मथळे बोलतात..

0
925

मथळे बोलतात..

एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा मथळा देताना  केवळ उपसंपादकच नव्हे तर चीफसब आणि वृत्तसंपादकाचा ही  कस लागत असतो.मथळा थोडक्यात,लगेच बोध होणारा,आणि वाचकांचं लक्ष वेधून घेणारा असावा लागतो. मथळे देताना संपादकांना आपल्या धोरणानुसारही त्याची मोडणी करावी लागते.काल मुंबापुरीत जोरदार पाऊस झाला.महानगरी बंद पडली.आज या घटनेचे सर्वच  वतर्मानपत्रांनी आपआपल्यापरीनं वैविध्यपूर्ण  मथळे देण्याचा प्रयत्न केला आहे.इंग्रजी दैनिकांपेक्षा मराठी दैनिकांनी दिलेले मथळे मोजक्या शब्दातले,घटनेचं गांभीयर् दाखविणारे आणि परिणामकारक झाले आहेत.त्यातील महत्वाच्या दैनिकाचे आज अाॅनलाईवर दिसलेले मथळे असे.

पुढारीनं आमची तुंबई असं शिषर्क आपल्या बातमीला दिलं असून तुबईला दिलेला भगवा रंग मुंबई सेनेच्या ताब्यात आहे हे दाखविणारा आहे.लोकमतं मोठ्या फोटोवर मुंबापूर असा मथळा देऊन परिस्थितीचे गांभीर्य  निदशर्नास आणण्याचा प्रयत्न केलाय.मुंबईकरांना मेगाब्लाॅक हा शब्द अोळखीचा आणि नेहमीच अनुभवावा लागणारा असल्यानं महाराष्ट्र टाइम्सनं आजची बातमी देताना त्या शब्दाचा जवळ जाणारा मेघाब्लाॅक असा शब्द प्रयोग केला आहे. लोकसत्तानं मुंबई बुडितखाती असं हेडिंग देताना मुंबईला कोणी वाली राहिला नसल्याचं सूचित केलंय.सकाळची भूमिका सर्वानाच  माहिती आहे.आपल्या भूमिकेला अनुसरून बातमीचा मथळा देताना सकाळनं आता नेत्यांना बुडवा असा शब्दप्रयोग केला आहे.प्रहारनं धुवाधार पावसानं मुंबईची दैना असं काहीसं जुन्या वळणाचं हेडिंग दिलं आहे. मुंबईवर अनेक वर्ष राज्य  करणाऱ्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाची बातमी आणि शिषर्क काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती.सामनानं आपल्या धोरणानुसार मुंबईत काल जे काही घडलं त्याचं खापर निसगार्वर फोडलं आहे.सामनाचं हेडिंग पावसाचा अतिरेकी हल्ला असं दिलं आहे.हिंदीत नवभारत टाइम्सनं २४ घंटे मे पानी पानी हो गई मुंबई असा मथळा दिलाय.

 इंग्रजी वतर्मानपत्रांची शिषर्कही चांगली आहेत.इंडियन एक्स्प्रेसनं Rain Cripple Mumbai Again   असं हेडिंग दिलं आहे. हिंदुस्थान टाइम्सनं Mumbai Marroned,Paralysed   असं हेडिंग सजवलं आहे तर टाइम्स आॅफ इंडियानं थोड लांबलचक Highest 24 Hr.june Rain Since 2005 Drowns City  असं हेडिंग दिलं आहे.
 आपल्या कौशल्याचा,अनुभवाचा वापर करून दिल्या गेलेले हे सारेच मथळे परिस्थितीचे गांभीर्य  दाखवून देतात.दोन काॅलमच्या अग्रलेखानं जी परिणामकता साधता येणार नाही ती परिणामकता या मथळ्यांनी साधली आहे.सवर्च संपादकांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here