थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी आणखी तीन दिवसांचा अवधी असला तरी रायगड जिल्हयात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलिबाग,मुरूड,माथेरान,दिवेआगर,हरिहरेश्वर,मांडवा,श्रीवर्धन आदि पर्यटन स्थळी पर्यटक दाखल झाल्याने या भागातील हॉटेल्स,रिसॉर्ट,लॉजिंग आणि कॉटेजेस हाऊसफुल्ल झाले आहेत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनाऱ्यानाच पर्यकांची पसंती असल्याचे अलिबाग आणि नजिकच्या आक्षी,नागाव,आवास आदि किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या गर्दीवरून दिसून येते.अलिबाग परिसरातही आता पब आणि डिस्को संस्कृती बऱ्यापैकी रूजली असून यावेळेस पहाटे उशिरापर्यत डीजेच्या दणदणाटाची धूम चालू राहणार आहे.फार्म हाऊसलाही पर्यटकांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.पर्यटकांना आकर्षित कऱण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापनांनी इन हाऊस डिजे पार्ट्यांचे आयोजन केले आहे.जिल्हयात मद्य विर्कीच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल होण्याची शक्यता आहे.मद्य धुंद पर्यटकांचा इतराना त्रास होऊ नये यासाठी रायगड जिल्हयात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितेल.