मराठी पत्रकार परिषद या आपल्या मातृसंस्थेनं गेल्या वर्षी 75 वर्षे पूर्ण केली आहेत.या 75 वर्षाचा परिषदेचा इतिहास जेवढा रोमहर्षक तेवढाच संघर्षमय आहे.अनेक मान्यवर पत्रकारांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवून परिषदेला नावलौकि क मिळवून दिलेला आहे.त्या सर्व अध्यक्षांचा परिचय,त्यातील काही अध्यक्षांची आजच्या काळातही लागू होणारी भाषणं,परिषदेने पत्रकारांच्या हक्कासाठी लढलेले लढे,परिषदेच्या स्थापनेचा इतिहास,परिषदेचे प्रकल्प,परिषदेला कराव्या लागलेल्या कोर्ट कचेऱ्यांची माहिती,परिषदेचे उपक्रम तसेच मुंबईतील परिषदेच्या जागेचा वाद,नाशिकच्या पत्र प्रबोधिनीचा वाद या सर्व विषयांंंंबद्दलची माहिती या ग्रंथात असणार आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी सतत दोन वर्षे खपून अत्यंत परिश्रमपुर्वक ही माहिती संकलित केली आहे.400 वर पानांच्या या ग्रंथाची किंमत 600 रूपये असली तरी प्रसिध्दीपूर्व नोंदणी केल्यास हा ग्रंथ 500 रूपयांना उपलब्ध करून दिला जाईल.
प्रत्येक मराठी पत्रकारांकडे असलाचा पाहिजे असा हा ग्रंथ असून या ग्रंथाचे प्रकाशन पुढील महिन्यात मान्यवरांच्या हस्ते कऱण्याचे नियोजन आहे.
ग्रंथासाठीचा खर्च वजा जाता ग्रंथाच्या विक्रीतून जे पैसे शिल्लक राहतील ते पत्रकारांच्या हक्कासाठी एस.एम.देशमुख यांनी सुरू केलेल्या चळवळीसाठी खर्च केले जाणार आहेत.त्यामुळे पुस्तक खरेदी एकप्रकारे पत्रकार चळवळीसाठी मदत ठरणार आहे.
या ग्रंथाची नोंदणी आजच करा..त्यासाठी संपर्क .एसएमदेशमुख 9423377700
किंवा 9850671324 या क्रमांकावर करता येईल.इ-मेल ने नोंदणी करायची झाल्यास त्यासाठी इमेल असा..smdeshmukh13@gmail.com