अलिबाग- स्त्रीने अन्यायाच्या विरोधात नेहमीच आवाज उठविला पाहिजे आणि आपल्यातील न्यूनगंड काढून जगायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केले आहे.काही लोकांच्या विकृतीमुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झालेली आहे.ही विकृती घालविण्यासाठी स्त्रीने आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अलिबाग प्रेस असोसिएशनच्यावतीने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमास महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते,पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या.यावेळी सुनीता गायकवाड,वीणा शेटे,अश्विनी वास्कर,ललिता बंगेरा ,लतिका गुरव या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य कऱणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला