अलिबाग- रायगडसह संपूर्ण कोकणातील ढगाळ वातावरण आणि कालपासून सुरू झालेल्या पावसाचा मोठा फटका आंबा पिकाला बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.कोकणात यंदा आब्याला चांगला मोहोर आला असून अनेक ठिकाणी फळधारणा देखील झालेली आहे.अशा स्थितीत आलेल्या अवकाळी पावसाने आब्यावर अन्ग्रोस नामक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळावर काळे डाग पडण्याची आणि त्यामुळे प्रतवारी घसऱण्याची भिती व्यक्त केली जात आहे.जिथे फळधारणा झालेली नाही अशा झाडावरील मोहरावर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहर झडण्याची भितीही शेतक री व्यक्त करीत आहेत.मुरूड तालुक्यात वातावऱणातील बदलाचा परिणाम आब्यावर जाणवायला लागला असून तेथे भुरी रोग,तुडतुड्या रोग आणि फळमाश्यांचा फैलाव झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप भड यांनी दिली भुरी रोगाच्या निंयत्रणासाठी कार्बेन डॅझमची फवारणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.किडीच्या वाढीसाठी कोंदड हवामान पोषक ठरते त्यामुळे बागेत पुरेसा सूर्यप्रकाश ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.आब्या बरोबरच सुपारी,वाल आणि चिंचेच्या पिकांनाही पावसाचा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अरबी समुद्रात पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा अवकाळी पाऊस पडत असून येत्या 24 तासात हवामान ढगाळ राहून किनारपट्टीत पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शोभना देशमुख – रायगड