अलिबाग- रायगड जिल्हयातील वाळित प्रकऱणांचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा महत्वपूर्ण निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने रायगडमधील वाळित टाकण्यात आलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठ वर्षात जिल्हयात वाळित टाकण्याचे 28 प्रकार नोंदविले गेले आहेत.त्याबद्दल न्यायालायने वाळित टाकण्याची समाजाची हिंमतच कशी होते असा संतप्त सवाल सरकारला केला आहे.
जगन्नाथ मल्हारी बागवे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना वरील आदेश दिले आहेत.जगन्नाथ बागवे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत सूचक आणि अनुमोदक म्हणून सहया केल्याने संतापलेल्या त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर आठ वर्षांपूर्वी बहिष्कार टाकला होता.या प्रकराणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत त्यांनाही अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.न्
रायगड जिल्हयात सातत्याने सामाजिक बहिष्काराचे प्रकार घडत असल्याने त्याविरोधात कायदा करावा अशी मागणी केली जात आहे.