एस.एम.देशमुख परिषदेचे नवे अध्यक्ष
————————-
परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यांच्यावर दाखल विविध गुन्हयांमुळे त्यांनी 25 ऑगस्ट 2015 च्या परिषदेच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.ते 1 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार होते .मात्र त्याच्या राजीनाम्यामुळे तसे घडले नाही.त्यामुळे 1 सप्टेंबरपासून पाच महिने परिषदेचे अध्यक्षपद रिक्तच होते.त्यामुळे परिषदेवर प्रशासक आहे असा अपप्रचार परिषदेच्या हितशत्रूंनी सुरू केला होता.याला उत्तर देण्यासाठी नव्या अध्यक्षाची निवड होणे आवश्यक होते.त्यानुसार 2 फेब्रुवारी 2016च्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून एस.एम.देशमुख यांची निवड कऱण्यात आली.किरण नाईक यांनी देशमुख यांचे नाव सुचविले आणि त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.नारायण आठवले यांनी राजीनामा दिल्या नंतर कुमार कदम यांची अशाच पध्दतीनं दुसर्यांदा निवड केली गेली होती.देशमुख 2000 ते 2002 या कालावधीत परिषदेचे अध्यक्ष होते.
परिषदेचे पदाधिकारी
टीम परिषद…
1)मुख्य विश्वस्त तथा अध्यक्ष — एस.एम.देशमख 9423377700,9075175924
2) विश्वस्त – किरण नाईक 9820784547
3)कार्याध्यक्ष – सिध्दार्थ शर्मा 07242438478
4)सरचिटणीस – यशवंत पवार 9423061100
5)कोषाध्यक्ष – मिलिंद अष्टीवकर 9422071100
6) मुंबई विभाग हेमंत बिर्जे ( मुंबई,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी ) 9819714248
7) कोकण विभागः धनश्री पालांडे ( रत्नागिरी,दैनिक रत्नभूमी) 9921879660
8) पुणे विभागः शरद पाबळे ( पुणे,दैनिक सकाळ) 07588945850
9) कोल्हापूर विभागः समीर देशपांडे ( कोल्हापूर,दीव्य मराठी )09765562895
10) लातूर विभागः विजय जोशी ( नांदेड,सामना ) 9923001823
11) अमरावती विभाग ः राजेंद्र काळे ( बुलढाणा,देशोन्नती) 9822593923
12) नागपूर विभागः हेमंत डोर्लीकर ( गडचिरोली,भास्कर ) 9404127325
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.राज्यातील 34 जिल्हयात परिषदेच्या शाखा असून 8 हजार पत्रकार परिषदेचे सदस्य आङेत.1939मध्ये काकासाहेब लिमय संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.
– मराठी पत्रकार परिषद
अध्यक्षांची यादी
अध्यक्ष स्थळ स्वागताध्यक्ष
1) काकासाहेब लिमय मुंबई 1939 य.कृ.खाडीलकर
2) न.र.फाटक पुणे 1941 ज.स.क रंदीकर
3)ज.स.करंदीकर मुंबई 1942 श्री.शं.नवरे
4)य.कृ.खाडीलकर कोल्हापूर 1944 ग.शं.गोखले
5) द.वि.गोखले सोलापूर 1945 बा.न.जक्कल
6) श्री.शं.नवरे नागपूर 1946 पु.दि.ढवळे
7) त्र्य.र.देवगिरीकर धुळे 1947 रि.वि.टिळक
8) ना.रा.बामणगावकर नासिक 1948 गो.गं.सौदणकर
9) पा.वा.गाडगीळ सांगली 1949 भ.अ.दफ्तरदार
10) आचार्य प्र,के.अत्रे बेळगाव 1950 बाबूराव ठाकूर
11) अ.वि.टिळक नगर 1951 बाळासाहेब भारदे
12) प्रभाकर पाध्ये कोल्हापूर 1952 बाळासाहेब पाटील
13) ह.रा.महाजनी मुंबई 1953 आप्पा पेंडसे
14) बाळासाहेब भारदे – 1954 ———–
15) पां.रं.अंबिके पालघर 1955 बी.वा.दांडेकर
16) रामभाऊ निसळ मुंबई 1962 य.कृ.खाडीलकर
17) अनंतराव भालेराव नगर 1963 वा.द.कस्तुरे
18) बाबुराव जक्कल चंद्रपूर 1964 शां.रा.पोटदुखे
19) बाबुराव ठाकूर जळगाव 1965 ब्रिजलाल पाटील
20) अनंतराव पाटील 1967 आ.कृ.वाघमारे
21) कांतीलाल गुजराथी 1968 जितमल छाजेड
22) दादासाहेब पोतनिस पणजी 1969 नारायण भास्कर नायक
23) वसंत काणे श्री क्षेत्र परशूराम 1971 भाई सावतं
24) बाळासाहेब मराठे श्री क्षेत्र पंढरपूर 1973 पां.तु.उत्पात
25) रंगा वैद्य मुंबई 1977 मनोहर देवधर
26) ब्रिजलाल पाटील नासिक 1978 चंदुलाल शहा
27) नारायण आठवले बेळगाव 1979 रणजित देसाई
28)भाई मदाने वर्धा 1980 ———-
29) यशवंत मोने फलटण 1982 हरिभाऊ निंबाळकर
30) सुधाकर डोईफोडे परभणी 1984 रतनलाल तापडीया
31) कुमार कदम गणपतीपुळे 1986 हिरालाल बुटाला
32) नरेंद्र बल्लाळ जळगाव 1988 अरूण डोलारे
33) भागवत चौधरी ठाणे 1989 मनोहर साळवी
34) हरिभाऊ निंबाळकर परभणी 1992 रतनलाल तापडीया
35) नंदकुमार देव 1995
36) लक्ष्मण पाटील – 1998
37)सुकृत खांडेकर नंादेड 2000 कमलकिशोर कदम
38) एस.एम.देशमुख वाशिम 2002
39) संजीव कुळकर्णी —– 2004
40) राजा शिंदे कराड 2006
41) सुप्रिया पाटील ——- 2008
42) विजय पाटील रोहा 2010 सुनील तटकरे
43) माधवराव अंभोरे औंरंगाबाद 2012
44) किरण नाईक पिंपरी-चिंचवड 2014
45) एस.एम.देशमख 2015-2017 विद्यमान अध्यक्ष
——————————————————————————————————————————————————————————–
“ज्ञानप्रकाश”कार कृष्णाजी गणेश तथा काकासाहेब लिमये
मराठी पत्रकार परिषदेचे पहिले अध्यक्ष
–
मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्ञानप्रकाश या दैनिकाचे तब्बल पंधरा वर्षे मुख्य संपादक राहिलेले कृष्णाजी गणेश उर्फ काकासाहेब लिमये यांचा जन्म 15 -08-1892 रोजी पंढरपूर येथे झाला.एम.ए.एल.एल.बी.पर्यत त्यांचे शिक्षण झाले होते.उच्चविद्याविभूषित कृष्णाजी गणेश यांनी बडी सरकारी नोकरी पत्करावी किंवा वकिली व्यवसाय सुरू करावा अशी तत्कालिन रिवाजाप्रमाणे घरच्यांची इच्छा होती.सुखवस्तू जीवनाचा तो मार्ग काकासाहेबांना मान्य नव्हता.मुलतःच सामाजिक कार्याची आवड असलेल्या काकासाहेबांनी सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला.त्यानुसार शिक्षण पूर्ण होताच त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या”भारत सेवक समाजा”चे अजिव सदस्यत्व पत्करले.भारत सेवक समाजच्यावतीनं ज्ञानप्रकाश नावाचे वर्तमानपत्र प्रसिध्द होत असे.ज्ञानप्रकाशचा पहिला अंक 12 फेब्रुवारी 1849 रोजी प्रसिध्द झाला होता. विष्णू गोविंद रानडे हे ज्ञानप्रकाशचे संस्थापक तर ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होते ,कृष्णाजी त्रिंबक रानडे.ते 1849 ते 1880 अशी तब्बल 31 वर्षेसंपादकपद भूषविले
ज्ञानप्रकाश सुरू झाला तेव्हा तो आठवड्यातून एकदा प्रसिध्द व्हायचा.1853पासून ज्ञानप्रकाश आठवड्यातून दोन वेळा प्रसिध्द व्हायला लागला.पुढे 1863 पासून मराठी आणि इंग्रजी भाषेत आणि अक्षरी टंकानी छापण्यास सुरूवात झाली.15 ऑगस्ट 1904 पासून ज्ञानप्रकाशचे दैनिकात रूपांतर झाले.दैनिक ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होते हरिभाऊ आपटे.भारत सेवक समाजचे काम पाहणारे काकासाहेब लिमये यांची 1918मध्ये ज्ञानप्रकाशच्या संपादक मंडळात नेमणूक झाली.ज्ञानप्रकाश हे मवाळ आणि नेमस्त बाण्याचे नियतकालिक होते.नामदार गोखल्यांमुळे ज्ञानप्रकाशला सरकार दरबारी प्रतिष्ठा आणि वजन जरूर होते पण जनमानसात फारशे स्थान किंवा लोकप्रियता नव्हती.पुण्याचे बाजारभाव,हवामान किंवा जाहिरनामे छापून लोकप्रियता मिळणेही शक्य नव्हते.परंतू याकाळात अंक वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न झालेत असं दिसत नाही.1926 मध्ये पुण्यातील शुक्रवार पेठेत असलेल्या छापखान्यास आणि दैनिकाच्या कार्यालयास आग लागली.आगीत किबेवाडाच भस्मसात झाला.या धक्क्यातून सावरण्यासाठी ज्ञानप्रकाशच्या व्यवस्थापनाने ज्ञानप्रकाशमध्ये व्यवस्थापकीय आणि संपादकीय पातळीवर मोठे फेरबदल घडवून आणले.संपादकीय आणि व्यवस्थापकीय जबाबदारी काकासाहेब लिमये यांच्यावर सोपविण्याचा महत्वाचा निर्णय़ घेतला गेला.त्यानुसार 1जून 1926 पासून काकासाहेब लिमये यांचे नाव ज्ञानप्रकाशच्या अंकावर मुख्य संपादक म्हणून प्रसिध्द व्हायला लागले.
काकासाहेबांनी संपादकीय जबाबदारी तर स्वीकारली होती पण ती पेलणे वाटते तेवढे सोपे नव्हते.सर्वात मोठा अडसर होता तो वर्तमानपत्राच्या भूमिकेचा.काकासाहेबांनी हे आव्हान स्वीकारत ज्ञानप्रकाशच्या भूमिकेत कोणताही बदल न करता दैनिक लोकाभिमुख करण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले.हे करताना दैनिकाने पुर्वी कधीही न हाताळलेले विषय घेऊन लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रय़त्न केला.शेती व सहकार,महिलांचे प्रश्न,इतिहास संशोधन,नाटकं,साहित्यिक घडामोडी,साहित्य संमेलने आणि क्रीडाचे सविस्तर वृतांत ज्ञानप्रकाशमध्ये छापले जाऊ लागले. काकासाहेबांनी वेगवेगळी सदरं सुरू केली”.काव्यशास्त्र -विनोद”हे ज्ञानप्रकाशचे वैशिष्टयपूर्ण सदर होते.हा सारा मजकूर देताना पक्षभिनिवेश पाळला जाणार नाही याची ते कटाक्षानं काळजी घ्यायचे..त्यामुळं सर्वच विचारांच्या मंडळींना ज्ञानप्रकाश वाचणे आवश्यक वाटायला लागले. काकासाहेबांनी गावागावत वार्ताहर नेमून तेथील घटनेच्या बातम्या येतील याची दक्षत घेतली. सभांचे वृत्तांत हशा – टाळ्यांसह देण्याची पृथाही काकासाहेबांनी सुरू केली.त्यामुळं दैनिाकाचा गोतावळा वाढत गेला.मात्र हे करताना त्यांनी व्यक्तिगत निंदानालस्तीपासून ज्ञानप्रकाश दूर ठेवला. दैनिकाला प्राप्त झालेले हे वैविद्य आणि समतोलपणा यामुळे दैनिकाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आणि दैनिकाचे खपही भरमसाठ वाढला.काकासाहेबांनी संपादकीय सूत्रे हाती घेतली तेव्हा केवळ 4 हजार खप असलेले हे दैनिक अवघ्या चार वर्षात 10 हजार अंकाचा टप्पा पार करू शकले.खपाचा इष्टांक गाठल्यानंतर काकासाहेबानी पुढचं पाऊल उचलंलं ते मुंबई आवृत्ती सुरू कऱण्याचं.त्यानुसार 1 जून 1929पासून ज्ञानप्रकाश सुरू झाले.ज्ञानप्रकाशनं सायंआवृत्ती सुरू केली होती.ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक जसे ठरले तसेच मुंबईतील पहिले सायं दैनिक म्हणूनही ज्ञानप्रकाश ओळखले जाऊ लागले.मुंबई आवृत्तीची संपादकीय जबाबदारी होती सिध्दहस्त लेखक
शिवराम वाशीकर .मुबई आवृत्ती सुरू झाल्यानंतर ज्ञानप्रकाशचा मुंबईतही डंका जोरात वाजायला लागला.तेथील खप पाच हजारावर आणि अंकाचा एकूण खप तीसहजारावर पोहोचला होता.नुसता खप वाढून अंक फायद्यात राहात नाही हे वृत्तपत्रांशी संबंधित लोकांना माहित असते.मात्र मुंबईत नुसता खपच वाढला नाही तर जाहिराती आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही चांगलीच वाढ झाली होती.
मात्र काकासाहेबांचे हे यश अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागले.त्यातून राजकारण सुरू झाले.अंक वेळेत निधणार नाही याचीही काळजी घेतली जाऊ लागली.अधिकच्या प्रती मागितल्यास त्या मिळत नसत.काकासाहेबांकडील व्यवस्थापकीय सूत्रे काढून घेतली गेली आणि त्यांचे विश्वासू सहकारी स्वतःहून सोडून जातील याचीही व्यवस्था केली गेली.एवढेच नव्हे तर ज्यांनी ज्ञानप्रकाशला खऱ्या अर्थानं यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं त्या काकासाहेबांना 2 जुलै 1941 रोजी जवळपास सक्तीनंच निवृत्त केलं गेलं.
काकासाहेबांंच्या मनस्वी स्वभावाला हा आघात सहन झाला नाही.त्यांना अर्धांगवायुचा झटका आला आणि याच आजाराने त्यांचे 28 एप्रिल 1948 रोजी पुणे येथे निधन झाले.काकासाहेब गेल्यानंतर ज्ञानप्रकाशही जास्त दिवस ज गले नाही.31 डिसेंबर 1951 रोजी ज्ञानप्रकाशने वाचकांचा निरोप घेतला आणि आपले अवतार कार्य संपविले.12 फेब्रुवारी 1849 रोजी सुरू झालेले ज्ञानप्रकाश शंभरी पार करणारे त्याकाळातले एकमेव दैनिक ठरले.योगायोग असा की,शताब्दी सोहळा साजरा केल्यानंतर केवळ दोन वर्षातच हे दैनिक बंद पडले.ज्ञानप्रकाशचा शताद्वी समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मुंबई ब्राह्मण सभेच्या सभागृहात 14-04-1949 रोजी साजरा केला गेला होता.
पसिध्दपरांडःमुख व्यक्तिमत्व
———————–
काकासाहेब लिमये पंधरा वर्षे दैनिकाचे संपादक राहिले असले तरी त्यांनी स्वतःला प्रसिध्दीपासून कटाक्षानं दूर ठेवलं होतं.ज्ञानप्रकाशमध्ये त्यानी स्वतःचा कधी फोटो छापला नाही.यावर “भाला”कार भास्करराव भोपटकर यांनी भाला मधून जाहीरच पृच्छा केली होती की,”ज्ञानप्रकाशचे संपादक काकासाहेब लिमये म्हणून जे कोणी आहेत त्यांनी एकदा आपला फोटो तरी ज्ञानप्रकाशमधून छापावा म्हणजे काकासाहेब लिमये कोण हे तरी आम्हाला कळेल”.काकासाहेबांनी भालाकारांच्या या जाहिर आव्हानाचा स्वीकार केला नाही आणि आपला फोटोही कधी छापला नाही.सूर्यप्रकाशाबरोबर लोकांच्या घरी ज्ञानाचाप्रकाश घेऊनच जाणारे काकासाहेब स्वतःमात्र अंधारात राहिले.एका प्रमुख आणि मोठा खप असलेल्या दैनिकाचे संपादक असलेल्या काकासाहेबांनी हातातील वृत्तपत्राचा वापर स्वतःची टिमकी वाजविण्यासाठी क धी केला नाही.स्वतः अँधारात राहून इतरांना प्रकाश देणाऱ्या टॉर्चसारखी त्यांची भूमिका राहिलेली आहे.स्वतः – प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या काकासाहेबांनी अनेकांना प्रकाशात आणलं.नवे लेखक घडविले,कवी,साहित्यिक आणि नव्या दमाच्या पत्रकारांना त्यानी लिहितं केलं.आचार्य अत्रे त्यापैकी एक होत.आचार्य अत्रे यांनी 28 एप्रिल 1969च्या मराठात काकासाहेबांचा त्याबद्दल अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.अत्रे म्हणतात ,” आमच्या साहित्यिक ,सार्वजनिक आणि व्यावसायिक ( पत्रकार म्हणून) जीवनाचा पाया खंबीरपणे भरण्यास ज्ञानप्रकाशव्दारा काकासाहेबांनी केलेली आमची मुक्तकंठ प्रशस्ती आणि निःकोच प्रसिध्दीच बव्हशी कारणीभूत आहे.आमच्यावरील काकासाहेबांच्या ऋुणाचा आम्हाला कदापिही विसर पडणे शक्य नाही”. अत्रे पुढे म्हणतात, “काकासाहेबांचा पिंड हा समाजसुधारकाचा.राजकारणापेक्षा त्यांना समाजकारणातच जास्त रस वाटे.पंढरपूरसारख्या सनातनी शहरात जन्म घेतल्यानंतरही ते वृत्तीनं आणि खरेखुरे समाजसुधारक होते.अस्पृश्योध्दार,स्त्रीशिक्षण,विधवाविवाह,आदि सामाजिक बदलांचा पुरस्कार ते केवळ ज्ञानप्रकाशमधूनच करून थांबले नाहीत तर त्यांनी अनेक प्रसंगी अशा सर्व चळवळीत सक्रीय सहभाग नोंदविला होता”.आचार्य अत्रे यांनी काकासाहेबांची आणखी एक आठवण नमूद केली आहे”.प्रिन्सिपल प्रल्हाद केशव अत्रे ,बी.ए.बी.टी.टी.डी.लंडन”असे नाव अत्रे वापरत असत.हे नाव “आचार्य प्र.के.अत्रे” असे सुटसुटीत कऱण्याचे श्रेय काकासाहेबांचेच असल्याचं अत्रे यांनी नमूद केलंय.काकासाहेब आणि आचार्य अत्रे यांच्या स्वभावत टोकाचा फरक असला तरी हे दोन महान पत्रकार परस्परांबद्दल कमालीचा आदर,आपुलकी आणि प्रेम ठेऊन असत.अत्रे-लिमये मैत्रीचं अनकांना कुतूहलही वाटे.अत्रे म्हणतात, “काकासाहेबांबरोबरची आमची मैत्रीच त्यांच्या ज्ञानप्रकाशच्या संपादकीय निवृत्तीला कारणीभूत ठरली.काकासाहेबांनी मात्र अखेरपर्यत त्याची एकदाही कबुली दिली नाही”.मृदूभाषी,मवाळवृत्तीच्या काकासाहेबांनी कधीही आपल्या कडव्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही कधी अनुदार उद्गगार काढले नाहीत.अंतःकऱणात आग पेटलेली असतानाही निर्विकार मुद्रेने ते “यात काय झाले” अशीच सारवासारव करीत असत.काकासाहेब कधी कोणावर भडकत नसत.सदरा,लांबकोट,धोतर,काळी टोपी असा साध्या वेषात वावरणारे काकासाहेब “सबुरवादी” होते.वेळप्रसंगी पडते घेऊनही ते तंटा टाळत असतं.
– मराठी पत्रकार परिषदेचे पहिले अध्यक्ष
————————————
– मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई ्र 3डिसेंबर 1939 रोजी झालेल्या पहिल्याच अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना काकासाहेबांनी “वृत्तपत्र व्यवसाय हा धंदा नसून धर्म” असल्याचं ठणकावून सागत पत्रकारितेवरील आपल्या निष्ठाच व्यक्त केल्या होत्या.पत्रकारांचे समस्या,प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांची मध्यवर्ती संघटना असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आणि प्रयत्न होता.त्यातूनच पुढे मराठी पत्रकार परिषदेचा जन्म झाला.अशी संघटना स्थापन करण्याचा एक प्रयत्न 1933मध्ये पुण्यात गोपाळराव ओगले (नागपूर ) यांनी करून पाहिला होता पण त्यात फार यश आले नाही.1939च्या सप्टेबरमध्ये मराठी पुरोगामी लेखक सघ या संस्थेच्या बौठकीत संपादक,उपसंपादकांचे एक संमेलन भरवावे असं ठरलं.त्यासाठी विल्सन हायस्कूलमध्ये 25 ऑक्टोबर 1939 रोजी एक बैठक झाली.या बौठकीतच मराठी पत्रकार परिषद स्थापन कऱण्याचा नि र्णय़ घेतला गेला.त्यासाठी तारीख नक्की केली गेली ती 3 डिसेंबर 1939 ची.25च्या बैठकीत जे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले होते त्या कार्यकारी मंडळानं काकासाहेब लिमये यांची अध्यक्षपदासाठी एकमुखी सूचना केली.त्याप्रमाणे काकासाहेब लिमये हे परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले.अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी नेमके काय काम केले याचा तपशील उपलब्ध नसला तरी त्यांच्या कार्याचे आणि भूमिकांचे प्रतिबिंब त्यांंनी मुंबईच्या पहिल्याच अधिवेशनात केलेल्या भाषणातून उमटलेले दिसते.काकासाहेब आणि वा.रा.ढवळे,र.धो.कर्वे,के.रा.पुरोहित,आप्पा पेंडसे,य.कृ.खाडीलकर,वरेरकर,का.म.ताम्हणकर,द .पु.भागवत,लालजी पेंडसे,अनंत का़णेकर( मराठी पत्रकार परिषद हे नाव अनंत काणेकर यांनीच सूचविले आणि ते मान्य झाले) गो.बा.महाशब्दे ,शं.वा.किलोस्कर,त्र्य.र.देवगिरीकर ,रा.गो .कानडे आदिच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या मराठी पत्रकार परिषदेचा वेलू नंतरच्या काळात गगणावरी गेला आहे.मराठी पत्रकार परिषदेचे हे 75 वे वर्षे आहे.याचा अ र्थ आपल्या पूर्वजांनी परिषदेचा पाय़ा भक्कम रचलेला आहे.ही परिषदेची मशाल कायम तेवत ठेवण्याची जबाबदारी तमाम मराठी पत्रकारांची आहे.आज पत्रकारांच्या विविध संस्था असल्या तरी मराठी पत्रकार परिषद ही आपली मातृसंस्था आहे याचा विसर मराठी पत्रकारांनी पडू देता कामा नये.
पुणे येथे 1941मध्ये झालेल्या दुसऱ्या अधिवेशऩाचे अध्यक्ष
फ़ाटक याचं घराणं कोकणातील कमोद गावचं.तेथून त्यांचे पूर्वज भोर संस्थानातील जांभळी गावी आले.आजोबा भोर संस्थानात कारभारी होते.तेथेच 15 एप्रिल 1893 रोजी त्यांचा जन्म झाला.वडिल उत्तर भारतात सरकारी नोकरीत होते.त्यामुळं त्याचं प्राथमिक शिक्षण भोर,पुणे,अजमेर,इंदूर,अलाहाबाद अशा वेगवेगळ्या शहरातून झालं.चित्रकला आणि शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या फाटकांनी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडं संगीताचे धडेही गिरविले होते.चित्रकलेच्या काही परीक्षाही त्यांनी दिल्या.विविधवृत्त,इंदुप्रकाश या नियतकालिकांपासून त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरूवात झाली.1918 ते 1923 या काळात ते इंदुप्रकाशचे संपादक होते.त्यानंतर ते नवाकाळमध्ये रुजू झाले.1924 ते 1935 अशी अकरा वर्षे ते नवाकाळमध्ये सहसंपादक होते.सत्यान्वेषी आणि फरिश्ता या टोपण नावांनी त्यांनी विपूल वृत्तपत्रीय लिखाण केलंय. काकासाहेब खाडिलकरांच्या पश्च्यातही त्यांनी काही काळ नवाकाळची धुरा सांभाळली होती. नंतर मात्र त्यांनी नवाकाळचा निरोप घेतला.त्यानंतर ते अगोदर 1935 ते 1937 अशी दोन वर्षे श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि नंतर रामनारायण रूईया कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करू लागले.1957 मध्ये ते निवृत्त झाले.निवृत्तीनंतरही त्याचं लिखाण सुरूच होते.त्यामुळे त्यांचा वृत्तपत्रांशी तसा शेवटपर्यत संबंध कायम होता.मराठ्यांचा इतिहास आणि महाराष्ट्रातील संतसाहित्य हे दोन विषय त्यांचे विशेष अभ्यासाचे.त्यामुळं इतिहास आणि साहित्य या विषयात त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले.संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ आणि संत रामदास यांचे वांडःमय आणि कार्य विशद कऱणारे त्यांचे तीन ग्रंथ प्रसिध्द आहेत.मराठ्यांच्या इतिहासाचे विहंगमावलोकन, य़शवंतराव होळकर यांंंंचे चरित्र,तसेच न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे,नाट्याचार्य खाडिलकर,लोकमान्य टिळक,हे त्यांचे चरित्रग्रंथ विशेष मान्यता पावले.आदर्श भारत सेवक गोपाळ कृष्ण गोखले या 1967मध्ये प्रसिध्द झालेल्या ग्रंथास 1970चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
– भारत इतिहास संशोधन मंडळ,प्राज्ञ पाठशाळा मंडळ,मुंबई मराठी ग्रंथ सग्रहालय,मुंबई मराठी साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी पत्रकार परिषद आदि संस्थांशी त्यांचा सदस्य अ थवा पदाधिकारी या नात्यानं जवळचा संबंध होता.मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना झाल्यानंतर 1941-42मध्ये ते संघाचे पहिले अध्यक्ष होते.त्यांच्या समवेत के.र.पुरोहित आणि गो.बा.महाशब्दे हे संयुक्त कार्यवाह होते.1947मध्ये हैदराबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.मुंबई येथे 21 डिसेंबर 1979 रोजी त्याचं निधन झालं.साहित्य,संशोधन आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यानी आपल्य ा कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे 1941मध्ये झालेल्या दुसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ज.स.करंदीकर होते.
————————————————————————————————————-
मुंबईत 30 मे 1942 रोजी झालेल्या तिसऱ्या अधिवेशनाचे अघ्यक्ष
करंदीकराना लोकमान्य टिळक,न.चि.केळकर,कृ.प्र.खाडिलकर यांच्या समवेत काम कऱण्याची संधी मिळाली होती.केसरीचे राष्ट्रनिष्ठ,टिळकनिष्ठ संपादक असा त्यांचा नावलौकिक होता.केसरीतील लेखांना समयसूचक उत्कृष्ठ मथळे देण्याची परंपरा त्यांनी साभाळली.त्यासाठी अनेक वेळा ते महाभारतातील संस्कृत वचन उद्दघृत करीत.शिक्षकीपेशामुळे अवघड विषय सुलभ करून सांगण्याची त्यांची पत्रकारितेतील हातोटी विशेष लोकप्रिय झाली.अन्यायाचा प्रतिकार हे केसरीचे ब्रिद त्यांनी कटाक्षानं आणि निर्भय़पणे पाळलं.महाराष्ट्रातील काही मोजक्या परखड पत्रकारांमध्ये त्यांची गणना होते.करंदीकरांचं निधन 13 मार्च 1959 रोजी पुण्यात वृध्दापकाळाने झाले.
———————————————————————————————————–
1944मध्ये कोल्हापुरात झालेल्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष
मराठी माणसांनी सुरू केलेली जी थोडी वृत्तपत्रं आज मुंबईत आहेत त्यात प्रामुख्यानं ‘नवाकाळ’चा उल्लेख करता येईल.नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी 7 मार्च 1923 रोजी नवाकाळची मुहूर्तमेढ रोवली.आता शतकपुर्तीकडे नवाकाळची वाटचाल सुरू आहे. खाडिलकर कुटुंबाची चौथी पिढी आज नवाकाळची जबाबदारी अंगावर घेऊन ती समर्थपणे पार पाडताना दिसत आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविलेले यशवंत कृष्ण खाडिलकर हे नवाकाळचे दुसरे संपादक होत.1929मध्ये कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकरांनी सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना 1927 आणि 1929 अशी दोनदा राजद्रोहाच्या आरोपाखाळी तुरूंंगवासाची शिक्षा भोगावी लागली.त्यांच्या शिक्षेच्या काळात नवाकाळची जबाबदारी य,कृ.उर्फ आप्पासाहेबांवर आली.ती त्यांनी समर्थपणे पेलल्यामुळे काकासाहेब तुरूंगातून परत आल्यानंतर देखील नवाकाळचे संपादकपदी आप्पासाहेब कायम राहिले.1929 ते 1968 अशी जवळपास चाळीस वर्षे त्यांनी नवाकाळची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.मार्मिक,तर्कशुध्द आणि उपरोधाचा स्वर असलेले त्यंाचे अग्रलेख अतिशय लोकप्रिय असत.
आप्पासाहेबांचा जन्म 15 जानेवारी 1905 रोजी झाला.चळवळीचं आणि पत्रकारितेचं बालकडू त्यांना घरातच मिळालं.वडिलांच्या देखरेखीखालीलच आप्पासाहेबांची पत्रकारिता सुरू झाली.काकासाहेब चळवळीतले कार्यकर्ते.लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले आणि केसरीत लोकमान्यांसमवेत काम केलेले काकासाहेब नवाकाळमधून देखील केसरी प्रमाणेच भूमिका पार पाडत होते.स्वाभाविकपणे वारंवार त्यांना सरकारी रोषाला बळी पडावं लागायचं.सरकारला भारी रक्कमेचे जामिन द्यावे लागायचे.त्यामुळे नवाकाळला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. मात्र अगोदर काकासाहेबांनी आणि नंतर आप्पासाहेबांनी नवाकाळला हातच्या फोडासारखे जपत आणि खिश्याला तोषिश सहन करीत नवाकाळचे प्रकाशन बंद पडणार नाही याची काळजी घेतली.स्वांतत्र्योत्तर काळात मुंबईत नवनव्या भांडवलदारी वृत्तपत्रांचा उदय झाला.स्पर्धा वाढली.त्यामुळे नवाकाळला आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागला.आप्पासाहेबांनी हे सारे सहन करीत नवाकाळ निष्ठेने चालू ठेवला.हे करताना वृत्तपत्रिय स्वातंत्र्य आणि ते टिकविण्यासाठी लागणारा स्वाभिमान कधी ढळू दिला नाही.कॉग्रेसच्या विचारांचा पुरस्कार हे नवाकाळचे प्रथमपासूनचे धोरण होते.आप्पासाहेबांनी त्यात बदल केला नाही.असे असतानाही कॉग्रेसच्या ज्या गोष्टी पटणाऱ्या नव्हत्या त्यावर टीका करताना आप्पासाहेबांच्या लेखणीनं कधी भिडमुर्वत बाळगली नाही.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर नवाकाळने कणखरपणे कॉग्रेसच्या धोरणास विरोध करून ठाम आणि निर्धारपूर्वक महाराष्ट्राची बाजू मांडली होती.पत्रकारितेवर आप्पासाहेबांची किती प्रखर निष्ठा होती हे त्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोल्हापुरात केलेल्या भाषणावरून दिसते.ते म्हणतात,’लोककार्य साधण्याची श्रध्दा हे या पेशाचे शिर आहे,धर्म मार्ग ही उजवी बाजू आहे,प्रामाणिकपणा ही डावी बाजू आहे,कुशलता हा आत्मा आहे,आणि मार्गदर्शन तेज दिसणे ही या व्यवसायाची प्रतिष्ठा आहे’.त्या काळात साहित्यिक आणि पत्रकार यांच्यातील वादही चव्हाट्यावर आले होते.त्याचाही संदर्भ आप्पासाहेबांनी आपल्या भाषणात दिला.ते म्हणाले,’पत्रकार आणि साहित्यिक हे सहोदर आहेत.तशीच चिकित्सा मांडली तर साहित्यिक हे पत्रकारांचे अग्रज नसून अनुज आहेत.असा कोटीक्रम करता येईल.बहुतेक प्रख्यात साहित्यिकांची पहिली श्री वृत्तपत्रात लिहिलेली असते. आणि त्यादृष्टीने मनुष्याच्या ठिकाणी प्रथम पत्रकार प्रकट होतो आणि मग साहित्यिक डोके वर काढतो’ असे त्यांचं सांगणं होतं.वृत्तपत्रांची सरकारकडून होणारी दडपशाही,कुचंबणा याला त्यांनी विरोध दर्शविला होता.पत्रकार संघटनांच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी प्रय़त्न केले होते.1942-43मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले.1944मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यंानी भूषविले होते.आप्पासाहेबंानंतर नवाकाळची धुरा निळकंठ य.खाडिलकर यांनी पार पाडली.आता जयश्री खाडिलकर -पांडे नवाकाळच्या संपादिका आहेत.
आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट( 1931) सदानंद (1934) आजकाल (1936) या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या.साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण कऱणाऱ्या आप्पासाहेबांचे 11मार्च 1979 मध्ये निधन झाले.
———————————————————————————————————–
सोलापूर येथे 24 मार्च 1945 रोजी झालेल्या पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष
दा.वि.तथा बाबुराव गोखले
मंगळवार दिनांक 4 जानेवारी 1881 रोजी पुण्यात केसरीची गर्जना झाली.मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात एका तेजस्वी पर्वाचा आरंभ झाला.विष्णूशास्त्री चिपळूणकर,गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सारखे दिग्गज केसरीच्या संपादक मंडळात होते आणि ते केसरीत लेखणही करीत. त्यामुळं केसरी लवकरच वाचकांचे आवडते वृत्तपत्र बनले.नंतरच्या काळात आगरकरांनी केसरी सोडून ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले असले तरी केसरीने आपला बाणा कधी सोडला नाही.तसेच अफाट कर्तृत्व बजावलेले अनेक दिग्गज नंतरच्या काळात केसरीच्या संपादकपदी विराजमान झाले . त्यांनी केसरीचा दरारा आणि दबदबा वाढवत नेला. काही काळ का असेना केसरीचे संपादक होण्याचा मान दा.वि.तथा बाबुराव गोखले यांनाही मिळाला होता.बाबुराव गोखले हे केसरी संस्थेच्या ‘मराठा’ साप्ताहिकाचे मुख्य संपादक.नंतर त्यांनी केसरीचे सहसंपादक म्हणून काम केले.कालांतराने ते केसरीचे संपादकही झाले.
दा.वि.गोखले यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1885 रोजी कोल्हापूर येथे झाला.तेथेच शालेय आणि इंटर आर्टसपर्यतंचे शिक्षण झाले.त्यांनी बडोदा येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.त्यानंतर त्यांनी मुंबईतील आर्य़न हायस्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली .त्याच काळात त्यांनी एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते वकिल झाले.त्यांनी 1915मध्ये केसरी-मराठा संस्थेत प्रवेश केला.बालपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या बाबुरावांना आपले आवडते काम कऱण्याची संधी केसरी-मराठा संस्थेत ते गेल्यानंतर मिळाली.त्यांची राजकारणाशीही ओळख येथेच झाली आणि ते टिळकांच्याबरोबर राजकारणाही सक्रीय झाले.टिळकांबरोबर त इंडियन होमरूलच्या कार्यात सहभागी झाले.लिगच्या स्थापनेपासूनच ते सरचिटणीस होते.त्याच बरोबर मुंबई प्रांतिक परिषद,पुणे सार्वजनिक सभा,या संस्थांचे चिटणीस म्हणूनही ते काम पाहू लागले. त्या काळात त्यांनी स्वराज्य पक्ष,कॉग्रेस पक्ष,लोकशाही स्वराज्य पक्ष,आदि संस्थांमधून काम केले.गोखले अनेक वर्षे सहकारी संस्थांच्या कार्यात भाग घेत असत.या शिवाय हिंदी प्रचार संघ,वक्तृत्वोजक सभा टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट,या संस्थांमध्येही त्यांनी काम केले.1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना काही काळ स्थानबध्द कऱण्यात आले होेते.पुणे महापालिकेचे सभासद म्हणून त्यांनी अकरा वर्षे काम केले .1918 ते 1930 अशी तब्बल बारा वर्षे ते मराठा साप्ताहिकाचे मुख्य संपादक होते.1946-47 या काळात ते केसरीचे संपादक होते.1954च्या जानेवारीमध्ये ते केसरी-मराठा संस्थेतून निवृत्त झाले.
– 1940 ते 1947 या काळात स्वातंत्र्य लढ्याची तीव्रता शिगेला पोहोचली होती.याच काळात वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा ,वृत्तपत्रांवर विविध निर्बंध लादून वृत्तपत्रांचा आवाज चेपून टाकण्याचा प्रय़त्न ब्रिटिश सत्ताधीश करीत होते.वृत्तपत्रांची गळचेपी कऱण्याच्या सरकारी धोरणाच्या विरोधात संघटीत आवाज उठविण्यासाठी 1940 मध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाची स्थापना कऱण्यात आली.( तत्पुर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे 1939 मध्ये मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली होती ) या संघाच्या स्थापनेत केसरीचे संपादक दा.वि.गोखले,ज.स.करंदीकर,लोकशक्तीचे संपादक शं.द.जावडेकर,ज्ञानप्रकाशचे संपादक कृष्णाजी ग णेश उर्फ काकासाहेब लिमये यांचा मोठा वाटा होता. मुबई मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद या संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध होता.1945मध्ये सोलापूर येथे झालेल्या परिषदेच्या पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद दा.वि.गोखले यांनी भूषविलेलं आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारांवर कोणकोणत्या कायद्यानं निर्बॅंध आणले जात आहेत हे विस्तारानं सांगितलं होतं.कायद्यातील राजद्रोहाचं कलम,कोर्टाच्या बेअदबीचं कलम,संस्थानिकाच्या संरक्षणाचा कायदा,जुन्या 1910च्या प्रेस ऍक्टची जागा घेतलेल्या प्रेस इमर्जन्सी पॉवर्स ऍक्ट,भारत संरक्षण कायदा,या शिवाय वृत्तपत्र नियंत्रक,डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट,यांचे हुकूम खालच्या मॅजिस्ट्रेटच्या ताकिदी असे अऩेक काटेरी लगाम वृत्तपत्रांना लावले जात आहेत.पत्रकारांची सामर्थ्यवान संघटना हेच यावरचे रामबाण औषध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि पत्रकारांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात आग्रही प्रतिपादन केले होते.7 एप्रिल 1962 रोजी त्यांचं निधन झालं.
————————————————————————————————————
1946 मध्ये नागपूर येथे झालेल्या सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापनेत ज्यांचा मोठा सहभाग होता अशा तत्कालिन ज्येष्ठ पत्रकारांमध्ये श्रीपाद शंकर नवरे यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.1939ला परिषदेची स्थापना झाल्यानंतर सहावं अधिवेशन नागपूरला झालं.त्याचं अध्यक्षपद श्री.शं.नवरे यांनी भूषविलं होतं.आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी ‘पत्रकारिता हा धंदा नसून धर्म ‘ असल्याचं प्रतिपादन केलं होतं.पत्रकारांचे प्रश्न,त्यांची वेतनश्रेणी यावरही त्यांनी भाष्य केलं .पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल त्यांना असलेली तळमळ लक्षात घेऊनच पत्रकारांची वेतनश्रेणी नक्की कऱण्यासाठी नेमलेल्या समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडं दिलं गेलं होतं.
नवरे याचं घराणं कोकणातलं.रत्नागिरी जिल्हयातील सोलगावचे राहणारे.मात्र श्रीपाद शंकर नवरे यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1900 रोजी पुणे जिल्हयातील निमगाव केतकी या खेड्यात झाला.वडिल शंकर भास्कर नवरे शिक्षक असल्यानं त्यांच्या सातत्यानं बदल्या होत.त्यामुळं त्याचं शिक्षणही विविध गावात झालं.प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे आणि राजापुरात तर माध्यमिक शिक्षण सोलापुरात झालं.1918मध्ये झालेल्या शालातं परीक्षेत ते पहिले आले.त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि विल्सन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.मात्र बाहेर सुरू असलेल्या असहकाराच्या चळवळीमुळे त्यांचं मन शिक्षणात रमलं नाही.ते असहकाराच्या चळवळीत ओढले गेले.स्वाभाविकपणे शिक्षणावर पाणी पडलं.पुढं काही दिवस वाईच्या राष्ट्रीय शाळेत ज्ञानदानाचं काम त्यांनी केलं.नंतर सामाजिक कार्याच्या ओढीनं त्यांनी दिल्लीच्या स्वामी श्रध्दांनंदांच्या आश्रमात काम केले.मात्र पत्रकार व्हायचा निश्चय त्यांनी बालपणापासूनच केलेला असल्यानं त्यांनी त्या दिशेनं प्रयत्न सुरू केले.आपल्या काही मित्रांच्या सहकार्यानं त्यांनी ‘प्रताप’ नावाचं पाक्षिक काढलं.मात्र ते अल्पायुषी ठरलं.उपजिविकेसाठी काही कऱणं अपरिहार्य असल्यानं त्यांनी ‘लोकमान्य’ दैनिकात नोकरी पत्करली.कालांतरानं म्हणजे 1932मध्ये त्यांनी प्रभातमध्ये प्रवेश केला आणि 1938मध्ये पांडुरंग महादेव यांच्या निधनानंतर ते प्रभातचे संपादक झाले.बारा वर्षे त्यांची संपादकीय कारकीर्द गाजली.सुबोध भाषा शैली आणि सामाजिक आशय यामुळे त्यांचे अग्रलेख वाचकांच्या मनाचा ठाव घेत.अग्रलेखांबरोबरच त्यांनी ‘प्रभात किरणे’ या शिर्षकाखाली स्फुट लेखनही केलं आहे.याच काळात प्रभातची पुणे आवृत्ती सुरू झाली.मात्र त्यामुळं मुंबईची मुळ आवृत्ती अडचणीत आली.मुंबईचा अंक बंद पडला.पुण्याची आवृत्ती वालचंद कोठारी यांनी घेतली.
प्रभातच्या माथ्यावर ‘सत्य तेच बोलणार व न्याय्य तेच कऱणार’ हे ब्रिद नोंदविलेलं होतं.नवरे यांनी अखेरचा अग्रलेख लिहिपर्यत याच तत्वाला अनुसरून पत्रकारितेतील पथ्य पाळली.नवरे हिंदु सभेचं काम करीत,गांधीवादाविरूध्द टिळकपक्षीय केळकरांना मानणारे अशी त्यांची प्रतिमा होती.त्यामुळे ते गांधीवादी विचारांचे टिकाकार म्हणूनच ओळखले जात.असे असले तरी जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला.कारावासही भोगला.त्यांच्या वागण्यात-लिखाणात काही प्रसंगी अशी विसंगती दिसते.नवरेंच्या जहाल लिखाणामुळे प्रभात सरकार विरोधी पत्र असल्याचं बोललं जायचं.त्याचा फटकाही वेळोवेळी प्रभातला बसला पण प्रभातच्या मालकांची याबद्दल तक्रार नसायची.नवरेंची तत्वनिष्ठा आणि तपश्चर्या एवढी होती की,अनेकदा मालकांना नमते घ्यावे लागायचे.मालक सांगतील तसे संपादकानं वागावं,लिहावं अशीच मालकाची अपेक्षा असते.हल्लीच्या काळात तर’ काय करणार बाबा नौकरी टिकवावी लागेल’ अशी अगतिकता व्यक्त करीत मालकाच्या सूचनेनुसार अग्रलेखही बदलणारे संपादक दिसतात. नवरेंनी अशी तडजोड कधी केली नाही.पांडोबा भागवतांनी लोकशाही स्वराज्य पक्षासाठी प्रभात सुरू केले होते.मात्र पंतांनी या पक्षालाही सोडलं नाही.प्रभात मधून ते त्याचे वाभाडे काढायचे.ते हिंदू सभेत असताना त्यांनी हिंदू सभेवरही झोड उठवायला कमी केलं नाही.याचा फटका दैनिकाच्या खपाला बसला.प्रभात बंद पडले.असे असले तरी प्रभातनं भारतीय वृत्तपत्रांच्या उज्जवल इतिहासात केवळ भरच घातली असं नाही तर प्रभात हे या इतिहासातले सोनेरी पान ठरले आणि त्याचं सारं श्रेय अर्थातच नवरे यांना द्यावं लागेल.संपादकांचं स्वातंत्र्य हा वृत्तपत्र व्यवसायातील अखेरचा शब्द मानला,बातमीदारांचे स्वातंत्र्य देखील संपादकांच्या स्वातंत्र्या एवढेच महत्वाचे मानले,आणि कोणत्याही मतांच्या,विचारांच्या बातम्या देताना कधी पंगतीेभेद केला नाही.पत्रकारिता हा धर्म आहे याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती आणि हे धर्माचारन करताना जे भोग,ज्या हालअपेष्टा वाट्याला आल्या त्या कोणतीही तक्रार न करता भोगल्या.पत्रकारांचे प्रश्न अवगत असलेल्या नवरे यांनी ते साडविण्यासाठी प्रय़त्न केले.त्यासाठी संघटनात्मक उभारणी केली.मराठी पत्रकार परिषदेप्रमाणेच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उभारणीतही त्यानी मोठी भूमिका पार पाडली.1944-45 मध्ये त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचं अध्यक्षपदही भूषविलं होतं. समाजाची त्यांची नाळ कायमची जुळलेली असल्यानं असेल कदाचित पण मुंबईकर त्यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधत.
प्रभातचं प्रकाशन बंद झाल्यानंतर 1951 ते 1960 या काळात त्यांनी मौजचं सपादन केलं.महाराष्ट्र टाइम्स,लोकसत्तामधूनही त्यांनी विपूल लेखन केलं.निष्पक्ष आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून त्यांच्याबद्दल आजही पत्रकारांच्या मनात आदरभाव आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालेले होते.त्यादृष्टीनं देशभर धामधूम सुरू असतानाच धुळे येथे १९४७ ला मराठी पत्रकार परिषदेचे सातवे अधिवेशन भरले होते.या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते,’चित्रमय जगत’ मासिकाचे संपादक,थोर स्वातंत्र्य सैनिक गांधीवादाचे निष्ठावंत प्रचारक त्र्य,र. उर्फ मामासाहेब देवगिरीकर यांनी .चित्रमय जगत या नावावरूनच मासिकाच्या स्वरूपाचा बोध होतो.त्याकाळी मराठी भाषेतील एकमेव सचित्र मासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रमयचे मामासाहेब देवगिरीकर 1927 मध्ये संपादक झाले.त्यांनी आपल्या संपादकीय कारकिर्दीत चित्रमय जगतची पत आणि प्रतिष्ठा वाढविली.चित्रमय जगतचे प्रसंगानुरूप विशेषांक प्रसिध्द होत.हे विशेष अंक संग्राहय असायचे.वाड्मय जगतातही त्यांनी मासिकाला प्रतिष्ठा मिळवून दिली.देशातील आणि परदेशातील घटनांचे सचित्र वर्णन चित्रमयमधून प्रसिध्द होत असे.चित्रांसह वृत्त देण्याच्या पध्दतीमुळे चित्रमय वाचनीय आणि देखणे होत असे.त्यामुळे या पत्राने आपल्या काळात स्वतःची एक ओळख आणि दबदबा निर्माण केला होता.
देवगिरीकर जसे पत्रकार होते तसेच ते चांगले लेखकही होते.त्यांनी विविध ग्रंथांचं लेखन केलेलं आहे.विधायक कार्यक्रम,गांधीवाद,भारताची राज्यघटना,स्वातंत्र्याचा लढा,इत्यंादी विषय त्यांनी आपल्या वेगवेगळ्या ग्रंथातून मांडले.अनेक राजकीय थोर पुरूषांच्या चरित्रांचे लेखनही त्यांनी केलं.स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुसंख्य पत्रकार जसे पत्रकार होते तसेच त्यांचा राजकारणातही वावर आणि सक्रीय सहभाग असायचा.देवगिरीकरही याला अपवाद नव्हते.मिठाचा सत्याग्रह आंदोलनात त्यानी भाग घेतला होता.त्याबद्दल त्यांनी तुरूंगवासही भोगला होता.1942च्या चलेजाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना 28 महिने स्थानबध्द ठेवण्यात आलं होतं.त्या अगोदरही अनेक व्यक्तिगत सत्याग्रहात त्यांनी सहभाग नोंदविला होता. स्वातंत्र्यानंतर गांधी विचारावर अपार निष्ठा असलेले एक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगिरीकरांनी संसद सदस्य म्हणूनही काम केले होते.महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे ते अध्यक्ष होते.खेडोपाडी फिरून त्यांनी कॉग्रेसचा,कॉग्रेसच्या विचारांचा आणि धोरणांचा प्रचार केला होता.राजकारण आणि समाजकारण करताना त्यांनी नेहमीच विधायक कामांना महत्व दिले .अस्पृश्यता निवारण,आणि भंगीमुक्ती कार्यक्रमाचे महत्व कार्यकर्त्यांना पटवून देण्याचा त्यांनी प्रय़त्न केला .विविध संस्थाशीही त्यांचा संबंध होता.’लोकशक्ती’ हे पत्र चालविण्यासाठी ज्या राष्ट्रीय विचार प्रशारक मंडळाची स्थापना कऱण्यात आली होती त्यामध्ये देवगिरीकरांचा सहभाग होता.गांधी स्मारक निधीचेही ते अध्यक्ष होते. अशा प्रकारे पत्रकारिता,राजकाऱण,समाजकारण,साहित्याच्या क्षेत्रात मोठे योगदान देण़ाऱ्या मामासाहेब देवगिरीकर यांची धुळ्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड होणे उचितच होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी यशस्वी पत्रकार कसे होता येईल किंवा पत्रकारांची भूमिका काय असावी याचे केलेले विश्लेषण आजच्या परिस्थितीतही लागू होते.ते म्हणतात,’वृत्तपत्र चालविणारे जर निर्भय आणि निःपक्ष नसतील तर ते प्रामाणिकपणे जनतेची सेवा करू शकणार नाहीत.सत्य प्रतिपादनासाठी अलोट नैतिक शक्ती लागते.विचार हा भावनेला लगाम घालतो.पण स्वार्थप्ररित भावना या अशुध्द असतात व त्याचे सद्वविचार मातीत मिसळतात.ज्यांच्यात भावना व विचार तुल्यबळ असतात,तेच प्रभावी कार्य करू शकतात.नुसती भावना ही अल्पजिवी असते आणि नुसते विचार निष्क्रीयता शिकवितात.वृत्तपत्रकार हा जसा इतिहासकार आहे तसाच तो सत्यप्रतिपादकही आहे.इतिहासकाराचे काम इतस्ततः विखुरलेली फुले गोळा करून त्यांची माळ गुंफण्याचे असते.पण तेवढ्यानं वृत्तपत्रकाराचे काम संपत नाही.त्याला तयार झालेल्या या वृत्ताचे प्रतिपादन करायचे असते.तीच तर त्याची कसोटी.ते प्रतिपादन जर धैर्यानं त्याला करता आलं नाही तर तो खरा वृत्तपत्रकार होत नाही.’.
संपादकाच्या स्वातंत्र्याचा संकोच कसा केला जातो याचं विश्लेषण त्यांनी मार्मिकपणे केलं आहे.’संपादकाची स्थिती केविलवणी झालेली आहे.पत्राचा संचालक सांगेल ते धोरण आणि पटवेल तो युक्तीवाद.संपादक हा वृत्तपत्राच्या कारखान्यात खिळ्याप्रमाणे अचेतन वस्तू बनला आहे.कोणत्याही विषयावर त्याला स्वतंत्रपणे लिहिता येत नाही.अमूक बातमीचा किंवा लेखाचा आपल्या धंद्यावर काय परिणाम होईल ते अगोदर संचालक बघतो.सत्यासत्य बघत नाही.त्या अदृश्य व्यक्तिचे विचार,संपादकाला समजून गौरवून,बुध्दिमत्तेची किनार लावून मांडावे लागतात.कालांतरानं तो संपादकही भावना मेलेला ,विचार नष्ट झालेला असा एक खर्डेघाशा होता’.मामासाहेबानी वर्णन केलेली परिस्थिती 1947 ची आहे.आज भांडवलदारांच्या हातीच वृत्तपत्रसृष्टी गेलेली असल्यानं परिस्थिती किती विदारक बनली असेल याचा आपण अंदाज करू शकतो.
मामासाहेब देवगिरीकर यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं.
————————————————————————————————————
सातारा येथे 1948मध्ये झालेल्या आठव्या अधिवेशनाचे अध्यक्ष
ना.रा.बामणगावकर
–खापर्डे बंधूंनी 1920मध्ये सुरू केलेल्या ‘उदय’ पत्रानं अमरावतीच्या स्वातंत्र्य लढ्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे.अमरावतीत आज विविध प्रकारची दैनिकं प्रसिध्द होत असली तरी त्याकाळात माध्यमांचा विकास फारसा झाला नव्हता.अशी स्थितीत चळवळीचे मुखपत्र म्हणूनच खापर्डे यांनी उदयला जन्म दिला होता.कालांतरानं म्हणजे 1928 मध्ये खापर्डे बंधूंकडून ना.रा.बामणगावकरांनी उदय विकत घेतले आणि आयुष्यभर अत्यंत निष्ठेन%A