पत्रकारांवरील हल्ले 2016 (80)
हिंगोली,27 जानेवारी 2016
हिंगोली येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांच्यावर कोळसा येथील यांत्रेत व्यश्याव्यवसाय करणार्या महिलांनी हल्ला केला.व्यश्याव्यवसायाच्या विरोधात उपोषण कऱणार्यांची भेट घेऊन परतत असताना काही महिलांनी त्यांच्यावर हा हल्ला केला.या हल्लयाचा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.
नासिक ०५ फेब्रु वारी २०१६
मैत्रियचे एजंट्सकडून नाशिकचे पत्रकारांवर हल्ला व मारहाण महाराष्ट्र टाइम्सचे पंकज चांडोले, दिव्य मराठीचे प्रदीप मोरे व.न्यूज नाईनचे इस्हाक कुरेशी यांना मारहाण. जाहीर निषेध
गंगाखेड दिनांक 09-02-2016
परभणी जिल्हयाच्या गंगाखेड तालुक्यातील रानी सावरगाव येथील गाववालाचे प्रतिनिधी सुरेश सालमोटे यांनी विरोधात बातमी छापल्याबद्दल पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.या प्रक ाराचा निषेध करीत आहोत.-
मुंबई- दिनांक 18-02-2016
न्यूज 24चे मुंबईतील प्रतिनिला रिपोर्टिंग करायला गेला असताना सायन हॉस्पिटलच्या बाऊन्सरनी मारहाण केली.त्याचा कॅमेरा काढून घेतला.याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.
नांदेड दिनांक 21 फेब्रुवारी 2016
नांदेड येथील वीरशैव समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस झी 24 तासचे कॅमेरामन संजय सूर्यवंशी यांना मारहाण .निषेध
मुबईः दिनांक 25-02-2016
तुरूगातून सुटल्यानंतर सुनील दत्त सिध्दीाविनायकाच्या दर्शनासाठी येत असताना त्याचे छायाचित्र घेण्यासाठी तेथे जमलेल्या विविध माध्यमांच्या छायाचित्रकारांवर पोलिसांनी हल्ला केला.त्यांना पोंगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला
घाटकोपर दिनांक 2 मार्च 2016
विरोधात बातमी छापतो म्हणून दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्या भावावर हल्ला.घाटकोपरच्या भटवाडीमधील घटना.7 गुडांनी लाठी आणि दगडाने मारले.जखमीला राजवाडी मधील रूग्णलयात दाखल केले.घाटकोपर पोलिसात गुन्हा दाखल-
जत दिनांक 4 मार्च 2016
जत येथील टीव्ही रिपोर्टर हरिश शेटे यांना सुभाष कोळी यांच्यासह जमावाने मारहाण केली.कॅमेरा फोडला.कोतवाल सुभाष कोळी यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या रंगीत पार्टीच चित्रिकऱण करताना शेटे याना मारहाण करण्यात आली. एका बाजुला पाण्यासाठी आंदोलन करणार्या दुष्काळग्रस्तांच्या उपोषणासमोरच ही ओली पार्टी सुरू होती.रात्री 10 वाजता ही घटना घडली.
. भोकरदन दिनांक 08-03-2016
भाकरदन तालुक्यातील वालसा वडा येथील पत्रकार गजानन राऊत यांनी सकाळमध्ये दिलेल्या बातमीचा राग धरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.रात्रीच्या वेळेस काही जण त्यांच्या घरी आले आणि त्यांना मारहाण केली,गावातील अन्य लोकांनी त्यांची सुटका केली.याविरोधात तक्रार करण्यात आली आहे
घाटकोपर दिनांक 08-03-2016
घाटकोपरच्या एमजी रोडवर सराफा व्यापार्यांच्या मोर्चाचे कव्हरेज करणाऱे पत्रकार मनोज कुलकर्णी यांना गुलबाचंद झवेरी दुकानाचे मालक यांनी शिविगाळ आणि मारहाण केली.याची तक्रार टिळकनगर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी एन.सी.दाखल केली आहे.
चंद्रपूर दिनाक 08-03-2016
चंद्रपूर येथील तुकुम परिसरातील एका उच्च प्राथमिक शाळेत बातमी संकलीत कऱण्यासाठी गेलेल्या एका प्रादेशिक वृत्त वाहिनीचे पत्रकार निलेश डहाट यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली आहे.याची तक्रार दुर्गापूर पोलिसांत करण्यात आली असून अॅड.खनके यांचयविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आङे
.पथराड जि.जळगाव दिनांक 15-03-2016
धरणगावा तालुक्यातील पथराड येथील लोकमतचे वार्ताहर भगवान मराठे यांच्यावर चाकू हल्ला कऱण्यात आला.हल्लायचे कारण नक्की समजू शकले नाही.पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे.
पुणे दिनांक 16-03-2016
लॉर्ड बुध्दा वाहिनीचे वार्तार निशिकांत कांबळे यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्काबुक्की केली.बंडगार्डन पोलिसांनी मारहाण केल्याचे कांबळे यांनी सांगितले.
मुंबई दिनांक 18 मार्च 2016
एबीपी माझाचे वार्ताहर ऋुत्विक भालेराव यांना कुर्ला स्टेशनवर पोलिसांची मारहाण
औंरंगाबाद दिनांक 18 मार्च 2016
औरंगाबाद येथील दीव्य मराठीचे पत्रकार दिनेश हरे यांना औरंगाबादहून वडिगोद्रीला जाताना कंन्डक्टरने केली मारहाण
अहमदनगर दिनांक 19 मार्च 2016
अहमदनगर येथील छायाचित्रकार समीर मन्यार यांना छायाचित्र घेताना धक्काबुक्की,दमदाटी.जिल्हा रूग्णालयात हा प्रकार घडला.या संबधीची लेखी निवेदन वरिष्ठांना दिले गेले आहे.
उल्हासनगर दिनांक 20 मार्च 2016
उल्हासनगरमधील मी मराठीचे पत्रकार अजय दुधाणे यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली.पवई चौकात लागलेल्या आगीचे वृत्तसंकलन करताना हा प्रकार घडला
औराद शहाजनी दिनांक 22 मार्च 2016
औराद येथील पुण्य नगरीचे पत्रकार दीपक थिटे यांच्यावर रेती माफियाकडून हल्ला.पुण्यनगरीत रेती माफियाबद्दल बातमी आल्यानंतर कलेक्टरांनी रेती उत्खनन बंद पाडले त्यामुळे चिडून हा हल्ला केला गेला.पोलीसात तक्रार.
शिरूर दिनांक 29 मार्च 2016
पुणे जिल्हयातील शिरूर येथील पत्रकार आप्पासाहेब ढवळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिविगाळ केली.गुन्हयाची माहिती घेण्यासाठी ढवळे पोलिस ठाण्यात गेले असता हा प्रकार घडला.प्रकाश नेटके या पोलिस कर्मचार्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पत्रकारांनी आज लाक्षणिक उपोषण केले.
आष्टी (जि,बीड) दिनांक 07-04-2004
आष्टी येथील सकाळचे पत्रकार अनिरूध्द धर्माधिकारी यांच्यावर आज वकिल हंबर्डे यांनी हल्ला केला.यावेळी देशपांडे यांच्या बंधूंनाही मारहाण केली गेली.बातमी का दिलीस म्हणत हा हल्ला केला गेला.या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मालेगाव दिनांक 08-04-2016
मालेगावयेथे निर्माण झालेल्या तणावाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले लोकमतचे वार्ताहर प्रवीण साळुंखे यांच्यावर जमावाचा हल्ला
बीड दिनांक 12-04ृ2016
पत्रकाराला वकिलाने केलेल्या मारहाणीची घटना ताजीच असताना बीड येथील लोकपत्रचे वार्ताहर अनिल घोरड यांना एका शिक्षकाने मारहाण केली आहे. सहलीची बातमी का दिली म्हणून ही मारहाण केली गेली आहे.
.मालवण येथील पुढारीचे प्रतिनिधी परेश राऊत यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला.त्यांच्यावर सुरीचे वारही कऱण्याचा प्रयत्न झाला.चेतन ज्ञानेश्वर मुळेकर हा व्यक्तीने हा हल्ला केल्याचे राऊत यांनी मालवण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
.नेरूळ येथील दीपिका बार वर पोलिसांनी कारवाई केली आहे.त्याची बातमी घेण्यासाठी नवी मुंबई आवाजच्या प्रतिनिधीवर हल्ला केला गेला.त्यांचे अपहरणही करण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणाची तक्रार नेरूळ पोलिसात दाखल दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सकाळचे बातमीदार आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष शाळीग्राम यांच्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयात हल्ला करण्यात आला.बातमीसाठी ते शिक्षण आयुक्त कार्यालयात गेले असताना शिरसट नावाच्या इसमाने हा हल्ला केला..या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
खामगावःदिनांक 21 एप्रिल 2016
खामगाव येथील पत्रकार काका रूपारेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.बातमी छापल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला.रूपारेल यांच्या कार्यालयासमोरच हा हल्ला झाला.रूपारेल यांच्या पायाला मार लागला आहे.रूपारेल यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झालेला होता.हल्लयाचा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती देखील याचा – निषेध करीत आहे.-
बीड दिनांक 26 एप्रिल 2016
बीड येथील शासकीय रूग्णालयातील 4 रूग्णांचे डोळे गेले.त्यांना अंधत्व आले.याची बातमी घेण्यासाठी गेलेले लक्ष्मीकांत रूईकर,सामचे विकास माने आणि सामनाचे उदय जोशी यांना नेत्र विभाग प्रमुख संजय पाटील आणि त्यांचा सहाय्यक राजू नरवडे यांनी धक्काबुक्की केली.त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना खोलीत कोंडण्याचाही प्रयत्न झाला.
कोल्हापूर दिनांक 3 मे 2016
येथील टीव्ही-9 चे प्रतिनिधी अमोल पांढरे आणि सुनील काटर यांना चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्थेत मारहाण केली गेली.3 मे रोजी काही माहिती घेण्यासाठी ते संस्थेत आले असता त्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली गेली.भारत रामकृष्ण खराटे आणि इतरांनी ही मारहाण केल्याची तक्रार पत्रकारांनी पोलिसात दाखल केली असून खराटेच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.त्यानंतर गैरसमजातून ही मारहाण झाल्याने आपण पत्रकारांची माफी मागतो असे लेखी पत्र खराटे यांनी दिले आहे.-
पेठ दिनांक 13 मे 2016
पेठ तालुक्यातील पत्रकार राजेंद्र तख्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला.पोलिसात तक्रार दाखल-
इंदापूर पुणे दिनांक 13 मे 2016
भीमा नदीतून होणारा बेकायदेशीर वाळू उपश्याची बातमी आणि छायाचित्र टिपण्यासाठी नदीकाठी गेलेले पत्रकार भारत पांडुरंग शेडगे ( रा.कालठाण) यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला. अण्णासाहेब उर्फ बच्चन शिवाजी धोत्रे यांनी हल्ला केला.
फुलसावंगी दिनांक 13 मे 2016
फुलसावंगी येथिल दै. देशोन्नतीचे युवा पत्रकार तानाजी शिंदे यांच्यावर गुटखा माफियाचा भ्याड हल्ला. LCB पथकाने शेख फैजान शेख खुर्शिद याचेकडून १८ हजार १९५ रू चा अवैध गुटखा विक्री करतांना पकडला होता. 3 मे रोजी की कार्यवाही झाली होती. पत्रकार तानाजी शिंदे यांनी या कारवाई बाबत बातमी देशोन्नती मधे प्रकाशित केली होती. बातमी का प्रकाशित केली म्हणून या गुटखा माफियाने शिंदे यांच्यावर आज हल्ला केला. दुकानात घूसून त्याने शिंदे यांना लाकडी बडग्याने अमानुष मारहाण केली. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. घटनेची तक्रार महागाव पोस्टे ला दाखल केली असून तानाजी शिंदे यांना medical साठी रवाना करण्यात आले आहे.
शिरोळ येथे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा रक्षकाकडून छायाचित्रकारास मारहाण.पाटील यांच्याकडून दिलगिरी मात्र पत्रकार संघाकडून निषेध
मुंबई दिनांक 18 मे 2016
ताज हॉटेल कर्मचाऱ्याची प्रेस फोटोग्राफरला मारहाण. ऍपल CEO टीम कुकचे फोटो काढताना केली मारहाण. मारहाणीच्या निषेधार्थ टीवी पत्रकार+फोटोग्राफर यांची ताज हॉटेल बाहेर निदर्शने आणि ठिय्या आंदोलन
पोलादपूर दिनांक 19 मे 2016
येथील पत्रकार अनिल मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला.हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी बातमीच्या रागातून हा हल्ला झाल्याचे समजते.11 मे रोजी ही घटना घडल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली नाही.
25 मे 2016 सोलापूर
सोलापूर येथील एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला पोलिसांची मारहाण.
खापरखेडा दिनांक 25 मे 2016
खापरखेडा येथील तरूण भारतचे पत्रकार श्रीकांत जालंधर यांच्यावर कोलमाफियांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
भिवंडी दिनांक 5 जून 2016
येथील इनाडू इंडिया न्यूज पोर्टलचे संपादक सिध्दार्थ कांबळे यांनी भिवंडीतील कोनगाव येथील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या बांधकामाची बातमी प्रसिध्द केल्यामुळे भूमाफियांनी त्यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांना धक्काबुक्की केली.या प्रकरणी कोनगाव पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आहे.
बारामती 5 जून 2016
बारामती येथील एका खासगी सावकाराने आपल्या आसामीला मारहाण केली.त्याचे चित्रिकरण करताना एका पत्रकारावर हल्ला केला
तेर जि.उस्मानाबाद दिनांक 6 जून 2016
तेर येथील सामनाचे वार्ताहर विजय कानडे यांना निकृष्ट बांधकामाची बातमी का दिलीस असे म्हणत राष्ट्रवादीचे पुढारी तसेच ठेकेदारानी मारहाण केली.कानडे जखमी झाले आहेत.आरोपींच्या विरोधात ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरगणा जि.नाशिक दिनांक 6 जून 2016
सुरगणा येथील दैनिक सकाळचे पत्रकार मंगळु गोविंदा चौधरी यांच्यावर हल्ला करण्यात आला.त्यात ते जखमी झाले आहेत. सुभाष रामू चौधरी आणि जगन सीताराम चौधरी यांनी आपल्यावर हल्ला केल्याची चक्रार मंगळू गोविंदा यांनी केली होती.त्यानुसार सुरगणा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पुढारीचे पत्रकार नाथाभाऊ उंदरे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्या नजिक मांजरी येथील मटक्याच्या धद्याचे फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांना गुंडांनी शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्या.या प्रकरणी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे,
वाठोडा येथील पत्रकार गजानन खोपे यांना त्यांच्या घरात घुसून दारू विक्रेत्यांनी मारहाण केली.त्यात ते जखमी झालेत.दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली होती.त्याची टीप खोले यांनी दिल्याच्या संशयातून हा हल्ला केला गेला.आरोपी फरारी आहेत.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या टॅक्सी चालकांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.ओला आणि ओबरच्या टॅक्सी सेवेवर निर्बंध आणण्याची मागणी करणार्या टॅक्सी चालकांनी या कंपन्यांच्या काही गाड्याची ंमोडतोड तर केलीच त्याच बरोबर तेथे असलेल्या झी मिडिया आणि इंडिया टीव्हीच्या गाड्यांची मोडतोड केली.तसेच तेथे छायांकन करणार्या काही छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.
मुंबई दिनांक 29 जून 2016
झी चोवीस तासचे कॅमेरामन अमित गिरी यांना दादर पुर्व रेल्वे स्टेशन बाहेर शरद रसाळ नावाच्या ट्रॅफिक पोलीसाने केली धक्काबुक्की … ब्लु टॅक्सी गॅंग स्टोरी करत असताना … कॅमेरामनला केला मज्जाव केला. अणि स्टेशन बाहेरील चौकीत बसवून ठेवले… चॅनल आयकार्ड दाखवल्यावर देखील सोडले नाही … एवढचं नाही तर, टॅक्सीवाल्यांची स्टोरी का करतो ते मारतील असं १०-१५ टॅक्सी वाल्यांसमोर सांगून टॅक्सीवाल्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला…
येथील एका शाळेत मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचारानंतर तेथे उसळलेल्या जनक्षोभाची बातमी घेण्यासाठी गेलेले टीव्ही-9चे प्रतिनिधी विवेक गावडे आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी मनोज जैस्वाल यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला.छायाचित्रण कऱणार्या कॅमेर्यांचीही मोडतोड करण्यात आली.
पुणे दिनांक ३ जून 2016
पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका बातमीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी यांची बाजू समजून घेण्यासाठी एसआरएच्या कार्यालयात गेलेले महाराष्ट्र वन न्यूज चॅनलचे अश्विनी डोके आणि नितीन नगरकर यांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की तर केलीच शिवाय त्यांना तब्बल पाऊणतास डांबुन ठेवले गेले. त्याना अर्वाच्य भाषेत शिविगाळही करण्यात आली.पत्रकारांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पत्रकारांची सुटका केली गेली.
पुणे दिनांक ३ जून 2016
पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका बातमीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी यांची बाजू समजून घेण्यासाठी एसआरएच्या कार्यालबातमीत नाव छापले नाही म्हणून पत्रकारावर हल्ला
पुणे जिल्हयातील दौड येथील पत्रकार अब्बास शेख यांनी वीज चोरीबाबतची बातमी प्रसिध्द केल्यानंत महावितरणने संबंधित ग्राहकाची वीज चोरी पकडली.पत्रकारामुळेच आपण पकडले गेलोचा राग मनात धरून अब्बास शेख यांच्यावर हल्ला केला गेला.या हल्ल्यात त्यांचा भाऊ आणि चुलताही सहभागी झाले होते,.त्यांच्या आईलाही मारहाण केली गेल्याने त्यांची प्रकृत्ती खालावली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे यांच्यासह शहरातील पत्रकारांनी आज पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यावर आरोपींवर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.ही घटना केडगाव येथे घडली.
विक्रोळी मुंबई दिनांक 14 जून 2016
जत ( सांगली) दिनांक 7 जुलै 2016
नागपूर 18 जुलै 2016
नागपूरच्या हिंगणामधील आहित्याबाई होळकर आश्रम शाळेतील कथित गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्र वनचे ब्युरो चीफ गजानन उमाटे,आणि कॅमेरामन सौरभ होले तसेच आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते आणि सुनील लोंढे यांना सस्था चालक श्रीकृष्ण मते यांनी मारहाण केली.यातून महिला पत्रकारही सुटल्या नाहीत..
मटक्याची बातमी छापल्यामुळे कळंब तालुक्यातील सौदना येथील पत्रकार परमेश्वर पालकर यांच्यावर मटका एजन्टांनी हल्ला केला .याबाबतची तक्रार कळंब पोलिसांत नोंदविल्यानंतरही आऱोपीच्या विरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे.
झी चोवीस तासचे पत्रकार आणि डीएनएचे छायाचित्रकारास मालाड येथे मारहाण.फायरब्रिगेडच्या लोकांनी केली मारहाम
शहापूर येथील पत्रकार प्रियेश जगे यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला केला गेला.पोलिसांत तक्रार दिली गेली आहे.
महाड येथील सावित्रीवरील पूल वाहून गेल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या प्रकाश मेहता यांना काही प्रश्न विचारणार्या साम टीव्हीच्या मिलिंद तांबे यांनी प्रकाश मेहता यांनी अरेरावी दाखविली तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांन त्याना धक्काबुक्की केली.सामचे संजय आवटे यांनी महाड एमआयडीली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्मयंत्र्यांची भेट घेतली.
सांगोला येथील सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत यांच्यावर हल्ला.युवक कॉग्रेसची बातमी छापली होती त्यात कार्यक्रमास 35 लोकही नव्हते,कार्यक्रमास लोक का आले नाहीत याचं चिंतन करण्याची गरज आहे असं वाक्य असल्यानं चिडून हा हल्ला केला गेला.
भिवंडी येथील इंडिया न्यूजचे पत्रकार अनिल वर्मा यांना बेदम मारहाण करण्यात आली.बातमीवरून हा हल्ला केला गेला आहे.
भिवंडी येथील पत्रकार अनिल वर्मा यांना सलमान नावाच्या व्यक्तीने बेदम मारहाण केली.दोन मुलांची भांडण सोडविण्यास गेलेल्या वर्मा यांच्यावर सलमानने हल्ला केला या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मित्रनगर परिसरात तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला गेला.
काल नांदेडमध्ये एक मर्डर झाला होता.त्याची बातमी कव्हर करण्यासाठी घटनास्थळावर गेलेेले खंडेलवाल यांना पाहून मागील बातमीचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला गेला.तू इथं कशाला आलास असे म्हणत हा हल्ला झाला.तीक्ष्ण हत्याराने खंडेलवाल यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी हात आडवा आणल्याने डोक्यावर होणारा वार हातावर बसला.त्यामुळे हातााला मोठी जखम झाली असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार कऱण्यात येत आहेत.
लातूर दिनांक ३०-०८-२०१६
येथील एका गरीब अॅटोरिक्षा चालकाच्या अॅटोरिक्षास पोलिस गाडीनेच धडक दिली व हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणुन त्या रिक्षा चालकाविरोधातच गुन्हा नोंदविला.हे अन्याय कारक प्रकरण मिटविण्यासाठी व झालेल्या चुकीचा जाब विचारण्यासाठी विवेकानंद नगर पोलिस ठाणे,लातुर येथे *दै.साहित्य संम्राटचे संपादक .पंडीत हणमंते* हे गेले असता या पोलिस ठाण्यातील पो.उप.निरीक्षक इंदोरकर यानी संपादक पंडीत हणमंते यांनी त्यांना मारहाण केली.
झी -24 तासचे प्रतिनिधी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे सचिव विशाल वैद्य यांना 31 ऑगस्ट रोजी रात्री एका पोलिसाने मारहाण केली.ते शूटिंग करीत असताना त्याला विरोध करीत या पोलिसाने त्यांच्या छाताडावर बुक्कयांनी प्रहार केले-
पाथरी दिनांक 08-09-2016
परभणी जिल्हयातील पत्रकार विठ्ठल भिसे या पत्रकारास त्याने बातमीत नाव छापले नाही म्हणून पंचायत समितीचे उपसभापती कोल्हे यांनी मारहाण केली.कोल्हे हे महाशय राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक पुढारी आहेत.
उस्मानाबाद दिनांक 6 सप्टेंबर 2016 उस्मानाबाद येथील पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर हल्ला करण्यात आला.गावकरीच्या कार्यालयावरही हल्ला केला गेला आहे.एक बातमी छापल्यामुळे हा हल्ला केला गेला आहे.नंतर सुनील ढेपे यांच्यावरच बलात्कार,विनयभंग,अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली गेली.
उस्मानाबाद येथे सुनील ढेपे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्हयातील उदगीर येथील पत्रकार विनोद उगले यांच्या घरावर काल रात्री हल्ला केला गेला.त्यांच्या घरावर दगडफेक केली गेली आणि दाराची मोडतोड करण्यात आली.हल्लेखोरांनी त्यांच्या घराचे मेन गेटही तोडून टाकले आहे.तेथे उभे राहून त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली गेली आणि धमक्याही दिल्या गेल्या.एवढं सारं झाल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे.बातमीच्या रागातून हे सारं घडलं असल्याचे समजतेय.-
पुण्यनगरीचे शेगाव प्रतिनिधी कैलाश बुधवंत यांच्यावर रात्री 11 वाजता भाजपचे नगरसेवक कमलेश गांधी यांनी खुनी हल्ला केला गेला.त्यांची प्रकृत्ती गंभीर आहे.आरोपीवर गुन्हा दाखल
किन्हवली जि.ठाणे दिनांक 7 सप्टेंबर
दैनिक पुढारीचे किन्हवली येथील वार्ताहर नितीन ठाकरे यांच्यावर खुनी हल्ला केला गेला.काही दिवसांपुर्वी ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.त्याची फिर्याद त्यानी पिोलसांत दिली होती.त्यामुळे संतापलेल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
उस्मानाबाद दिनांक 8 सप्टेंबर
येथील सकाळचे बातमीदार शिवाजी सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.देवधानोरा येथील सावंत यांच्याघरावर हल्ला करून त्यांना जखमी केले.दहा बारा जणांचा हा जमाव होता.पाणी वाटपाची बातमी त्यांनी प्रसिध्ध केल्याने हल्लेखोर चिडले होते.या हल्ल्यात त्यांच्या आई -वडिल,भाऊ बहिणींनाही मार लागला आहे. सावंत यांनी शिरढोण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सांगली दिनांक 15 सप्टेंबर 2016
पत्रकारांवर हल्ले होत होते,आता पत्रकारांच्या कुटुंबांवरही हल्ले होऊ लागल्याचे एक उदाहरण सांगली जिल्हयातील जत येथून समोर आलं आहे.जत येथील पुढारीचे प्रतिनिधी दिनराज वाघमारे यांच्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.ही घटना महसूल कॉलनीत येथे घडली.
केजः तलावाच्या कामाची बातमी दिल्याबद्दल बीड जिल्हयातील केज येथील पत्रकार संतोष रोकडे यांना गुत्तेदाराने मारहाण केली करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी एनसी दाखल झाली आहे.या घटनेनंतर आता गुत्तेदारच रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.पत्रकारांवर हल्ले करून त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्रास होताना दिसत आहेत.
आरटीओ कार्यालयात पुढारीचे पत्रकार लक्ष्मण खोत वार्ताक॔नासाठी गेले होते. बातमीसाठी आरटीओ आवारातील काही फोटो काढत असताना, तेथे उपस्थित असलेल्या एंजटांचा जमाव एकत्र ऐवून त्यांनी पत्रकार लक्ष्मण खोत आणि फोटोग्राफर यशवंत कांबळे यांना घेरून शिविगाळ केली. त्यामधील जितू नावाचा एजंट आणि दुसरा एक अज्ञात एजंटाने खोत यांना धक्काबुक्की शिविगाळ देत मारहाण करायला सुरवात केली.
सामनाने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केल्याचा आरोप करीत आज सामनाच्या वाशी येथील कार्यालयावर दगडफेक केली.या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे.ठाण्यातील सामना कार्यालयावर अज्ञातांनी शाई फेकली आहे.
पनवेल दिनांक 2५ ऑक्टोबर 2016
येथील कर्नाळा दैनिकाचे संपादक उन्मेष गुजराथी यांचेवर भ्याड हल्ला करण्यात आला ..त्यात ते जखमी झाले नाहीत .ते शिथापिणे सुटले
झी -24 तासचे अमोल पेडणेकर,महाराष्ट्र वनचे प्रशांत बढे आणि सामनाचे संतोष पांडे यांच्यावर हल्ला.नोटांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचे कव्हरेज करताना हा हल्ला केला गेला.वरील तीन पत्रकारांनी विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
टाटाचे सायरन मिस्त्री यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करणार्या तीन छायाचित्रकारांवर सुरक्षा रक्षकांचा हल्ला .त्यात टाइम्स ऑफ इंडियाचे संत कुमार,हिंदुस्थान टाइम्सचे अरजित सिंग,आणि मिड डे चे अतुल कांबळे गंभीर जखमी झाले.टाटाच्यावतीने नंतर माफीनामा जाहीर करण्यात आला.
येथील पत्रकार सुनील लोणे यांच्यावर प्राणघातक हल्ला.
अंमळनेर येथील आयबीएन-लोकमतचे प्रतिनिधी सतीश गुलाबराव पाटील यांच्यावर 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला.याची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.
पिंपरी-चिंचवड दिनांक 26 नोव्हेंबर 2016ो
चिचवड येथील आदित्य बिर्ला रूग्णालायतील मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षा रक्षकांनी कार्यक्रमाचं चित्रिकरण करणार्या पत्रकारांना धक्काबुक्की केली.त्याचा निषेध करीत पत्रकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.मुबईत टाटाच्या गार्डनी पत्रकारांना मारले आता बिर्लाच्या लोकांनी धक्काबुक्की केली.
मुदखेड दिनांक ६ डिसेंबर २०१६
दलित वस्ती निधी बद्दल बातमी लावल्यामुळे गावगुंडानी रखमाजी शिंदे या ग्रामीण पत्रकारांवर रात्री ७:३०मुदखेड ते बारड दरम्यान निवघा पाटी जवळ रॅाड,गजाळी,काट्यानी गंभीर मारहान केली. यात उजव्या पायावर रॅाड मारला.आहे . या संदर्भात रात्री पोलिस स्टेशन मुदखेड मध्ये नोंद केली.मात्र तक्रार का केलास म्हणून परत सकाळी त्याच्या घरावर गावगुंडानी हल्ला केला.त्यात त्याचे भाऊ व परिवार गंभीर जखमी झाले आहेत
विक्रमगड दिनांक 9 डिसेंबर २०१६
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील पुढारी व सामनाचे तरुण *पत्रकार ओमकार पोटे* यांच्यावर नितिन भोईर याने बातमीच्या रागातून भ्याड हल्ला केला आहे.*ओमकार पाटे* यांच्या कॉलरला पकडून तुम्ही पत्रकार फार मोठे लागून गेलेत का…? तुम्हाला कोणाला सोडणार नाही…अशी भाषा वापरत त्यांच्यावर हात उचलला..आणि मारहाण केली..
—————————————————————————————————2015 मधील हल्ले (७७)
जालना दिनांक 2 जानेवारी 2015
जालना येथील दैनिक गोकुळवार्ताचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर जानेवारीत हल्ला.बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला.तक्रार देऊनही कारवाई झालेली नाही.
—————————————————————————————————
६ फेब्रुवारी २०१५- जिंतूर
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्लयाच्या घटना नव्या वर्षात देखील थांबायचं नाव घेत नाहीत.जानेवारीत सात पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडयात परभणी जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील बामणी येथील पत्रकार राजू देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गावगुंडांनी हल्ला चढविला.एका सत्कार समारंभात झालेल्या तुंबळ भांडणाचे नावासह वार्तांकन केल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.शुक्रवारी रात्री काही गावगुंड आठच्या सुमारास राजू देशमुख यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसहा राजू देशमुख यांच्यावर हल्ला केला.केवळ बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.
—————————————————————————————————
10 फेब्रुवारी २०१५-कळंब
उस्मानाबाद जिल्हयातील कळंब येथील देशभक्त साप्ताहिकाचे संपादकलक्ष्मण दग़डू शिंदे यांच्यावर आज कळंब मध्येच हल्ला करण्यात आला.त्यांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे.शिंदे यांना मुका मार लागला आहे.मात्र पत्रकाराने तक्रार दाखल केल्याचे समजताच आरोपीनेही मारहाण आणि मौल्यवान ऐवज लंपास केल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली आहे.पत्रकारांवर अशा खोट्या तक्रारी दाखल क़रून त्याचा आवाज बंद कऱण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याच्या घटना राज्यात सातत्ताने घडत आहेत.
—————————————————————————————————-11 फेब्रुवारी २०१५-घाटकोपर
घाटकोपर महापालिकेच्या मुक्ताबाई हॉस्पिटल मधे पेशंटला सुविधा मिळत नाहीत ज्या आहेत त्या अपुर्या आहेत.याची माहिती घेण्यासाथी झी 24 तास चे प्रतिनिधि प्रशांत अंकुशराव आणि सकाळ या वृत्तपत्राचे प्रतिनिधि प्रशांत बढे हे गेले असता स्थानिक नगरसेवक दीपक हांडे हे आपल्या कार्यकरत्यासह हॉस्पिटल मधे येवून दोनही प्रतिनिधिना शिविगाळ केलि आणि पाहुन घेवू अशी धमकी दिली.हॉस्पिटल मधे सुविधा उपलब्ध करूँन देण्यास स्थानिक नगरसेवक कमी पडत आहे आपले बिंग फुटू नए म्हणूनच केला कांगवा.
————————————————————————————————————–
16 फेब्रुवारी 2015 – माहूर
—————————————————————————————————
18 फेब्रुवारी 2015 -माणगाव जिल्हा रायगड
माणगाव येथील पत्रकार नितीन देशमुख यांचे अपहरण कऱण्यात आले आहे.त्यांच्याकडील मोबाईलचा ट्रेस घेतला तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याचे दिसून आले आहे.या बाबतची तक्रार त्यांच्या पत्नीने माणगाव पोलिसात दिली आहे.रायगड प्रेस क्लबने माणगाव येथे जाऊन पोलिसाची भेट घेतली
————————————————————————————————– 20 फेब्रुवारी 2015 – अहमदनगर
अहमदनगर येथील सकाळचे निवासी संपादक श्री.बाळ बोठे यांना रस्त्यावर अडवून काही समाजकंटकांनी अर्वाच्य शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यांनी याबाबतची रितसर तक्रार पोलिसात दाखल केली आहे.सकाळच्या नगर आवृत्तीत गेली पंधरा दिवस तालुकानिहावय जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंध्याच्या विरोधात लेखमाला प्रसिध्द होत आहे.त्यामुळे काही लोकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले.त्यांनीच बोठे यांना धमकी दिली आहे.काल रात्री आपले काम आटोपून बोठे घरी जात असताना त्याना काही लोकांनी अडवून तुम्ही सुरू केलेली लेखमाला बंद करा अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली.जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच डीवायएसपी हे चांगले अधिकारी असून त्यांच्याविरोधात छापून आलेले अवाक्षरही आम्ही खपवून घेणार नाही असेही हे गुंड बोठेंना सांगत होते.आज बाळ बोठे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
————————————————————————————————————
23 फेब्रुवारी 2015 – माणगाव रायगड
—————————————————————————————————25 फेब्रुवारी 2015 – मगळवेढा
मगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे पत्रकार दत्ता काबळे यांना अवैद्य दारू धद्याची बातमी छापली म्हणून दारू विक्रेत्याकडून मारहाण.तक्रार दाखल
————————————————————————————————————————–
26 फेब्रुवारी 2015 – सातारा
समाधान काळसकर यांच्यावर हल्ला.हल्लेखोऱ मोहन ना.निंबाळकर. तक्रार दाखल
————————————————————————————————————————–
27 फेब्रुवारी 2015 – मिरज
मिरज येथील केबलचे रिपोर्टर संजय देसाई यांच्यावर हल्ला.महानगरपालिका आवारात गोळीबार केला गेला.त्यात ते जखमी.व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्
——————————————————————–
–6 मार्च 2015,सोनपेठ ( परभणी)
परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार हनुमान आवाड यांच्यावर 6 मार्च रोजी मटका बुकी चालकाच्या मुलगा सचिन घोडके याने आपल्या साथीदारांसह हल्ला केला.त्यांच्या खिश्यातले एक हजार रूपये देखील काढून घेतले.पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने सोनपेठच्या पत्रकारांनी तहसिलदारांची भेट घेतली
——————————————————————————————————————————–
12 मार्च 2015, जालना
जालना येथील टीव्ही-9चे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्यावर आज वालूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.जिल्हयातील तीर्थपुरूजवळ ही घटना घडली.तीर्थपुरी येथे बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर गणेश जाधव तीर्थपुरीला गेले.उत्खननाची बातमी कव्हर करीत असताना ही पत्रकारावर हल्ला केला गेला.नव्या वर्षात पत्रकारावर झालेला हा 21 वा हल्ला आहे.
————————————————————————————————————————–
23 मार्च 2015 नाशिक
नाशिक येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी वसिम शेख यांच्यावर तीन नामचिन गुंडांनी हल्ला केला.23 तारखेला काही पत्रकारांसह वसिम शेख भद्रकाली पोलिसात बातमी घेण्यासाठी गेले असता मुस्ताक कोकणी,यासिन कोकणी,मोहम्मद कोकणी या गुडांनी त्याच्यावर हल्ला केला.तलवारीची मुठ त्यांच्या डोक्यावर लागली आहे.इतर पत्रकारांनी हल्लेखोरांना आवरले.एकास पोलिसांनी अटक केली आङे.
—————————————————————————————————————————
8 एप्रिल 2015 अकोला
अकोला जिल्हयातील बोरगाव मंजू येथील देशोन्नतीचे पत्रकार देवानंद मोहोड यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला केला गेला.आरोपीनं त्यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले.बातमीच्या कारणावरून हा हल्ले ा झाल्याचे सांगण्यात येतंय.या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.८ एप्रिल रोजी ही घटना घडली
————————————————————————————————————————–
करमळा ( सोलापूर )18 एप्रिल 2015
पंढरपूर येथील दूरदर्शनचे पत्रकार अभिराज उबाळे हे करमळा येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या कार्यक्रमाची बातमी संकलीत कऱण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी धक्का बुक्की केली.याची तक्रार पत्रकारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्याकडं केल्यानंतर त्या पोलिसाना निलंबित कऱण्यात आलं.
————————————————————————————————————————–
20 एप्रिल 2015 नंदूरबार
पोलिसांच्या विरोधात बातमी छापल्याबद्दल तापीकाठ दैनिकाचे संपादक आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यांना पोलिसांनी अटक केली.त्यांच्या विरोधात 153खाली गुन्हा दाखल केला.
—————————————————————————————————————————
Mumbai 30 एप्रिल 2015
एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्या बाबतीत आज घडलेली घटना जेवढी संतापजनक तेवढीच निषेधार्ह आह,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या घटनेचा स्पष्ट शब्दात निषेध करीत आहे.
सरकारनं गोवंश बंदीचा कायदा केल्यानं स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.या कार्यक्रमसाठी पहिल्या तीन रांगा पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.त्यानुसार पहिल्या रांगेत एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक बसल्या होत्या.मात्र त्या पत्रकार असल्या तरी महिला असल्यानं त्यांना पहिल्या रांगेत बसता येणार नाही असं आयोजकांच्यावतीनं त्यांना सांगण्यात आलं.महिलाच्या बाबतीतली ही भावना चीड आणणारी आणि निषेधार्ह आहे.
—————————————————————————————————
नांदेड
विरोधात बातम्या छापल्यामुळे नांदडे नगरपालिकेचे आयुक्त सुशील खोरवेकर यांनी प्रजावाणीच्या जाहिराती बंद केल्या.तसे पत्रच प्रजावाणीला पाठविले आहे.
—————————————————————————————————
1 मे 2015 पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड येथील आय़बीएन लोकमतचे वार्ताहर गोविंद काकडे यांनी बाटली बंद पाण्याचे काळे सत्य उघडकीस आणणारी बातमी दिल्याबद्दल मिनरल ड्रिकींक वॉटर प्लांट चालविणाऱ्या मालकाने त्याना जिवे मारण्याची धमकी दिली.याची तक्रार पिंपरी पोलिसात दाखल कऱण्यात आली आहे.
बारामती 5 मे 2015
टंचाई निवारण बैठकीतून अजित पवार यांनी पत्रकारांना बाहेर हाकलले.बारामतीतील पत्रकारांकडून पवारांचा निषेध
—————————————————————————————————
कळंब( उस्मानाबाद) 17 मे 2015
उस्मानाबाद जिल्हयाच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील दैनिक जनप्रवासचे प्रतिनिधी सुशीलकुमार पाटील यांना शिरढोण येथील पोलिसांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.पोलिस अधिक्षकांकंडं तक्रार दाखल करण्यात आली.
————————————————————————————————————————–
सासवड (पुणे ) दिनांक 19 मे 2015
पुणे जिल्हयातील सासवड नजिकच्या गराडे येथील म्हस्कू खवले यांच्यावर रेती माफियांनी हल्ला करून जबर जखमी केले.त्यांच्या हाताला मार लागला आहे.सासवड येथील पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.
—————————————————————————————————————
औरंगाबाद. 09 june 2015
औरंगाबादचे एनडी टीव्हीचे पत्रकार पप्पु गिते यांच्यावर काल रात्री संत तुकाराम नाट्यगृहात 15 ते 20 गुंडांनी भ्याड हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. स्व. मुंडे स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे वृतसंकलन करत असतांना हा प्रकार घडला. याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे आरोपींना लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा आहे. या घटनेचा तीव्र निषेध..!!!
——————–——–———————————————————————–
नाशिक 14 june 2015
महाराष्ट्रात आज दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना नाशिकमध्ये घडली.नाशिक येथील दीव्य मराठीचे पत्रकार संदीप जाधव यांनी अवैदय धंद्याच्या विरोधात बातम्या दिल्यामुळे दीव्य मराठीच्या कायार्लयावर हल्ला करून संदीप जाधव यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आङे.पोलिस हवालदाराने अवैदय धंद्यावाल्यांना संदीपची माहिती दिली अशी माहिती मिळाली आहे.या घटनेची सरकारनं गंभीर दखल घेतल्याचे गृहराज्या मंत्री यांनी जाहिर केले आहे.
———————————————————————————जळगाव 14 june 2015
दुसरी घटना जळगावची.साप्ताहिक पोलीस व्हिजनचे पत्रकार गोपाल मांद्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.त्यात मांद्रे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांनाही रूग्णालायत दाखल केले गेले आहे.या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.या दोन्ही हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असून सरकारनं पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करीत आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले वाढले असून गेल्या सहा महिन्यातील वरच्या दोन घटना धरून ४१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.
——————————————————————————————————————————————————————-–महान जि अकोला 19 june 2015
महान जि अकोला येथील सीटी न्यूज़ सुपरफ़ास्ट प्रतिनिधि मोबिन शेख यांना 5 ते 7 कसायांनी बेदम मारहाण केलि तसेच हवेत गोळी बार केला
——————————————————————————————————————————————-
लोणार 20 june
लोणार तालुक्यात अवैद्य धंदे जोरात या मथळ्याखाली 20 जूनच्या लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर लोकमतचे तालुका प्रतिनिधी मयूर गोलेच्छा यांना शिविगाळ आणि धमकी देण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले असू न येत्या 27 तारखेला एकनाथ खडसे लोणारला येणार आहेत तेव्हा त्यांनाही निवदेन दिले जाणार आहे.
– तलवडा, गेवराई 21-06-2915
बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील तलवडा येथील पोलिस ठाण्याचे पालीस उपनिरिक्षक राजीव तळेकर यांनी त्यांच्या विरोधात हिंदजागृती वर्तमानपत्रात बातमी दिल्याबद्दल पत्रकार ओमराजे कांबिलकर यांना मारहाण केली.मी रावसाहेब दानवे यांचा नातेवाईक आहे,माझे कोणीच काही करू शकत नाही अशी अरेरावीचीही भाषा त्यांनी वापरली
________________________________________________________________________________
अहमदनगर,कोपरगाव दिनांक 22 जून 2015
कोपरगाव तालुक्यातील सार्वमतचे पत्रकार काका खर्डे यांना पोलिस निरिक्षक जगदीश मुलगीर यांनी बेदम मारहाण केली.वाळूचे डंपर व जेसीबी पकडल्यावर पैश्याची तडजोड करतानाचे फोटो काढले या गोष्टीचा राग आला यातून पीएसआयने हातातील दंडुक्यानं मारहाण केली.मायगाव देवी ता.कोपरगाव येथे हा प्रखार घडला.
—____________________________________________________________________________________________
गोरेगाव,रायगड दिनांक 24 जून 2015–
गोरेगाव येथील पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पत्नी स्नेहल गोरेगावकर यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली
——————————————————————————————————————————————————————
–झरी , जिंतुर .27 जुन 2015
दि.27 जुन 2015 रोजी जिंतुर तालुक्यातील झरी येथिल दै.सामना चे पत्रकार डी के इनामदार यांच्या वर राशन तस्कर बाबा नामक व्यक्तीने राशन काळ्या बाजाराची बातमी का लावली म्हणुन हल्ला केला इमामदार यांना थापड बुक्यांनी जबर मारहान करण्यात आली या निंदनीय घटनेचा व दहशतवादी प्रवृत्तीचा तिव्र निषेध घटनेच्यानिषेधार्थ सायं..5;00 वाजता परभणी जि.पो.अधिक्षका श्रीमती नियती ठाकर यांना भेटुन परभणी येथिल सर्व पञकार निवेदन देऊन हल्लेखोर राशन माफिया वर कठोर कारवाही करण्याची मागणी करणार आहेत……
_________________________________________________________________________________. तुंगारेश्वर- वसई विरार .27 जुन 2015
मी मराठी चे कैमेरामन संदीप लोखंडे याला दिनांक 27 जूनला, तुंगारेश्वर येथे बातमी करताना 7 ते 8 गावगुंडांनी जबरण मारहाण केली. कैमेराची मोड़तोड़ केली. मोबाईल हिसकावून घेतलं. गाडीची हवा काढून घेतली. या घटनेचा द प्रेस क्लब ऑफ़ वसई विरार कडून जाहिर निषेध….सर्व लोक सिल्वर कलरच्या इनोवा गाडीत होते. गाडीचा नंबर 99 असा आहे
पत्रकारावरील हल्ल्यची गेल्या साडेसहा महिन्यातली ही 43 वी घटना आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्लयाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
_______________________________________________________________________________________ग
.27 जुन 2015
कय्युम खान छायाचिकार हमला यह हमला रोझाबाग मै हुआ है
————————————————————————————————
सांताक्रुझमध्ये मिडियावर हल्ला 16-jully 2015
मुंबईच्या सांताक्रुझ भागातील गोळीबार नगरात झालेल्या सिलेंडर स्फोटाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या मिडिया प्रतिनिधींवर स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याने काही महिला पत्रकारांसह तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत.स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर एबापी माझा,टीव्ही-9 तसेच अन्य वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच प्रिन्ट मिडियाचे पत्रकार आणि छायाचित्रकार घटनास्थळी जमा झाले.आणि शांतपणे घटनेचे कव्हरेज करू लागले .तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पाच-ते सहा जणांच्या एका टोळक्याने महिला पत्रकारांना अश्लिल शिविगाळ करायला सुरूवात केली.महिला कॅमेरामनचवळचे कॅमेरे हिसकावून घेतले.उपस्थित पत्रकारांनी त्यासा आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.यामध्ये टीव्ही-9चे पत्रकार श्रीकांत शंखपाळ गंभीर जखमी झआले आहेत.तसेच टीव्ही -9च्या महिला कॅमेरामन तसेच एबीपीमाझाच्या महिला रिपोर्टरलाही मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणाची तक्रार निर्मळ पोलिसात देण्यात आली असून गुन्हे नोंदणीचं काम तेथे सुरू आहे.
मनुश्री पाठक – मारहाण एबीपी माझा
कविता – टीव्ही-9
श्रीकांत शंखपाळ– टीव्ही-9
______________________________________________________________________________________
मुंबई :१७-०७-२०१५
मुंबई : सांताक्रूझमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता मीरा रोड परिसरात तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह मीरा रोड परिसरात आढळला आहे. तर अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहेत.
राघवेंद्र दुबे असं मृत्यू झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. दुबे हे मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते.शशी शर्मा आणि संतोष मिश्रा जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी एका बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी हे पत्रकार गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
मीरा भाईंदर रोडवर असलेल्या व्हाइट हाऊस बिअर बारवर पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. रात्री 1 वाजता पोलिसांनी ही छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 15 मुलींना ताब्यात घेतलं होतं.
यावेळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे पत्रकार बारवरील धाडीच्या वार्तांकनासाठी गेले होते. मात्र त्यावेळी दोघांवरही हल्ला झाला. या दोघांवर हल्ला झाल्याची तक्रार देण्यासाठी पत्रकार राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये अनेक बारमालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचं सांगण्यात येतंय.
यानंतर पहाटे पाचच्या सुमारास राघवेंद्र दुबे यांचा मृतदेहच आढळून आला. एस.के. स्टोन चौकीजवळ राघवेंद्र मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.
आजच्या घटनेचा निषेध कऱण्यासाठी विधीमंडळात काम करणार्या पत्रकारांनी दंडाला काळ्या फिती लावून काम केले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पत्रकाराची हत्त्या करणार्या गुंडांना अटक करण्याची पत्रकार सुरक्षा कायदा कण्याची मागणी केली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.
राघवेंद्र दुबे — हत्त्या
शशी शर्मा — अपहरण,हल्ला
संतोष मिश्रा — गंभीर जखमी
—————————————————————————————————-मुंब्रा १७=-०७-२०१५
ठाण्याच्या मुंब्रा येथे सरिता मिश्रा नावाच्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आला.व्यक्तीगत वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते.
—————————————————————————————————
सांगली दिनांक 17 जुलै 2015
आयबीएन-लोकमतचे सांगली जिल्हा प्रतिनिधी असिफ मुरसल यांना अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी दिली गेली.या प्रकऱणी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
—————————————————————————————————–कल्याण 19 जुलै2015
कल्याण येथील दबंग दुनियाचे पत्रकार संदीप तिवारी यांनी एक बातमी प्रसिध्द केल्याने शिवसेना पदाधिकारी राजाराम पावसे यांनी जिवेमारण्याची धमकी दिली.याची तक्रार कोळसेवाडी पोलिसात करण्यात आली आहे.
—————————————————————————————————
वसई 22 जुलै2015
मुंबईच्या वसई रोड स्टेशनजवळ मुंबईतील एका मराठी वाहिनीचे पत्रकार आशीष सिंह यांच्यावर लोकलमध्ये हल्ला कऱण्यात आला.हल्लेखोर दोन होते.नंतर आशिषसिंहने आपल्या काही सहकार्यांमुळे आरोपींना पोलिसांच्या हवाली केले.
—————————————————————————————————-बुलढाणा 21 जुलै 2015
बुलढाणा येथील पत्रकार साबिर अली यांच्यावर दिनांक 21 जुलै रोजी एका संस्था चालकाच्या वाहन चालकाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.बिना नंबर प्लेट असलेल्या गाडीचे छायाचित्र काढताना त्यांच्यावर हा हल्ला केला गेला.बुलढाणा शहरातील पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी 4 ऑगस्ट 2015
– रत्नागिरी येथील झी-24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांना एका खासगी कंपनीच्या केबल टाकणार्या व्यक्तीने धमकी देत धक्काबुक्की केली आहे. पत्रकारांनी पोलिस अधीक्षक संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे,
कामशेत पुणे 4 ऑगस्ट 2015-
पुणे जिल्हयातील कामशेत येथील मनसे प्रमुख बंटी वाळूंज यांची हत्त्या झाल्यानंतर त्याची बातमी घेण्यासाठी गेलेल्या पाच पत्रकारांवर हल्ला. हल्ला झालेले पत्रकार असे.1) गणेश दुडम ( जय महाराष्ट्र )2) चैत्राली राजापूरकर ( टीव्ही-9) तसेच अन्य दोन पत्रकार आहेत .काही पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न.दुडम यांचा टी शर्टही फाडला.
मुंबई १८ ऑगस्ट 2015-
दबंग दुनिया या हिंदी दैनिकाचे संपादक सत्यनारायण तिवारी यांना 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.’तुम्ही सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात बातम्या देण्याचे थांबविले नाही तर तुमच्यासह संपूर्ण स्टाफला कार्यालयात येऊन गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.तुम्ही किती वाजता कार्यालयात येता आणि परत जाता याची पूर्ण खबर आम्हाला आहे’ असेही फोन कर्त्याने म्हटले आहे.या धमकीच्या फोनची तक्रार कफ परेड पोलिसांत नोंदविण्यात आली आहे.
चंद्रपूर दिनांक 23 ऑगस्ट 2015
विरोधात बातमी आल्याने संतापलेल्या चंद्रपूर जिल्हयातील श्रमिक एल्गारच्या संस्थापिका परोमिता गोस्वामी यांनी सावली येथील पत्रकाराच्या विरोधात एकाच वेळी सहा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.पत्रकाराचा गुन्हा एकच होता,त्यानं परोमिता मॅडम कुठे आहेत तुमचे पंचवीस हजार कार्यकर्ते या मथळ्याखाली बातमी देऊन खोटे आकडे दणार्या संघटनेची पोलखोल केली होती.या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटनांनी 25 ऑगस्ट 2015 रोजी चंद्रपुरमध्ये मोर्चा काढला होता.
लातूर दिनांक 31 आगस्ट 2014
लातूर येथील झी-24 तासचे प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील यांना आज धक्काबुक्की कऱण्यात आली.कव्हेकर यांच्या संस्थेच्या मुलांचे वसतीगृहात राहणार्या मुलांना शौचालय साफ करायला लावले जाते याची माहिती कळल्यानंतर शशिकांत पाटील तेथे गेले.बातमीचे छायांकन करताना सुरक्षा रक्षकांनी शशिकांत पाटील यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर बंदुक रोखून बाहेर हाकलून लावले याचा निषेध होत आहे.
जळगाव 10 आगस्ट 2014
येथील देशोन्नतीच्या कार्यालयावर समाजकंटकांनी हल्ला केला.एक बातमी विरोधात छापली म्हणून हा हल्ला झाला. या हल्ल्यात कार्यालयाची मोडतोड तर केली गेलीच,त्याच बरोबर पत्रकारांनाही मारहाण झाली.हल्लेखोरांमध्ये महिलाही होत्या.त्यांनी आमचे विनयभंग झाले म्हणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मुंबई- 20 सप्टेंबर 2015
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे तसेच श्यामसुंदर सोन्नर यांना सनातन कडून धमकी.वागळेंनी दिला दुजोरा.
मुंबई – 27 सप्टेंबर 2015
लालबाग राजाच्या ठिकाणी वृत्तसंकलन करताना महिला पत्रकार पुनम अपराज यांना पोलिसांकडून मारहाण.पुनमला रात्रभर पोलिस चौकीत बसवून ठेवले.1200 रूपये दंड वसूल केल्यानंतर सुटका.गणपतीचे फोटो काढताना ही घटना घडली.
नागपूर,पुणे आणि मुंबई दिनांक 30 स्पेटंबर आणि 1 ऑक्टोबर
नागपूर जिल्हयातील पारशिवनी येथील पत्रकार देवानंद शेंडे,पुणे जिल्हायातील मुळशी येथील पुढारीचे प्रतिनिधी किसन बाणेकरी आणि पुण्यनगरीचे संपादक संजय मलमे यांना बातम्या छापल्या बद्दल जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
दौड,पुणे दिनांक ०३-10-२०१५
दौड तालुक्यातील पाटस येथील पत्रकार आणि दौड तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव संजय सोनवणे आज दुपारी पाटस येथील बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित पोलिसांपैकी एका महिला कॉन्स्टेबलने त्यांना घटनेचे फोटो काढण्यास मज्जाव केला आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेत त्यांना धक्काबुक्की केली.या घटनेचा दौड तालुका पत्रकार संघाने निषेध केला असून संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मुंबई येथील न्यूज-24 चे ब्युरो चीफ विनोद जगदाळे हे आज जेजे हॉस्पिटलमध्ये इंद्राणी मुखर्जीचे फोटो काढत असताना पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेऊन त्यांना दोन तास अडवून ठेवले.डॉ.तात्यासाहेब लहाने यांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका कऱण्यात आली.
परभणी दिनांक 6 ऑक्टोबर 2015 परभणी जिल्हयातील असोला येथील दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी गोपीराज जावळे यांना नवा मोढा पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली.या संबंधीची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबई 10 ऑक्टोबर 2015
एबीपी माझाच्या कार्यालयाजवळ बाईकवरून आलेल्या तिघांनी इंडिया टीव्ही न्यूज चॅनलचे कॅमेरामन पोटले यांना कारण नसताना जबरदस्त मारहाण केली.ही मारहाण बेल्टनं केली गेली.गाडीचा नंबर होता,एमएच-01 बीझेड 7426
पनवेल: दिनांक 11 ऑक्टोबर 2015
पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन युवकांनी योगेश मुकादम या २६ वर्षीय पत्रकाराला मारहाण केली.व जीवे मारण्याची धमकी दिली.वर्तमान पत्रात बातमी दिल्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेश मुकादम यास मारहाण केली.
वसई-विरार 11 ऑक्टोबर 2015
विरारमध्ये घडली.द प्रेस क्लब अॅाफ वसईचे पदाधिकारी आणि आयबीएन लोकमतचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्या दोन भावांवर हल्ला कऱण्यात आला.बातमीच्या रागातून हा हल्ला झाला असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केलेली आहे.
मावळ दिनांक 12 ऑक्टोबर 2015 मावळ येथील वाढती गुन्हेगारी आणि अवैद्य धंद्याचय विरोधात बातम्या दिल्याबद्दल आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल कामशेत येथील सकाळचे पत्रकार विजय सुराणा,लोकमतचे महादेव वाघमारे आणि पुढारीचे किशोर ढोरे या पत्रकारांना वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि हवालदार बाब शिंदे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत
.पुणे दिनांक 16 ऑक्टोबर 2015 पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर पुणे महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना तेथे बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकार विवेक तायडे यांना काही गुंडांनी मारहाण करून त्याना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या विरोधात शिवाजी नगर पोलिसात निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई दिनांक 21 ऑक्टोबर 2015 नवभारत टाइम्सचे प्रतिनिधी अनुराग त्रिपाठी यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखण्यात आले तेव्हा त्यांनी पोलिसांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांना पोलिसांनी एखादया गुन्हेगारासारखे मरिन ड्राइव्ह पोलिसांत नेले.गिरीष बापट यांना हे कळल्यावर ते तेथे थेट गेले आणि त्यांची सोडवणूक केली.
रेवदंडा दिनांक 21 ऑक्टोबर 2015
रायगड जिल्हयातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्याच्या झालेल्या दुरावस्थेचे छायांकन कऱण्यासाठी किल्ल्यात गेलेले पत्रकार महेंद्र खैरे यांना काल मारहाण करण्यात आली.याची तक्रार रेवदंडा पोलिसात करण्यात आली आहे. किल्ल्याला गेलेले तडे आणि किल्ल्यात वाढलेले जंगलाचे सांमा्रज्य याचे वृतांकन आणि फोटो घेण्यासाठी महेंद्र खैरे तेथे गेले असता त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला.त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेत त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे.रेवदंडा किल्ल्यात अनेक गैरप्रकार सुरू असतात.प्रेमी युगुलांनाही त्रास दिला जातो अशा गुंडांनीच पत्रकारावर हल्ला केला असावा .
जालना दिनांक 21 ऑक्टोबर 2015
जालना येथील मत्सोदरी दैनिकाचे प्रतिनिधी अच्युत दगडोजी मोरे यांच्यावर काही गावगुंडांनी लाठ्या,काठया आणि लोखंडी गजांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या एका हातालाही फॅक्चर झाले आहे.त्यांच्यावर जालना येथील एका खासगी रूग्णालायात उपचार कऱण्यात येत आहेत.
अच्युत मोरे आपले काम आटोपून गावी जात असताना रानगर (कारखाना) येथे त्यांच्यावर हा भ्याड हल्ला केला गेला.या हल्ल्यात त्यांच्या समवेत असलेले आनंद म्हस्के आणि प्रेमानंद मगरे हे देखील जखमी झाले आहे.बातमीच्या रागातून आणि पत्रकाराला अद्यल घडवायचीच या इर्षेतून हा हल्ला झाला आहे
श्रीगोंदा दिनांक 31 ऑक्टोबर2015
श्रीगोंदा येथील मटका आणि जुगार धंद्याची बातमी छापल्याच्या रागातून पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी पत्रकार सुजित गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या विरोधात प्रांतांकडे निवेदन देण्यात आले आहे.-
04-11-2015 अचलपूर
अमरावती जिल्हयातील अचलपूर तालुक्यातील शिंदी येथील पत्रकार सुनील रोडे यांच्यावर चार ते पाच गुंडानी बुधवारी रात्री हल्ला चढविला.या प्राणघात हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत.याची पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.अचलापूर प्रेस क्लबने या घटनेचा निषेध केला आहे.
दिनांक 4 नोव्हेंबर 2015 खामगाव ( जि.बुलढाणा) बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील पत्रकार काका रूपारेल यांच्या घरावर अज्ञात इसमांनी हल्ला केला.त्यात घराचे मोठे नुकसान झाले आहे.फटाक्याच्या एका दुकानाच्या संदर्भात त्यांच्या दैनिकात एक बातमी छापली होती त्या रागातून हा हल्ला केला गेला असावा असा रूपारेल यांचा अंदात आहे.
नाशिक – दिनांक 21 नोव्हेंबर 2015
येथील सकाळचे बातमीदार महेंद्र महाजन यांना पोलिस उपायुक्त अविनाश बारगळकर यांनी बेदम मारहाण केली.नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकर्यांनी अडविले याचा राग आलेल्या बारगळकडून मारहाण केली गेली.महेंद्र महाजन यांना नाशिक येथील सुयश इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या हातपायाना आणि बरगडयांना जबर मार लागला आहे.विकास गामन आणि किरण कवडे या दोन पत्रकारांनाही मारहाण झाली आहे.
पुणे 26 नोव्हेंबर 2015
पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे येथील लाईट ऑफ पुणे या साप्ताहिकाचा संपादक रूबेन म्युनियल याने दिनांक 26 नोव्हेंबर 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकूल ओतून घेत स्वतःला पेटवून दिले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यात तो 60 टक्के भाजला आहे.रूबेन यांच्यांवर खंडणीचे विविध गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे.यामुळे नैराश्य आलेल्या रूबेनने आत्महत्याच करण्याचा प्रयत्न केला.कॅम्प परिसराताली फॅशन स्ट्रीटवर अनाधिकृत लावण्यात येणार्या हातगाडीवाल्यांच्या विरधात रूबेनेने पोलिसांत तक्रार केली होती.त्यामुळे चिडलेल्या हातगाडीचालाकंनी त्यांच्या विरोधात खंडणीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत असं रूबेन यांचं म्हणणं आहे.या संदर्भात पोलिसांकडे अनेकदा चकरा मारूनही उपयोग झाला नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललले आहे.राज्यात अनेक पत्रकारांवर असे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत.
जळगाव 26 नोव्हेंबर 2015
जळगावच्या लोकमत कार्यालयावर हल्ला
दैनिक लोकमतमधील आजच्या मंथन पुरवणीत धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसिध्द झाल्याचा आरोप करीत एका टोळक्यानं आज दुपारी जळगाव मधील लोकमतच्या कार्यालयावर हल्ला चढविला.या हल्ल्यात लोकमतच्या सेक्युरिटी ऑफिसचे नुकसान झाले असून मजकुराबद्दल संपादकांनी माफी मागावी अशी मागणी हे लोक करीत होते.या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे जळगाव लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.यावेली जमाव जोरात घोषणाबाजी करीत होता.जळगावमधील घडलेला हा प्रकार लक्षात घेऊन परभणी आणि अन्य काही जिल्हयात लोकमत कार्यालयावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उद्याच्या अंकात दिलगिरी व्यक्त करण्याचे लोकमतने ठरविले असल्याचे समजते.इंटरनेट आवृत्तीतील मंथन पुरवणी काढून घेण्यात आली आहे.
ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांना छोटा शकीलने धमकी दिली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मालमत्ता 9 डिसेंबर रोजी लिलावात काढली जात आहे.ती प्रॉपर्टी खरेदी करण्यात स्वारस्य दाखविणार्या बालाकृष्णन यांना छोटा शकिलने धमकी दिली आहे असा दावा त्यांनी केला आहे.
उस्मानाबाद दिनांक 8 डिसेंबर 2015
पुणे दिनांक ९ डिसेंबर 2015
पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणारे सिध्दान्त समाचार या वृत्तपत्राचे वार्ताङर राज पांडे यांचे घर पेटवून देण्याचा आज प्रयत्न झाला.पांडे दाम्पत्य आणि त्यांची छोटी मुलगी सुखरूप आहेत.सहाय्यक पोलिस आयुक्तांनी लगेच घटनास्थळास भेट दिली आहे.घराचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.- पुण्यात पत्रकाराचे घर पेटविले
वर्धा दिनांक ९ डिसेंबर 2015
वर्धा येथील सकाळचे बातमीदार किशोर कारंजीकर याना राष्ट्रवादीचे पंचायत समिती उपसभापती संदेश थिटे यांनी बेदम मारहाण केली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्या बातमीवरून हा प्रकार घडला आहे.या विरोधात सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल झाली असून आरोपीच्या विरोधात 323,506 कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.काल वर्ध्यातील पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांची भेट धेऊन त्यांना निवेदन दिले आहे
महेश मोतेवार याच्या अटकेचे रिपोर्टिंग करणारे झी-24 तासचे महेश पोतदार आणि टीव्ही-9चे रिपोर्टर संतोष जाधव यांना महेश मोतेवारच्या बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरे धक्काबुक्की करून त्यांचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरच्या विरोधात उस्मानाबाद पोलिसात गुन्हा दाखल
पुणे 31 डिसेंबर 2015ः
पोलिसांच्या जाचाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेले लाईट ऑफ पुणे चे संपादक रूबेन सॅम्युअल यांचे निधन
२०१४ मधील हल्ले (६६)
————————————
3 जानेवारी -पौड-मुळशी येथील पुढारीचे पत्रकार किसन बाणेकर यांना स्थानिक पोलिस निरिक्षक मोरे यांना बेकायेशीरपणे डाबले अजित पवार यांना मोरे यांच्या विरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेडा ठरवून सहा तास डांबून ठेवले.
4 जानेवारी- नादेड जिल्हयातील मालेगाव येथील लावणी महोत्सवात पत्रकारासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर पुढारी बसले.त्याला पत्रकारांनी आक्षेप घेतल्यावर जि.प.अध्यक्षांचे पीए मिलिंद व्यवहारे आणि मोकल शेळके यांनी पत्रकाराशी असभ्य वागणूक.धक्काबुक्की.
7 जानेवारी– माजलगाव येथील पत्रकार जहागिरदार यांनी रस्तयातील कामात झालेल्या गैरकारभाराची बातमी छापल्याबद्दल स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्या पीएची जिवे मारण्याची धमकी.
8 फेब्रुवारी– नवी मुंबई येेथील पत्रकार सागर मेघे याच्यावर हल्ला
9 फेब्रुवारी- लातूर येथील पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांा ल्ल्ला,जगताप गंभीर जखमी.
13 फेब्रुवारी- अलिबाग येथील पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे यांच्यावर महिला कार्यकर्त्यांकूडन हल्ला.एका कार्यकमात काही महिलांनी डान्स केला.त्याची बातमी छापल्यामुळे हा हल्ला झाला
17 फेब्रुवारी- खोपोली येथील समाज वैबव साप्ताहिकाचे संपादक गोकुळदास येशीकर यांना कॉग्रेस पुढारी अय्युब पटेल यांची मारहाण
18 फेब्रुवारी- मुंबई येथील परळ भागात असलेल्या आदिती हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या मिड-डेच्या चार महिला पत्रकारांबरोबर असभ्यवर्तन.सहा आरोपींना अटक.
23 फेब्रुवारी – नांदेड जिल्हयातील सावभैौम जनता चे संपादक विवेक केरूरकर यांना पोलिसांची बेदम मारहाण.पोलिसांच्या विरोधातील बातम्यांच्या कारणांवरून ही मारहाण झाली.
1 मार्च– पिंपरी येथील साप्ताहिक मर्द महाराष्ट्रचे संपादक राम गायकवाड यांना संजय चव्हाण याकडू मारहाण
2 मार्च- इंदापूर येथील प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसवाल्यांक डून मारहाण.यात्रेची बातमी दिल्यामुळे ही मारहाण झाली.आरोपी वकिलाला अटक नाही.
2 मार्च- शिरूर येथील पत्रकार मुकुंद मनोहर ढोबळे यांच्यावर पोलिसांकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा खोट्या आरोपाखाली ्र354 चा गुन्हा दाखल.
3 मार्च- सागली येथील पत्रकार रवींद्र कांबळे यांच्या जय महाराष्ट्र वाहिनीचा लाईव्ह शो बंद पाडला.कांबळे यांना धक्काबुक्की.दमदाटी
17 मार्च- मुंबई येथील जिया न्यूजची महिला पत्रकाराची होळीच्या दिवशी झेडछाड.कॅमेरामनला मारहाण.चार अटकेत.अंधेरीत घडली घटना.
19 मार्च- परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार भागवत शंकराप्पा पोपडे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण.एका कार्यक्रमाची सेना उमेदवाराची बातमी दिल्याने ही मारहाण झाली.
30 मार्च
नगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सुळ आणि राहता येथील पत्रकार अशोक सदाफळे यांना बातम्या दिल्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या.
3 एप्रिल –
मुंबई येथील जय महाराष्ट्र वाहिनीचे कॅमेरामन दिलीप राय यांना शिवसेना-मनसे दंगलीच्या वेळेस मारहाण त्यांच्या डोक्यात सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या.ते गंभीर जखमी झाले.
१३ एप्रिल २०१४
पनवेल येथील साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जाणू वरगडा यांनी वनविभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी छापल्याबद्दल वनपाल ठाकूर यांची पत्नी आणि मुलाने संपादकांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीयवाचक शिविगाळ केली.याची तक्रार पनवेल पोलिसात दिली गेली आहे.
15 एप्रिल 2014
मुर्तीजापूर येथील पत्रकार निलेश पिंजरकर आणि अन्वरखान यांना संस्थाचालक डॉ.राजेश कांबे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.कांबे यांच्या पॉलिटिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची बातमी छापल्याबद्दल ही धमकी दिली गेली.तक्रार दाखल.गुन्हा नोंदविलाय
17 एप्रिल 2014
सकाळचे पत्रकार तुषार खरात यांना आमदार जयकुम गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील पांढरवाडी येथील मतदान केंद्रात 17 एप्रिल रोजी मारहाण केली.गोरे आपल्या पन्नास कार्यकर्त्यासह मतदान केंद्रात घुसले आणि मुलाणी नावाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला मारहाण करू लागले.त्यावेळी तेथे कव्हरेजसाठी उपस्थित असलेल्या तुषार खरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण केली गेल
२५ एप्रिल २०१५
पुणे जिल्हयातील वालचंदनगर येथील सकाळचे बातमीदार सचिन लोंढे यांच्यावर आज एका मटका चालकाने हल्ला केला आहे.त्यात ते आणि त्यांचा भाऊ जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मारहाणीत सचिन लोढे यांचा हात फ्र्रक्चर झाला आहे. मटका आणि अन्य बेकायदा धंद्याच्धा त सचिन लोंढे बातम्या देत असल्याच्या रागातून यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.
मुंबई येथील एका वाहिनीचे पत्रकार संजय प्रसाद यांना मालाड भागात काही गुंडांनी मारहाण केली.संजय प्रसाद आपल्या पत्नी सोबत बाजारात गेले असता गुंडांनी पत्रकाराच्या पत्नीची छेड काढली.संजय प्रसाद यांनी जाब विचारला असता पाच-सहा गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली.सहा जणाच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केले आहे.
30 एप्रिल 2014
कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांना काल सायंकाळी दोन युवकांनी बस स्थानकावर बेदम मारहाण केली त्यात बोरा यांचे डोके फुटले आहे.बोरा हे पुण्यनगरी तसेच एका वृत्तवाहिनीचे काम करतात.बोरा.त् डोके फुटले असून त्यांच्या तोंडाला,छातीला मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
30 April 2014
30 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेवर नेण्यात आलेल्या तोडफोड मार्चाची बातमी देताना खबरे शामतक या दैनिकाने आमदार संचेती यांचे बंधू सुरेश संचेती यांचे नाव मनसे कार्यकर्त्यांच्या नंतर छापले होते.त्यामुळे चिडलेल्या सुरेश संचेती यांनी फोन करून पत्रकार विरसिंह राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा शहर आणि तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.तसेच एक निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे
7 may 2014
सातारा जिल्हयातील फलटण येथील एेक्य आणि सकाळच्या कायार्लयावर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या
गुंडांनी हल्ला केला,तोंडाला रूमाल बांधून आलेल्या या गुंडांनी लोखंडी सळयांनी दारे,खुच्यार् टेबल तोडले.त्यांची बातमी दिली नाही असा त्यांचा आक्षेप होता.त्यामुळं हा हल्ला झाल्याचं सागणयात येतंं
18 मे 2014
जळगाव येथील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानं एका अपघातात जखमी झालेले सकाळचे बातमीदार गणेश खाबेटे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात केली आहे.
19 मे 2014
बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात साठे यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली
22 मे 2014
जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांची 22 मे 2014 रोजी निर्घृण हत्त्या करण्यात आली.पाच तरूणांनी ही हत्त्या केल्याचे समोर आले असून ते सर्व 19 ते21 वयोगटातील आहेत.पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
30 मे 2014
भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.तसेच देशोन्नतीच्या अंकाची होळी केली
11 जून 2014
सामनाच्या 11 जून 2014च्या अंकात शरद पवारांवर टीका कऱणारा बेताल बडबड या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द झाला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांनी सामनावर मोर्चा काढला,दगडफेक केली,अंकाच्या प्रती जाळल्या.यावेळी शिवसेना- राष्ट्रवादी कार्यकर्त्यात मोठा राडा झाला
16 june 2014
दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत.
26 june 2014
चिकणघर / म्हारळ : ‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले
माजलगाव येथील दैनिक सुराज्यचे प्रतिनिधी उमेश जेथलिया यांच्यावर गुरूवारी ( दिनांक 26-06-14 रोजी ) हल्ला कऱण्यात आला.यापुर्वी देखील जेथलिया यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.जेथलिया यांनी याची तक्रार माजलगाव पोलिसात दाखल केली आहे.
28जून2014
पुणे जिल्हयातील देवगाव येथील घोडनदीच्या पात्रात वाळू उपसा कऱणाऱ्या वाळूमाफियाकडून झी-24 तासचे साईदीप ढोबळे यांना मारहाण,धक्काबुक्की
10 जुलै 2014
अभिनेता सलमानखान याच्या किक चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात सलमानच्या बॉडीगार्डची छायाचित्रकारांना धक्काबुक्की.सलमानवर छाय़ाचित्रकारांचा बहिष्कार.त्यानंतर सलमानची नोकरी घालविण्याची धमकी.
25 जुलै 2014
साहसिकचे संपादक रवी कोटंबकर यांच्यावर एका मंत्र्यांचे पीए पवन गोसेवाडे यांनी हल्ला केला.संपादक जखमी झाली आहेत.
27 जुलै 2014
शेगाव ( टीम बातमीदार ) अकोला जिल्हयातील शेगाव येथील मातृभूमीचे वातार्हर देवानंद उमाले ायंच्यावर काल शेगाव येथे जीवघेणा हल्ला झाला.काही दिवसांपूवीर् उमाले यांनी स्थानिक काही पुढाऱ्यांच्या विरोधात बातमी छापली होती.त्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप उमाले यांनी केला आहे.सात-आठ हल्लेखोऱ आले आणि त्यांनी अचानक हल्ला केला.हा हल्ला झाला तेव्हा स्थानिक पत्रकार कृष्णा म्हस्के,दिनशे महाजन,मंगेश ढोले आदि पत्रकार होते.हल्ल्यात उमाले यांच्या डोक्याला .मानेला मार लागला असून त्यांच्यावर रूगण्लायत उपचार करण्यात आले आहेत.
18 August 2014
वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या बिलाची वारंवार मागणी करूनही ती न देणाऱ्या कॉग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने वैजापूर तालुक्यातील गारज येथील पत्रकार बाबासाहेब पवार यांना यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.धमकी देणाऱ्या पुढाऱ्याचं नाव निवृत्ती मच्छिंद्र बारसे असे असून तो कॉग्रेस सेवा दलाचा माजी अध्यक्ष होता
22 August
पनवेल येथील दैनिक कर्नाळा मध्ये बातमी छापल्याच्या आरोपावरून संपादक प्रफुल्ल फडके यांच्या विरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला.स्थानिक कॉग्रेस नेते प्रकाश बिनेदार यांनी ही तक्रार केली होती.
24 August
शेगाव येथील स्थानिक जेष्ठ पत्रकार विजय मिश्रा यांना काल ( २१ ऑगस्ट ) एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने मारहाण केली. प्रवीण बोदडे आणि एका युवकाने मिश्र यांना विनाकारण मारहाण केली आहे. एका महिन्यात पत्रकारांना मारहाण होण्याची दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी शेगावच्या पत्रकार देवानंद उमाले आणि एकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
30 August14
धानोरा येथील पत्रकार अल्लऊद्दीन लालानी यांना पोलिस निरिक्षक वैभव माळी यांनी बेदम मारहाण करीत जनावारांसारखे गाडीत कोंबले आणि त्यानां पोलिस ठाण्यात घेऊन गेले.एका मुख्याध्यापकाने लालानी यांनी आपल्या विरोधात वर्तमानपत्रात बदनामी करून पैश्याचा तगादा लावला अशी तक्रार केली होती.या तक्रारीनंतर माळी लालानी यांच्या दुकानात गेले.त्यांना गाडीत कोंबले.याचा विरोध करण्यासाठी मग जनता रस्तयावर आली.त्यामुळं त्यांची बदली केली गेली.
09 0ct 2014
डियन एक्प्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांना काल पोलिसांनी धक्काबुक्की केली.सोनिया गांधी यांच्या सभेच्या वेळेस कोल्हापुरात ही घटना घडली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे
12 ऑक्टोबर 2014
लोणी काळभोर येथील पत्रकार सीताराम लांडगे यांना पोलिस निरिक्षक अभिमान पवार यांनी अऱेरावीची भाषा करून खुनाची धमकी दिली.
7nov2014
पनवेल पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या महिला पत्रकार चेतना वावेकर यांयावर आज सकाळी पनवेल येथे काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात वावेकर यांना गंभीर दुखापत झाली असून एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संबंधिची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजते.
8 Novembr 2014
पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेकर याच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्टा्रातील मिडिया जगत संतप्त असतानाच काल रात्री पुणे येथील पुण्यनगरीच्या पत्रकार अश्विनी सातव-डोके यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला क रून दङशत निर्माण करण्याचा प्रय़त्न केला आहे.या हल्ल्यात अश्विनीच्या आई आणि 75 वर्षांच्या आजींना धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते.हल्ला झाला तेव्हा या दोघीच घरात होत्या.या प्रकरणी तक्रारीत आरोपींची नावे दिली असली तरी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.घरगुती वादातून हा हल्ला झाला असला तरी सभ्य समाजात अशा हल्ल्यानंा स्थान नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे.
8 नोव्हेंबर 2014
कोल्हापूरमधील पत्रकार सुखदेव श्यामराव गिरी,बाळासाहेब मारोती पाटोळे,शशी बिडकर,आणि अमोल माळी यांना पल्स पॉलिसीच्या संदर्भात बातमी दिल्यामुळे एजंटांची जिवेमारण्याची धमकी.अजामिनपात्र गुन्हा दाखल
12 नोव्हेंबर 2014
नागपूर येथील हिंदी दैनिक भास्करच्या कार्यालयावर दिनांक 12 नोव्हेबंर 14 रोजी हल्ला करण्यात आला.ख्रिश्चन समाजाच्या 50-60 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.या हल्ल्यात कार्यालयातील साहित्याची मोठी हानी झाली तसेच पत्रकारांना मारहाण केली गेली.
17नोव्हेंबर 2014
खामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर 17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न् केला.काका रूपारेल यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून अवैध्य धंद्यावाले किंवा कॉग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी आपल्या घरावर हल्ला केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.रूपारेल यांनी अवैद्य धंद्याचय विरोधात सातत्यानं लिखाण केल्याने त्यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता.
18 नोव्हेंबर2014
परभणी येथील गावकरीचे प्रतिनिधी मोहसिन खान यांच्यावर अज्ञात गुडांनी हल्ला केला.पोलिसाच्या प्रेस नोटच्या आधारे तडीपार केल्या गेलेल्या गुडांची नावं छापली गेल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला आहे.मोहसिन खान याच्या पायाला,डोक्याला मार लागला आहे.
21 नोव्हेंबर 2014
नंादेड जिल्हयातील लोहा -कुंडलवाडी येथील पत्रकार आणि कुंडलवाडी अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष,लोकमत समाचार या हिंदी दैनिकाचे प्रथिनिधी संतोष मेहकर यांच्यावर 20 रोजी हल्ला केला गेला.
29-11-2014
जीवन न्यूज वाहिनीचे श्रीगोंदा येथील प्रतिनिधी संतोष भागवत यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी हल्ला केला.भागवत जाहिरातीचे पैसे मागायला गेले असता हा हल्ला केला गेला.पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आहे.
29-11-2014
मेरा भारत समाचार या वाहिनीच्या रत्नागिरी येथील ब्युरो चीफ मयुरी सुपल यांच्या घरावर हल्ला.रत्नागिरी जवळच्या नाचणे गावातील ग्रामपंचायतीने त्यांचा गडगा तोडला होता.त्याची तक्रार त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केल्यामुळे संतापून काही हितसंबंंधियांनी हा हल्ला केला आहे.तक्रार दाखल
अपहरण 29-11-14
मुंबई येथील पत्रकार अनिल जोशी यांचे अपहरण.49 हजार लुटून चेंबुरला निर्जन टिकाणी सोडला.दोघांंंंंना अटक .माटुंगा पोलिसात तक्रार
30 Nov 2014
ABP माझा चे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्या वर प्राणघातक हल्ला ..मुजोर रिक्षाचालका सह मद्यपींचा भरचौकात धुडगूस,वाहातुक पोलिसला धक्का बुक्की..मध्यस्थी करणाऱ्या IBN लोकसमतचे कँमरामन हेमंत बागुल यांनाही मारहाण करीत त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट घेऊन टोळक्याने हिसकावू पलायन केले .
05-12-14 बीड येथील पत्रकार दिनेश लिंबकर यांना पोलिसांची मारहाण
08-12-14 आज आणखी एका पत्रकारावर राज्यात हल्ला झाला तर अन्य एका ठिकाणी पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.पहिली घटना रायगड जिल्हयातील खोपोलीतली आहे.पत्री सरकार या साप्ताहिकाचे संपादक सचिन यादव यांना सुरभी ज्वेलर्स चे मालक महेंद्र थोरवे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी मारहाण केली
08-12-14
दुसरा प्रकार बीड जिल्हयातील वडवणीत घडला.पत्रकार भैय्यासाहेब तागडे अतिक्रमण विरोधी मोहिमेची छायाचित्रं काढत असताना त्यांना पोलिसांनी दमदाटी केली.त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
12-12-14
पवईतील आयआयटीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आयोजक आणि विद्यार्थ्यांची माध्यमांच्या प्रतिनिधीना धक्काबुक्की.या कार्यक्रमास सचिन तेंडूलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.
१३-१२-१२
बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमिर शेख यांच्यावर गावगुंडानं भ्याड हल्ला केला आहे.त्यात शेख गंभीर जखमी झाले आहेत.हल्लेखोर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समजतं.
13-12-14
औरंगाबाद येथील आयबीएन-लोकमतचे सिध्दार्थ गोदाम यांच्यावर सिद्दीकी नावाच्या पीएसआयने शासकीय कामात अडथळा आणला या कलमाखाली खोटा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल.
13-12-14
मिड-डे चे पत्रकार शिरीष वाकटानिया यांच्यावर काल रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला.शिरीष आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून जात असताना एक गाडी अचानक त्याच्या गाडीसमोर लावली गेली.आणि त्यांना शिविगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला गेला.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या संदर्भात कांदिवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2014
बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे वार्ताहर अमिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला.पाटोद्यावरून जामखेडकडे दुचाकीवरून जात असताना विक्रम गर्जे यांनी हा हल्ला केला.बातम्या देतोस काय भडव्या अशा शिव्या देत हा हल्ला झाल्याचे शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
24 डिसेंबर 2014
सोलापूर जिल्हयातील टेंभुर्णीत घडली.टेंभुर्णीचे एकमतचे वार्ताहर प्रवीण तुपसौंदर यांच्यावर आज गावातील एका जुगार किंगने भरचौकात हल्ला केला.या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून आरोपी फरारी आहेत.
24 डिसेंबर 2014
गोकुळनीती दैनिकाचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर काल रात्री तीन व्यक्तिंनी हॉकीस्टिकने हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकराणाची फिर्याद कदीम पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.आरोपी फरार आहेत.गेल्या दोन दिवसातला हा दुसरा हल्ला असून भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतरचा 23 वा हल्ला आहे.
—————————————————————————————————
महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या
2013 मधील प्रमुख घटनाः (६५)
11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,
एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,
65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,
अनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल
म हाराष्ट्रत पत्रकारांवर अखंडपणे हल्ले सुरू आहेत.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्या मागणीक़डं सरकार करीत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि विद्यमान कायद्याचा गुंडांना धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंतावाटावी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.2013 च्या जानेवारी ते नोव्हेबर या अकरा महिन्यात राज्यात दोन पत्रकांराचे खून झाले ( नरेंद्र दाभोळकर आणि जळगाव येथील नरेश सोनार ) एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आणि 65 पत्रकारांवर हल्ले झाले, ( यातील काही हल्ल्यात चाकू सारख्या तिक्ष्ण हत्यारांचा वापर केला गेला) पुर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरी यांच्या साऱ्या कुटुंबावरच ऍॅसिड टाकून त्याला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला गेला.हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्यावरच दरोडा,ऍटॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला.त्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाब आणला गेला.इतर प्रकरणातही केवळ बातमी दिल्यामुळेच हल्ले झाले आहेत.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने बीड,परभणीत भव्य मोर्चे काढले गेले.8 मे रोजी पनवेल ते मुंबई अशी मोटार रॅली काढली गेली,16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला.जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले अशा काही ठिकाणी समितीच्या सदस्यांनी जाऊन संबंधित पत्रकारांची भेट घेतली तसेच त्याना मद तही केली.
–2 जानेवारी 13- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला
3 जानेवारी 13 – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद
8 जानेवारी 13- उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला
9 जानेवारी 13- आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी
11 जानेवारी13 – कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले
13 जानेवारी 13 -उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण
13 जानेवारी13- नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण
16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या
16 जानेवारी 13- पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या
8 फेब्रुवारी 13- बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.
10 फेब्रुवारी 13- नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.
4 मार्च 13 – सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
5 मार्च 13- – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले
12 मार्च 13 – पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी
13 मार्च 13- गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला
14 मार्च 13 – उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला
19 मार्च 13- नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी
21 मार्च 13- निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल
27 मार्च 13- टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण
28 मार्च 13- सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला
29मार्च 13- राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार
30मार्च 13- एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की
31मार्च 13- ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण
1 एप्रिल 13 – सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी
2एप्रिल 13 – वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या
2 एप्रिल 13- मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण
4 एप्रिल 13- पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.
6एप्रिल 13- न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण
13 एपिॅल13- बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण
16एप्रिल 13- नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण
25 एप्रिल 13- विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल
1 मे 13- येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला
3 ंमे 13 – झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम
7 मे 13 गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर
9 मे 13 सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.
22जून 13 इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. ब ातमीचा राग
26 जून 13 माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.
28 जून 13 आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव यांना धक्काबुक्की.
3 जुलै 13 – नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.
27 जुलै 13- संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.
28 जुलै 13 – पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड
हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.
20 ऑगस्ट 13- साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही मारेकरी सापडलेच नाहीत.
31 ऑगस्ट 13- नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल
थकबाकीची बातमी दिल्याने राग.
31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू
माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.
4 सप्टेंबर 13- आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे यांना मारहाण
4 सप्टेंबर 13 पर भणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची दिलीप बनकर यांना मारहाण
6 सप्टेंबर 13- जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.
16 सप्टेंबर 13- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती
तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर
21 सप्टेंबर 13- नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.
1ऑक्टोबर 13- जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन तास घरात डांबले.
1 ऑक्टोबर 13- नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.
2 ऑकटोबर 13- मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना मारहाण,धक्काबुक्की.
5 ऑकटोबर 13- आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून
जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.
7 ऑकटोबर 13 – चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.
8 ऑक्टोबर 13- आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची मोडतोड.
22 ऑक्टोबर 13- अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला कव्हरेज करतानाच मारहाण
30 ऑक्टोबर 13- यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.
9 नोव्हेंबर 13- हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच
खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.
14 नोव्हेंबर 13- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.
25 नोव्हेबर 13- कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.
30 नोव्हेबर 13 माजलगाव येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य
विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.
———————————————————————————————————
महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या
2012मधील प्रमुख घटनाः (४५)
राज्यात या वर्षात एकूण 59 पत्रकारांवर हल्ले झाले. त्यातील प्रमुख 43
घटनेत ज्या 51 पत्रकारांवर हल्ले झाले त्याची माहिती येथे दिली आहे.ज्या
घटनांची नोंद पोलिसात झालेली नाही अशा काही
—————————————————————————————————
1) दिनाक 1 जानेवारी- रायगड जिल्ह्यातील उरण येथील स्टार माझा चे पत्रकार आशिष धरत हे ओएनजीसी मध्ये लागलेल्या आगीचे चित्रिकरण करीत असताना तेथील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीरपीएफच्या जवानांनी त्यांना धक्काबुक्की केली.अर्वाच्च शिविगाळ केली.कानशिलावर पिस्तूल ठेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.पत्रकारांनी उरण पोलिसात तक्रार दिली.कारवाई काहीच झाली नाही.
लोकमत ,जळगाव
2)दिनांक 17 जानेवारी ः जळगाव येथील लोकमतच्या कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.एका घटस्फोटीत महिलेला तिच्या आईऩेच वेश्या व्यवसायाला लावले.अशा आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते.त्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगितले गेले.पोलिसांत तक्रार दिली.कारवाई शून्य.
महाराष्ट्र टाइम्स ,मुंबई
3) दिनांक 27 जानेवारीः मकाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई येथील कार्यालयावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी प्रश्नार्थक चिन्ह टाकून मटाने छापली होती.बातमी तथ्यहिन असल्याचे कारण सांगत हा हल्ला झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे होते.हल्लेखोरांना अटक झाली पण मुख्य चिथावणीखोरांपर्यत पोलिस पोहचू शकली नाही.
–प्रवीण गोरेगावकर, गोरेगाव -रायगड
4) दिनांक 25जानेवारीःरायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील पत्रकार प्रवीण गोरेगावकर यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांनी एक व्यगात्मक लेख कोकणातील एका दैनिकात लिहिला होता.तो आपल्यालाच उद्ेशून लिहिल्याच्या समजातून त्यांच्यावर हल्ला झाला.गोरेगावकर हे अपंग आहेत.हल्लेखोर त्यांना मारहाण करीत असताना लंगड्या तुला बघून घेऊ अशा धमक्या देत होते.पोलिसात तक्रार.कारवाई नाही.
–दोन पत्रकार, पुणे
5) दिनांक 30 जानेवारी ःपुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी संभाजी पुलावर वाहतूक नियम मोडीत पोलिसांवर हल्ला केला.त्याचे चित्रांकण करणाऱ्या पत्रकाराांवरही लष्करातील हे भावी इंजिनिअर तुटून पडले.पोलिसात तक्रार दाखल पण कारवाई नाही
विशालसिंग करकोटक,औरंगाबाद
6) दिनांक 11 फेबु्रवारी ः औरंगाबाद येथील इंडिया टीव्हीचे पत्रकार विशालसिंग करकोटक यांना पैठण येथील रेती माफियांनी जिवे मारण्याची धमकी दिली. वाहिनीवर बातमी दाखविल्याच्या रागातून ही धमकी दिली.आौरंगाबादच्या पत्रकारांनी दबाव आणल्यानंतर गुन्हा दाखल.
हर्षद कशाळकर,िअ़लबाग
7) दिनांक 15फेब्रुवारीः जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या वेळेस आमदार जयंत पाटील पोलिसांच्या अंगावर झावून गेले.त्याचे चित्रिकऱण करणाऱ्या इटीव्हीचे हर्षद कशाळकर आणि आयबीएन-लोकमतचे मोहन जाधव यांना जयंत पाटलांची दमदाटी.पाहून घेतोची धमकी.पोलिसात तक्रार नाही
करण नवले,श्रीरामपूर
8) दिनाक 17 फेब्रुवारीः नक्षर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गावकरीचे उपसंपादक करण नवले यांना पोलिसांनी जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या वेळेस लाथा-बुक्यांनी मारहाण केली.या घटनेच्या विरोधात पत्रकारांनी आंदोलन केल्यानंतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.तिधे निलंबित केले.पोलिसांवर गुन्हेही दाखल केले गेले.
सुरेश पाटील ,उदगीर
9) दिनांक 21 फेब्रुवारीः इा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ज्येष्ट पत्रकार सुरेश पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकून त्यांचे अपहरण केले गेले.त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करू न त्यांना गावाबाहेर सोडले गेले.आरोपींमध्ये एक महिला होती.सुरेश पाटील जखमी अवस्थेत पोलिसात जाण्यापूर्वीच संबंधित महिला पोलिस ठाण्यात गेली.तिच्या तक्रारी वरून सुरेश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.सुरेश पाटील यांची तक्रार दाखल करून घ्यायलाही पोलिसांचा नकार
–अनिल कसबे ,नांदेड
10)दिनांक 24 फेब्रुवारी ः नांदेड येथील देशोन्नतीचे पत्रकार अनिल कसबे यांना शिवसेनेच्या खासदारांनी जिवे मारण्याची मोबाईलवरून धमकी.देशोन्नतीचे कार्यालय जाळण्याचीही धमकी.पोलिसांचा पत्रकारांशी असहकार.गृह मंत्र्यांनी बोलल्लयानंतर तक्रार दाखल पण नंतर प्रकरण दडपण आणून मिटविले गेले.
–तीन पत्रकार,कर्जत (जिल्हा नगर)
11)दिनांक 26 फेब्रुवारीःनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तीन पत्रकारांना वाळु माफियाकडून बेदम मारहाण.
–पनवेल
12)दिनांक 27 फेब्रुवारी ःपनवेलनगरपालिकेच्या सभेतून स्थानिक पत्रकारांना अपमानास्पदरित्या बाहेर काढले गेलेेेे.पालिकेच्या सभेला पत्रकारांना बोलावण्याची पंरपरा असताना अशी घटना पालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली.पनवेल पालिेकेत कॉग्रेसची सत्ता आहे.
–राजेश टोळये,सोलापूर
13) दिनांक 28 फेब्रुवारीःसोलापूर येथील दैनिक सुराज्यच्या अंकात बळी तो कान पिळी या मथळ्याखाली एक लेख प्रसिध्द झाला होता.या लेखामुळं पोलिसांची बदनामी झाल्याचे कारण सांगत पोलिसांना संपादक राजेश टोळये यांच्यावर गुन्हा दाखल केला.कार्यालयात घुसून त्यांना अटक केली.रात्रभर त्यांना पोलिस कोठडीत डांबून ठेवण्यात आले.दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले गेले.तेथे त्यांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.पोलिसाच्या दाव्य़ात त़थ्य नसल्याने न्यायालयाने त्यांची मागणी धुडकावून लावत टोळे यांना जामिन मंजूर केला.टोळे यांना पोलिस कोठडीत ठेऊन अद्दल घडविण्याच ी पोलिसांची योजना होती.
शैलेश पालकर , पोलादपूर
14) दिनांक 1मार्चः आयगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला.गंभीर दुखापत झाली.पालकर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता तेच आरोपी आहेत अशा पध्दतीने त्यांनाच पोलिस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक झाली नाही.
–तिरूपती चितियाला,गडचिरोली
15) दिनांक 6 मार्चः गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यात टेकाळा ताला या परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू होती.सिरोंजा येथील सकाळचे पत्रकार तिरूपती चितियाला हे फोटो काढण्यास गेले असता एका पोलिस उपनिरिक्षकाने त्यांच्यावर हल्ला केला.त्याच्याविरोधात कोणतीच कारवाई नाही.आर.आर.पाटील हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.
—ठाणे
16)दिनांक 7मार्च ः ठाणे मनपात महपोर -उपमहापोर यांच्या निवडणुकीच्या वेळेस आयुक्त आर .ए.राजू यांनी पत्रकारांना प्रवेश नाकारला.पत्रकारांशी हुज्जत घातली.त्याच्य् ा निशेधार्थ पत्रकारांची आंदोलन केलं.पत्रकारांच्या अवमान प्रकरणाचा युतीने निषेध केला.
–सातारा
17) दिनांक 11 मार्चः पतंगराव कदम यांच्या पत्रकार परिषदेत लोकमतचे पत्रकार मोहन म्हसकर आणि स्टार माझाचे राहूल तपासे या पत्रकारांनी पतंगराव अडचणीत येतील असे काही प्रश्न विचारले.त्यावरून पतंगराव भडकले आणि तू कोणत्या पेपरचा आहेस,तुझ्या मालकाला बोलतो,तुझा हिशोब करतो,तुझी नोकरी घालवितो असा दम देत पत्रकारांचा अवमान केला.पत्रकारंाशी एका मंत्र्याने केलेल्या या वर्तनाचा पत्रकारांनी निषेध केला.कदमांवर कायदेशीर कारवाई होण्याचा प्रश्नच नव्हता.
–राजकुमार भगतचिरणेर, उरण
18) दिनांक 12 मार्चः उरण येथील सकाळचे बातमीदार राजकुमार भगत यांना ऱाऊत नावाच्या इस्टेट एजंटने मारहाण केली.त्या विरोधात पोलिसांत तक्रार.उरण पोलिसात गुन्हा दाखल.
—सतीश मोहिते ,नांदेड
19) दिनाकं 19ः नांदड येथील सिडको भागातले डॉ.सूर्यकांत पठ्ठेवाड यांच्या चुकीच्या उपचारामुळे एका छोट्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पत्रकार सतीश मोहिते यांनी स्थानिक चॅनेलवरून दिल्याने पठ्ठेवाड य़ांनी पोलिसात तक्रार.पोलिसांनी मोहिते यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून त्यंाना त्रास दिला.
–बळवंत ढगे ,वर्धा
20) दिनांक 23 मार्च ः क वर्धा येथील पत्रकार बळवंत ढगे यांनी तेथील शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही माहिती मागितली असता संस्था चालक राजेंद्र शर्मा यांनी ढगे यांना मारहाण केली.या संबंधात ढगे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
–राकेश कुटे, पुणे
21) दिनांक 31 मार्च ः णे पुण़े येथील केळकर रस्त्यावर दोन तरूण अन्य एका तरूणाला मारहाण करीत असल्याचे पाहिल्यानंतर सकाळचे छायाचित्रकार राकेश कुंटे यांनी पह्ल्यिानंतर त्यानी मारहाणीची दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपायला सुरूवात केली.ते पाहून संतापलेलया अजय खेडकर आणि कबीर मारवाडी यांनी कुंटे यांना मारहाण केली.त्यांच्या कॅमेऱ्याची मोडतोड केली.आणि ते पसार झाले.गुन्हा दाखल.
—आनंद शर्मा,मंबई
22)दिनाक 12 एप्रिल ः म मुंबई येथील दादर भागात एक अनाधिकृत होॅटेल चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवभारतचे पत्रकार आनंद मिश्रा याच्यावर हॉटेल मालकाकडून निघृण हल्ला झाला.त्यात मिश्र गंभीर जखमी झाले.दुसऱ्या दिवशी ़आऱ.आर.पाटील यांनी दादर भागाला भेट देऊन अनाधिकृत बांधकामे हटविली.
–दीपक बारकुल,येरमाळा-उस्मानाबाद
23) दिनांक 23 एप्रिल ः उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील लोकमतचे पत्रकार दीपक बारकुल यांना एका हॉटेल व्यावसायिकाक डून मारहाण.आरोपीचे नाव अनिल माधवराव बारकुल असे आहे.पत्रकाराने हॉटेलचे फोटो काढल्याच्या रागातून ही घटना घडली.आरोपीवर कारवाई नाही.
–शिवपूर -खेड
24) दिनांक 30 एप्रिलः़खेड येथील एका टोलनाक्याची मोडतोड आमदार संजय पाटील यांचे समर्थख करीत होते.त्याचे छायांकन करणाऱ्या आयबीएन लोकमत वाहिनीच्या पत्रकारास मारहाण.आरोपीवर कोणतीच कारवाई नाही.
—चाणक्य,बीड
25) दिनांक 2 मे ः ब बीड येथील चाणक्य दैनिकाचे संपादकांवर धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.एका वेबसाईटवर हिंदु देव-देवतांची बदनामी होईल अशी छायाचित्रं होती.ती वेबसाईट बंद करावी अशी मागणी एका नागरिकाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली होती.त्यासंबंधिची बातमी चाणक्यने छापल्याने वेबसाईटवर कोणताही गुन्हा न दाखल करता पोलिसांनी चा़णक्यच्या ंसपादाकांवरच गुन्हा दाखल केला.
–चेतम भैराम, भंडारा
26) दिनांक 3 मेः भंडारा येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार चेतन भैराम यांना शिक्षण सम्राटाकडून जिवे मारण्याच्या धमक्या.शिक्षण संस्थेतील गैरकारभाराच्या विरोधात भैराम यांनी लेख माला लिहिली होती.त्यामुळे संतापलेल्या शिक्षण सम्रटाने हा प्रकार केला.
–राजू भगत ,उरण जिल्हा रायगड
27) दिनांक 20 मेः उऱण तालुक्यातील चिरणेर येथील पत्रकार राजू भगत यांच्यावर शेकापच्या गुडंाचा प्राणघातक हल्ला.शेकापच्या विरोधात बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांत तक्रार.
–अच्छाड
28) दिनांक 22 मे ः गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्यावर भ्रष्टाचाराचे बिंग फोडण्यासाठी गेलेल्या सकाळच्या प्रतिनिधीला एस.सी.शुक्ला या आरटीओ इन्स्पेक्टरने गाडीत डांबून ठेवले.धक्काबुक्की केली.जीवे मारण्याची धमकीही दिली.
–प्रवीण गायकवाड.जऴगाव
29)दिनांक 27 मेः जळगाव येथे कोळी समाजाच्या आंदोलनाचे चित्रिकरण कऱणाऱ्या भास्करचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड आणि दिव्य मराठीचे आबा मकासरे यांना मारहाण.कॅमेऱा तोडण्याचे प्रयत्न.तक्रार दाखल
–अनिल महाजन,पाचोरा
30) दिनांक 11 जूनः छाचोरा येथील पत्रकार अनिल बाबूलाल महाजन यांनी वाळू ठेकेदाराच्या विरोधात बातम्या दिल्याने संबंधित ठेकेदाराचा वाळू ठेका रद्द झाला.त्यामुळे संतापलल्या रेती माफियाचा महाजन यांच्यावर हल्ला .महाजन गंभीर जखमी.
–अस्लम पोपटे वाशिम
31) दिनांक 15 जून ः ऊा वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील लोकमत समाचारचे पत्रकार अस्लम पोपटे यांच्यावर पोलिस कॉन्स्टेबल तायडे यांनी हल्ला केला.पोपटच्या कानाला चावा घेतला.उलट पोपटवर गुन्हा दाखल केला.रस्त्यात गाडी उभी केल्याच्या कारणावरू न ही मारहाण झाली.
–धनंजय पार्टे,माणगाव जिल्हा रायग़ड
32) दिनांक 25 जून ः रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील लोकमतचे पत्रकार धनंजय पार्टे यांच्यावर खुनी हल्ला.शेकापचे पाच-पन्नास कार्यकर्तेपार्टे याच्या कार्यालयात घुसले त्यांना मारहाण केली.या जमावात काही महिला होत्या.महिलांनी पार्टे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली.अंजली पवार यांनी ही तक्रार दिली.जिल्हा पऱिषदेचे सदस्य ज्ञानदेव पवार यांच्या विरोधात पार्टे यांनी तक्रार दाखल केली.गुन्हा दाखल झाला पण पवार यांना अटक नाही.बामणोली येथील शाळेचे बांधकाम केवळ 25 टकक्के पूर्ण झालेले असताना ते शंभर टक्के झाल्याचे दाखवून त्याचे बिल उालले गेले.याची माहिती पार्टे यांनी माहितीच्या अधिकारात काढून त्याची बातमी छापली होती.त्या रागातून हा हल्ला झाला.पार्टे यांच्यावर अलिबागच्या रूग्णालयात उपचार कऱण्यात आले.
–जीवन केणी,उरण
33) दिनांक 1जुलैः उरण येथील पत्रकार जीवऩ केणी यांच्यावर शेकापच्या गुंडाकडून हल्ला.बातमी देतोस काय म्हणत हा हल्ला झाला.जीवन गावंड,सुरेश राऊत,सुरेश पाटील यांनी हा हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दाखल
चार छायाचित्रकार, मुंबई
34) दिनांक 12 ऑगस्टः ट्टयानमार आणि आसाममधील घटनांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्यावतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळेस काही समाजकंटकांनी एबीपी माझा,न्यूज 24 तासआणि टीव्ही-9च्या तीन ओबी व्हॅन जाळल्या.तसेच छायाचित्रकारांवर हल्ले केले गेले.त्यात टाइम्सचे श्रीराम वेर्णेकर,द हिंदूचे विवेक बेंद्रे,मीड-डेचे अतूल कांबळे सकाळ टाइम्सचे प्रसांत सावंत जखमी झाले.माध्यमांचं कोट्यवधींचं नुकसान झालं.कारवाईच्या नावानं बोंब
–मधुकर ठाकूर,उरण जिल्हा रायगड
35) दिनांक 23 सप्टेंबर ः उऱण येथील पत्रकार मधुकर ठाकूर यांना घारापुरी येथील गुंडांकडून मारहाण.वृत्तसंकलनासाठी जाताना मोटार साईकल अडवून ही मारहाण झाली.उरण ठाण्यात तक्रार दाखल
–अरविंद जाधव,उदगीर
्र36)दिनांक 24 सप्टेंबर ःउदगीर येथील पत्रकार अऱविंद जाधव यांनी पोलिसांच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱणयात आला.त्यानंतर त्यांना कोठडीत डांबण्यात आले.पत्रकारांतर्फे निषेध.
–संजय मालानी,बीड
37)दिनांक 25सप्टेंबरः बीड येथील सुराज्य दैनिकाचे वृत्तसंपादक संजय मालानी यांच्यावर प्राणघातक हल्ला.हल्लेखोर तोंडाला काळे रूमाल बांधून आले होते.मालानी यांचा ओढ फुटला.पोय मोडला…27 टाके पडले.पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली.ते महिना भर तुरूंगात होते.एस.एम,देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
–भंडारा
38) दिनांक 28 सप्टेंबर ःदेशोन्नतीच्या भंडारा येथील कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.दसऱ्याच्या मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातमीच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांची भूमिका बघ्याची.पोलिसांनी दिली पत्रकाराला आत घालण्याची धमकी
–संतोष जाधव ,वर्धन जिल्हा रायगड
39) दिनांक 29 सप्टेंबर ः आयगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील पत्रकार संतोष जाधव यांच्यावर पोलिसांसमोरच गुंडांचा हल्ला.वरती जाधव यांच्यावरच गुन्हा दाखल.जिल्हा पत्रकार संघाने घेतली एसपींची भेट.
–ग़डचिरोली
40)दिनांक 8 ऑक्टोबर ः भचजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पत्रकार पैसे घेऊन बातम्या देतात असा आरोप केला.पत्रकार संघाने यााचा निषेध करीत गडकरीच्या राजीनाम्याची मागणी केली.
–नाशिरखान,नसिम शेख.बुलढाणा
41) दिनांक 11 ऑक्टोबरः बथलढाणा येथील पत्रकार नासिरखान आणि नसिम शेख यांच्यावर निलंबित पोलिस शिपाई शशी पवार आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला.पवार असे नाव दिसेल अशी फॅन्सी नेम प्लेट असलेल्या ऍक्टिव्हावरून दोन महिला पोलिस जात असताना त्याचे छायाचित्र पाठीमागुन कोणी तरी काढले आणि ते फेसबुकवर अपडेट केले.हे नासिरशेख आणि नसिम खानचे काम असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली.पोलिसात तक्रार झाली पण आरोपी शशी पवार पोलिस ठाण्यातून फरार झाला.
–विवेक केरूरकर,देगलूर
42)दिनांक 26 ऑक्टोबरः देगलूर येथील पत्रकार विवेक क ेरूरकर यांनी दसरा मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातम्यांवरू त्यांच्या कार्यालयास आग लावण्यात आली.दसरा मिरवणुकीच्या वेळेस देगलूरला दंगल झाली होती त्याच्या बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.केरूरकर यांचे मोठे नुकसान झाले.
–पी.रामदास,मुंबई
43) दिनांक 31 ऑक्टोबरः टी व्ही-9चे रिपोर्टर पी.रामदास आणि कॅमेरामन सचिन चिंदरकर हे कलर्स वाहिनीच्या कार्यालयासमोर आऱपीआयचे आंदोलन कव्हर करीत असतानाच दगडफेक सुरू झाली तिाा कटा पी रामदास यांनी आखल्याचा आरोपावरून टीव्ही-9च्या दोन पत्रकारांच्या विरोधात भादंवि 120 बी अंतर्गत कारवाई.गुन्हा दाखल.गुन्हा मागे घेण्याचे गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरीही तशी कारवाई नाही.
पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भातली वरील सारी माहिती वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या किंवा जिल्हा पत्रकार संघांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे जमा केली गेलेली आहे.मला पूर्ण कल्पना आहे की,ही माहिती परिपूर्ण नाही राज्यात पत्रकारांवर यापेक्षा जास्त हल्ले झालेले आहेत .वरील घटनांखेरीज पत्रकारांवरील हल्लयाच्या अन्य काही घटनांची माहिती आपणाकडे असेल किंवा आपण स्वतःशिकार झाला असाल तर अशी माहिती कृपया मला फोनवर किंवा इमेलवर कळवावी. पत्रकार संऱक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे.अशी कोणतीही माहिती सरकारी यंत्रणेकडे नाही ही माहिती केवळ आपल्याकडंच आहे.
माहिती देण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक 9423377700असा आहे.
एस.एम.देशमुख,
निमंत्रक
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती
(माझ्या ब्लॉगवरील पत्रकार हल्ल्याच्या संदर्भातली माहिती अन्यत्र वापरताना एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवरून असा उल्लेख करणे कॉपी राईट कायद्यान्वये अनिवार्य आहे.)
———————————————————————————————————————————