माजहित विरोधी असता कामा नये.कुबेर यांची भूमिका तशी आहे.ती अर्धवट ज्ञानावर आधारलेली वगैरे तर अजिबात नाही . जाणीवपूर्वक घेतलेली असल्यानं ती अधिक धोकादायक आणि म्हणूनच आक्षेपार्हही आहे.एखादी भूमिका सभ्य भाषेतही व्यक्त करता येते त्यासाठी समाजातील वंचित,उपेक्षित असलेल्या एका मोठ्या वर्गाला थेट बोगस ठरविण्याचा अधिकार कोणाला नाही. बळीराजा बोगस कसा असू शकतो याचा जाब कुबेरांना विचारलाच गेला पाहिजे.अशा भुमिकेचा प्रतिवाद हा व्हायलाच हवा तो झाला असेल तर संवेदनशीलतेचं लक्षण आहे. कुबेर यांच्या अग्रलेखाने समाजावर गंडातर वगैरे नक्कीच आलेलं नाही पण अशा प्रवृत्तींकडं दुर्लक्ष क़ेल्यानं ते नक्कीच येऊ शकतं.कारण वृत्तपत्रातील बातम्या,अग्रलेख आणि लेखांमुळे देशात दंगली उसळल्याची अनेक दाखले देता येतील.त्यातून समाजाचंही मोठं नुकसान झालेलं आहे. कुबेर शहिद होतील म्हणून त्याच्या समाजहितविरोधी भूमिकांकडं दुर्लक्ष होता कामा नये.नकारात्मक लिखाण करून कोणी शहिद होत नाही.म्हणून ते शहिद होतील असा बाऊ करीत कुबेरांना पाठिशी घालण्याचं कारण नाही.
राहिला चळवळीला फटका बसण्याचा विषय.चळवळी मोठ्या कष्टानं उभ्या राहतात.अशा स्थितीत एखादी चुकीची भूमिकाही चळवळीची वाट लावणारी ठरते.याची खंडीभर उदाहरणं देता येतील.अनेक अंतर्विरोध असताना काही पत्रकार मित्र मोठ्या जिद्दीनं पत्रकारांच्या हक्काची चळवळ चालवत आहेत.( तो अनेकांसाठी पोटदुखीचा विषय आहे पण त्याला इलाज नाही) पत्रकारांचा कुठलाही प्रश्न सोडवायचाच नाही अशी राजकारण्याची भूमिका असताना अशा घटना त्यात तेल ओतणाऱ्या ठरतात.काही आमदारांनी हे उघडपणे बोलून दाखविले आहे.त्यामुळं हे नुकसानच आहेच.त्याची किंमत चळवळीला मोजावी लागणार हे चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला दिसते आहे.(SM)