नानांचा सागर

0
1272

नानांचा सागर 

मराठवाडयात अनंतरावांच्या दैनिक मराठवाडाचं जे स्थान होतं,सोलापुरात रंगाण्णांच्या संचारचं जे स्थान होतं,अमरावतीत मराठेंच्या हिंदुस्थानचं जे स्थान होतं नाशिकात पोतनिसांच्या  गावकरीचं जे स्थान होतं,आणि जळगावात जे जनशक्तीचं स्थान होतं तेच स्थान कोकणात सागरचं होतं आणि आहे.स्वातंत्र्यांच्या आसपास या साऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनी आपआपल्या भागात लोकप्रबोधनासाठी दैनिकं काढली आणि ती अत्यंत निष्ठेनं,प्रामाणिकपणे चालवत मोठा जनाधार मिळविला.भांडवल नाही,नेहमीच विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागलण्यानं राजाश्रय नाही तरीही ही सारी पत्रं दीर्घकाळ  चालली आणि त्यानी  आप- आपल्या  भागात आपल्या नावाचा दबदबा निमार्ण केला.सागरची कथा याच वळणानं जाणारी आहे. एक काळ असा  होता की ,कोकणात अंक पाठविण्याच्या सोयींपासून ते चांगल्या संपादकीय स्टाफ पर्यंत  साऱ्याच गोष्टींची वानवा असायची.टेलिफोन आणि टेलिप्रन्टरही पावसाळ्यात आठ आठ दिवस बंद असायचे.अशा प्रतिकूल वातावरणात दैनिक सुरू कऱणं ते जिद्दीनं चालविणं आणि आजच्या जीवघेण्या स्पधेतही  ते पन्नास वर्ष  टिकविणं हे शुभेच्छा म्हणून मोकळं व्हावं एवढं सोपं काम नाही.निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी यांनी सागरच्या रूपानं हे करून दाखविलं आहे.मी चुकत नसेल तर तालुक्याच्या ठिकाणाहून प्रसिध्द होणारं सागर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिलं दैनिक असावं.नानासाहेब कोणत्या पक्षाचे होते किंवा आहेत यापेक्षा त्याचं दैनिक हे कोकणच्या जनतेचं दैनिक होतं. या पत्राचा पक्ष कायम विरोधी पक्ष राहिलेला आहे .  कोकणच्या हिताचा प्रश्न कोणताही असो नानांनी तो प्राधान्यानं हाती घेतला आणि त्यासाठी प्रस्थापित वर्गाशी  चार हातही केले.नाना स्वभावानं मृदु असले तरी त्यांची लेखणी तेवढीच कडक आहे.विशेषतः कोकणच्या हिताचा कोणताही प्रश्न असो नाना त्याबाबत नेहमीच आक्रमक आणि आग्रही  असतात.भूमीपूत्रांचा,शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा कोकणाचा निसर्ग  उखडून टाकत तेथे केमिकलचे काऱखाने उभे कऱण्याची लागलेली स्पर्धा  असेल या साऱ्याला सागरनंं एक भूमिका म्हणून नेहमीच विरोध केला.कोकणातले पुढारी कोकणच्या प्रश्नावर राजकारण सोडून कधी एक झाल्याचे उदाहरण नाही,परंतू कोकणच्या प्रश्नावर जनतेला एक करण्याचे काम नेहमीच सागरनं केलं आहे यात शंकाच नाही.पत्रकारांसाठी तर सागर हे विद्यापीठ राहिलेले आहे.कोकणातून पुढं मुंबईला येऊन नाव कमविलेल्या  अनेक पत्रकारांनी पत्रकारितेची अद्याक्षरे सागरमध्येच गिरविलेली आहेत .कोकणातील साहित्य चळवळ असो,शैक्षणिक क्षेत्रात काम कऱणारी मंडळी असो की,पयार्वरणवाली मंडळी असेल या सवार्ंना सागरचा नेहमीच आधार वाटत आलेला आहे.सागरनं अनेकांना मोठं केलं,अनेकांना उभं केलं आणि कित्येकांना नवं बळ दिलं हे सागरचे विरोधकही मान्य करतील.

नाना जोशी स्वतः राजकारणी असले तरी ते सिध्दहस्त लेखक आहेत.दर आठवडयाला प्रसिध्द होणारा त्यांचा “प्रवाह” हा काॅलम म्हणजे कोकणचा आरसा .कोकणातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडीचं प्रतिबिंब प्रवाहमध्ये उमटत असतं.पत्रकारांच्या नजेरूतून सुटलेल्या अनेक गोष्टीची दखल प्रवाहमधून घेतली जाते त्यामुळंच प्रवाहचा एक मोठा वाचक वगर् कोकणात आहे.”एखादा आठवडा प्रवाह आला नाही तर चुकल्यासारखं वाटतं” असं म्हणणारे अनेक वाचक आजही आहेत.ही अतिशयोक्ती नाही,वस्तुस्थिती आहे. .आजही महाराष्ट्रात जी दैनिकं अग्रलेखांसाठी वाचली जातात त्यात कोकणातील सागरचा नक्कीच समावेश करावा लागेल.आज स्पधार् वाढलीय,भांडवलदारी आणि साखळी वृत्तपत्रं जिल्हा आणि स्थानिक दैनिकं गिळंकृत करीत निघाली आहेत.अशा वातावरणातही नानांचा हा एकखाबी सागर ताठ मानेनं व्यवस्थेच्या विरोधात लाटा निमार्ण करण्याचं काम पुवीर्च्याच तेजानं करीत आहे.म्हणून मला नेहमीच सागरचं अप्रुप वाटत आलेलं आहे.कोकण म्हणजे निसगर्,कोकण म्हणजे सुंदर समुद्र किनारे,कोकण म्हणजे चवदार  मासळी तसंच कोकण म्हणजे चिपळूणचा सागर हे समीकरण आजही कायम आहे.स्पधेर्त टिकून सागर आजही नव्या पिढीसाठी दीपस्तंभाचं काम करीत आहे हे नक्की.कोकणात नंतरच्या काळात अनेक गल्लाभरू दैनिकं सुरू झाली.त्यांनी कोकणातील शुध्द पत्रकारिता प्रदुषित कऱण्याचं काम केलं,मात्र सागरनं मातीशी नातं सागणाऱ्या आपल्या भूमिकेशी कधीही प्रतारणा केली नाही किंवा गल्लाभरूंच्या स्पधेर्त स्वतःला लोटून दिलं नाही.सागर ने आपलं वेगळे पण कायम जपले . त्यामुळंच नानांचा सागर ही सागरची अोळख आजही कायम आहे.

मला नेहमी वाटतं महाराष्ट्रात जिल्हा वृत्तपत्रांनी त्या त्या जिल्हयाच्या विकासात पार पाडलेली भूमिका,दिलेलं योगदान नक्कीच विसरता येण्यासारखं नाही.त्यामुळंचं जी जुनी वतर्मानपत्रं आहेत ती टिकली पाहिजेत यासाठी शासनानं त्यांना काही मदत केली पाहिजे.मराठवाडा बंद पडला त्याचं दुःख मराठवाड्यातील जनता आजही विसरलेली नाही.इतर दैनिकाच्या बाबतीत तरी अशी वेळ येऊ नये त्यासाठी त्यांना राजाश्रय मिळाला पाहिजे असं वाटतं.सागर आज पन्नास वषार्चा झाला.सागरची ही पन्नास वषार्ची वाटचाल खडतर होती.यापुढील काळ सागरसाठी सुखाचा ठरावा आणि सागर वषार्नुवषेर् जनतेची सेवा करीत राहो एवढीच सुवणर् महोत्सवी शुभेच्छा. (एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here