अलिबाग-रायगड लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून पनवेलचे अप्पर तहसिलदार दिलीप संख्ये आणि त्याच्या कार्यालयातील उपलेखापाल रंजना मोडक यांना 30 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
जमिनीची किंमत ठरवून देण्यासाठी अप्पर तहसिलदारांनी शिरवली येथील एका शेतकऱ्याकडे 3 लाखांची मागणी केली होती.नंतर अडीच लाखांवर तडजोड झाली.त्यालीत 30 हजारांचाी रक्कम स्वीकरताना संख्ये यांच्या कार्यालयातील उपलेखापाल रंजना मोडक याना आज रंगेहात पकडण्यात आले.गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले हे तिसावे शासकीय कर्मचारी आहेत