अलिबाग- रोहा तालुक्यातील पाले येथे एप्रिल 2012 ंंमध्ये झालेल्या एका खून खटल्यात माणगाव सत्र न्यायालयाने आज शेकापच्या 17 कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.शेकापच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचा राग मनात धरून एका पालखी सोहळ्याच्या वेळेस पालेतील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुफान मारामारी झाली होती.यावेळी तीक्ष्ण हत्यारांचा सर्रास वापर करण्यात आला होता.या मारामारीत ऱाष्ट्रवादीचे नथुराम खांडेकर यांचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले होते.या प्रकरणी शेकापच्या 17 जाणांना अटक करून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल कऱण्यात आले होते.या खटल्याची सुनावणी माणगाव येथील सत्र न्यायालयात झाली.न्यायालयाने आज शेकापच्या 17 जणांना जन्मठेप ठोठावली आहे.एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आरोपीना जन्मठेप होण्याची ही घटना जिल्हयात अपवादात्मक समजली जात आहे.