मिडियातील एफ डी आय वाढणार , छोटी वृत्रपत्रॆ धोक्यात

    0
    758

    देशातील माध्यमांच्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्क्यावरून 49 टक्के कऱण्याचा विचार सरकार प्राधांन्याने करीत आहे.या संबंधीच्या एका प्रस्तावावर माहिती आणि प्रसाऱण मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे.सध्या माध्यमात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के असून  केवळ सरकारच्या मान्य ते नुसार   त्यास मंजुरी दिली जाते.मात्र आता 49 टक्के परकीय गुंतवणुकीस मंजुरी दिली गेली तर अगोदरच भाडवलदारांच्या हातात गेलेला या उद्योगातून व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून माध्यमं चालविणारे  पूर्णतः हद्दपार होतील.याचं कारण बाहेरून येणारे भांडवलदार छोटया नव्हे तर मोठ्या वृत्तपत्रामध्येच गुंतवणुक करतात किवा करतील . अगोदरच आर्थिकदृष्टया सक्षम असलेली ही वृत्तपत्रे परकीय गुंतवणुकीमुळे अधिक भक्कम होतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती जिल्हा आणि विभागीय पत्रांना गिळंकृत करीत सुटतील.महाराष्ट्राचेच उदाहऱ घ्यायचे तर महाराष्ट्रात अनेक जिल्हा पत्रांनी उल्लेखनिय काम केेलेले आहे.त्यांना जनाधारही आहे.मात्र ही वृत्तपत्रे देखील साखळी वृत्तपत्रांच्या डोळ्यात खुपत असल्यानं त्याचं अस्तित्व मिटवून टाकण्यासाठी सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो आहे.भांडवलदारी वृत्तपत्रांशी स्पर्धा करू न शकलेली अनेक जिल्हा आणि विभागीय पत्रे बंद पडली आहेत.49 टक्के गुंतवणूक झाल्यास ही प्रक्रिया अधिक गतीमान होईल.त्यामुळे सरकारच्या या धोरणास विरोध झाला पाहिजे.परकीय भांडवल आल्यानं जे श्रमिक पत्रकार आहेत त्याचे पगार नक्की वाढतील पण तेथे मॅनपॉवरही कमी लागेल.त्यामुळं त्याचा लाभ बहुसंख्य पत्रकारांना होणारच नाही.26 टक्के गुंतवणुकीची सध्या मर्यादा असताना आमचा प्रजावणी असेल,जनशक्ती असेल,हिंदुस्थान असेल,ऐक्य असेल,सागर असेल,आपला महाराष्ट्र असेल,ठाणे वैभव असेल,कृषीवल असेल,ललकार असेल किंवा तत्सम जिल्हा पत्र असतील त्यामध्ये कोणी परकीय भांडवलदाराने गुंतवणूक केल्याचे आमच्यातरी ऐकिवात नाही.गुंतवणूक झालीय ती मोठ्या मिडिया ग्रुपमध्ये.यापुढेही असेच होणार असल्यानं छोटया वृत्रपत्रांचे अस्तित्व नक्कीच धोक्यात येणार आहे आणि माध्यमं केवळ मुठभर भांडवलदारांच्या हाती जाऊन ते देशाचं भाग्य ठरवायाला लागतील.सत्तेवर नियंत्रण ठेवतानाच आपल्या हितसंबंधांना ही भांडवलदारी पत्रे प्राधान्य देणार हे वेगळे सांगायला नको.लोकहिताच्या गोष्टींना अशा वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर स्थान असणार नाही.त्यामुळे हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. विरोधात असताना भाजप माध्यमातील परकीय गुंतवणुकीस विरोध करीत होता.परकीय सस्कृतीचे आक्रमण होईल अशी भिती तेव्हा भाजपचे धुरीन व्यक्त करीत .सत्तेवर आल्यानंतर भाजपनं आपल्या अनेक भूमिका बदलल्या आहेत तशीच या बाबतची भूमिकाही बदलली आहे.ती देश हिताची नाही

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here