पिलिभीत – उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून, रविवारी रात्री एका पत्रकाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर या पत्रकारावर रविवारी रात्री चौघांनी हल्ला केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. हैदर हा इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असून, त्याचा एका बातमीवरून वाद झाला होता. त्याला हल्लेखोरांनी रविवारी रात्री एक बातमी देण्याचे सांगून बोलावून घेतले आणि त्याच्यावर हल्ला केला. मारहाण करून त्यांनी त्याला बंदुकीचा धाक दाखवून मोटारीला बांधले आणि 100 मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत पत्रकाराला जिवंत जाळल्याची आणि गोळीबार केल्याची घटना घडलेल्या आहेत.