मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाचे
रेंगाळलेले काम गती घेणार
अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाचे रेंगाळलेले काम 30 मे पर्यत मार्गी लागेल असा विश्वास बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली दोन महिने ठप्प पडलेले आहे.त्यामुळे कोकणातील पत्रकारांनी नुकतेच पेण येथे आंदोलन केले होते.त्याची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मार्च 2016 पर्यत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.कर्नाळा अभयाऱण्याचा विषय देखील मार्गी लावला जाईल आणि ते काम देखील जून 16 पर्यत पूर्ण केले जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी दरमहा आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.