एका दिवसात दोन हल्ले,एक आत्महत्या…
माध्यमाच्या दुनियेतून ज्या बातम्या येत आहेत त्या नक्कीच पत्रकारांची उमेद वाढविणाऱ्या नाहीत,तर पत्रकारांना नैराश्येच्या गदेर्त लोटणाऱ्या आहेत.युपीत आठ दिवसात एका पत्रकाराला जिवंत जाळलं जातं,एकावर पाच गोळ्या मारल्या जातात,आणि तिसऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला जातो.युपीतील या घटनांची चचार् माध्यमात सुरू असतानाच महाराष्ट्रातील परिस्थिती समाधान मानावी अशी नाही.महाराष्ट्रात आज नाशिकच्या दीव्य मराठीच्या कायार्लयावर हल्ला करून संदीप जाधव या पत्रकाराला बेदम मारहाण केली गेली.जळगावमधील पोलिस व्हिजन साप्ताहिकाचे गोपाळ मांद्रे यांच्यावरही हल्ला केला गेला तर जळगावमधीलच एक तरूण हेमंत पाटील याने आत्महत्या केली.जीवनाकडं आशावादीदृष्टीनं बघण्याचा उपदेश कऱणारे पत्रकारच हल्ली आत्महत्या करीत असतील तर पत्रकारिते नक्कीच काही तरी बिघडलं आहे असं म्हणावं लागेल.बाहेरचे दबाव,नोकरी टिकविण्याची काळजी,घरच्या विवचंना , कामाचे टेन्शन आणि कमालीच्या अस्तिरतेमुळं नैराश्यं यावं अशी स्थिती आहे.गोपाळ पाटील सारख्या तरूण आणि उमदया पत्रकारानं आत्महत्या का केली याची माहिती बाहेर येईलच पण एकूणच स्थिती काळझी वाटावी अशी आहे.रोजच्या या टेन्शनं पत्रकारांचे बीपी,शुगर वाढायला लागलेत.अकोल्याचा एक तरूण पत्रकार आहे.चार दिवसांपुवीर् त्याची छाती दुखायला लागली आणि एन्जोग्राफी केली तेव्हा चार ब्लाॅकेज निघाले.मग एन्जो प्लास्टी वगैरे करावे लागले त्यात मुलाीच्या अॅडमिशनसाठी कवडीकवडी जमविलेली पुंजी संपून गेली.पत्रकारांच्या या साऱ्या वेदनांची सरकारला पवार् नाही,समाज दखल घेत नाही,वेळ आली की,मालक वाऱ्यावर सोडतात अशा स्थितीत पत्रकारांनी एकत्र येत एकमेकांना हात देण्याशिवाय पयार्य उरत नाही.
पाटील यांना पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेतफेर् विनम् श्रध्दांजली.