जंजिरा मुक्ती दिन साजरा
इ रूग्णालयासाठी अलिबागच्या सरकारी रूग्णालयाची निवड
रायगडमध्येही स्वाईऩ फ्ल्यूचे रूग्ण
वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
—————————————————————-
देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी मुरूड जंजिरा संस्थानातील जनतेला मात्र स्वतंत्र होण्यासाठी नंतर पाच महिने प्रतिक्षा करावी लागली होती.मुरूडचा नबाब स्वतंत्र भारतात विलीन व्हायला तयार नव्हता.नबाबाचा ओढा पाकिस्तानकडे होते.त्यानदृष्टीने नवाबाचे डावपेच सुरू होते.ही गोष्ट जेव्हा रायगडमधील जनतेच्या ध्यानात आली तेव्हा जिल्हयातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली त्याविरोधात मोठा लढा उभारला.मुरूड जंजिरा ताब्यात घ्यायचे या उद्देशानं स्वातंत्र्य सैनिकांनी श्रीवर्धनकडे कुच केली.मात्र फारसा प्रतिकार न होताच म्हसळा आणि श्रीवर्धन ही संस्थानातील दोन्ही प्रमुख शहरं स्वातंत्र्यवीरांच्या ताब्यात आली.ही गोष्ट जेव्हा नबाबाला समजली तेव्हा त्याने 31 जानेवारी 1948 रोजी मुंबईला जाऊन तत्कालिन मुख्यमत्र्यांसमोर सामिलनाम्यावर स्वाक्षरी केली.कसलाही रक्तपात न होता मुरूड संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.मात्र 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गंाधी यांची हत्त्या झाली होती.त्यामुळे संस्थानातील जनतेला आपला आनंद साजरा करताच आला नाही.नंतरच्या काळातही या लोकलढ्याची उपेक्षाच झाली.2008 पासून रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून मुरूड जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात येत आहे.यंदाही 31 जानेवारी रोजी जंजिरा मुक्ती दिन मोठ्या उत्सहात साजरा कऱण्यात आला.त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरातून मिरवणूक काढली होती.शहराच्या मध्यवर्ती चौकात झेंडावंदनही कऱण्यात आले.या लढ्यात सहभागी झालेल्या वीरांना स्वातंत्र्य सैनिकाचा द र्जा द्यावा आणि हैदराबाद मुक्ती दिनाच्या ध र्तीवर जंजिरा मुक्ती दिन देखील शासकीय पातळीवर साजरा करावा अशा मागण्या रायगड प्रेस क्लबने केल्या आहेत.दुसरीकडे अन्य एका कार्यक्रमात बोलताना महाडचे आमदार भरत गोगावले यांनी जंजिरा मुक्ती लढ्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी केली आहे.
इ रूग्णालयासाठी अलिबागच्या सरकारी रूग्णालयाची निवड
सरकारच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन प्रणाली अंतर्गत इ रूग्णालयासाठी अलिबागच्या सरकारी रूग्णालयाची निवड कऱण्यात आल्याने अलिबागचे सरकारी रूग्णालय आता हायटेक होण्याबरोबरच रूग्णालयातील रूग्ण सेवा आणि सुविधांमध्ये देखील सुधारणा होणार आहेत.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणारा हा प्रखल्प यशस्वी झाल्यास राज्यातील अन्य जिल्हा रूग्णालायात देखील अशाच पध्दतीने यंत्रणा कार्यान्वित कऱण्यात येणार आहे.
आरोग्य व्यवस्थेत अधिक गुणवत्ता यावी आणि रूग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी रूग्णालयाची कार्यप्रणाली पेपरलेस कऱण्याच्या उद्देशाने इ रूग्णालायाची योजना आखली गेली आहे.या प्रकल्पासाठी 60 लाख 94 हजार 353 रूपयांची सामुग्री उपलब्ध झाली आहे.त्यात 58 संगणकांचा समावेश आहे.नव्या व्यवस्थेनुसार ओपीडीत रूग्णांना केस पेपर काढावा लागणार नाही.रूग्णाची नोंद संगणकावर होईल.त्यानंतर रूग्णाला एक युनिक आय डी कोड दिला जाईल.या कोड नंबरवर रूग्णावर करण्यात येणाऱ्या उपचाराचा सारा लेखाजोखा नोंदविला जाईल.रूग्णाला डिस्चार्ज देताना त्याला फाईल दिली जाणार नाही मात्र परत हा रूग्ण आला आणि त्याने आपला कोड नंबर सागितला तर सर्व्हरमध्ये सेव्ह झालेली त्याची सारी माहिती मिळू शकेल.या बरोबरच दररोज रूग्णालयात किती रूग्ण दाखल झाले,किती डिस्चार्ज झाले,किती रेफऱ झाले,कोणत्या वॉर्डात किती आणि कोणते रूग्ण आहेत याची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सध्या जिल्हा रूग्णालायातील डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
–रायगडमध्येही स्वाईऩ फ्ल्यूचे रूग्ण
रायगडमध्येही स्वाईन फ्ल्यूने आतापर्यत दोघांचा बळी घेतला असून पनवेलमध्ये स्वाईन फ्ल्यूचे तीन पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत.12 संशयित रूग्णावर उपचार सुरू आहेत .त्यातील एका रूग्णावर अलिबागच्या शासकीय रूग्णालायत उपचार सुरू आहेत.स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासकीय रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी स्वंतंत्र कक्ष उभारण्यात आला असून खाजगी रूग्णाल्यात देखील रूग्णांना भरती करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.स्वाईन फ्ल्यूचा फैलाव टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे.स्वाईन फ्ल्यूबद्दल जनतेला माहिती व्हावी यासाठी प्रचार मोहिमही राबविली जात आहे.
– वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव साजरा
कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव शिवरात्रीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पध्दतीने साजरा कऱण्यात आला.छबिना उत्सवाच्या निमित्तानं सभोवतालच्या गावातील ग्रामदेवता वाजत-गाजत वीरेश्वर महाराजांच्या भेटीला आणल्या जातात.सर्वात उशिरा येते ती,उन्हेरीची झोलाईमाता.झोलाईमाता आल्यानंतर विधिवत गोंधळ घातला जातो.त्यानंतर सर्व पालख्यांसह वीरेश्वर महाराजाची मिरवणूक काढली जाते.ढोल-ताशाच्या गजरात काठ्या नाचविल्या जातात.रात्री उशिरापर्यत ही मिरवणूक सुरू असते.कोकणाच्या विविध भागातून आलेले हजारो लोक या मिरवणुकीत सहभागी होतात.यावर्षी देखील छबिना उत्सवासाठी हजारो लोकानी ग र्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
म हाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 368 वी जयंती जिल्हयात विविध उपक्रमाने मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यक्रम रायगडावर झाला.तेथे हजारो शिवभक्तांनी छत्रपतींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी दिवसभर रायगड दणाणून गेला होता.शिवजयंती निमित्त पेण शहरातही मिरवणूक काढण्यात आली होती.त्यात पंरपरागत वेषातील मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अलिबागमध्ये नगराध्यक्षांसह असंख्य शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.प्रतापगड ते रायगड अशी शिवज्योत काढण्यात आली होती.तिचे महाडमध्ये स्वागत करण्यात आले.महाडमध्येही महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.जिल्हयातील अन्य शहरात जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते.
दीड महिन्यात 7 लाचखोर अटकेत
लाचखोरीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उघडलेल्या धडक मोहिमेत 2015च्या पहिल्या दीड महिन्यात 7 लाचखोरांना रंगेहात पकडण्यात आले आहे.गेल्या चार वर्षात रायगड विभागाने केलेल्या कारवाईत 81 अधिकारी,कर्मचारी,लोकप्रतिनिधी लाच घेताना पकडले गेेले आहेत.पकडलेल्या अधिकाऱ्याकडून कोट्यवधीची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे.एकट्या न गररचना विभागातील तीन अधिकाऱ्यांकडून जवळपास तीन कोटी रूपयाची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईमुळे जिल्हयातील लाचखोर अधिकाऱ्यांना धडकी भरली असून सामांन्य जनता लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांचे अभिनंदन करीत आहेत.
– शोभना देशमुख , अलिबाग-रायगड