दुसरं उदाहरण रायगड जिल्हयातील पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकीच्या स्वभावाचं.मध्ंयंतरी पत्रकार प्रकाश काटदरेंचं अचानक निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना 70 हजारची मदत आणि मुलीच्या शिक्षणाची पुण्यात व्यवस्था करणार्‍या रायगडच्या पत्रकारांनी आज अशीच भूमिका घेत अपघाती मृत्यू झालेले वृत्तपत्र विक्रेते सुरेश केलगणे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून दिली.त्यासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे आणि त्यांच्या सहकार्‍यानी आज दिवसभर चांगलीच धावपळ केली.हक्काबद्दल जागरूकता आणि सामाजिक बांधिलकीची रायगडमधील पत्रकारांची ही दोन रूपं नक्कीच अनुकरणीय आहेत.रायगड प्रेस क्लबचे आणि सर्वसंबंधित पत्रकारांचे अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here