माहित आहे? भाई कोतवाल कोण होते ?

0
3884

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या भारतपूत्रांनी बलिदान केले त्यात रायगड जिल्हयातील  वीर भाई कोतवाल यांचा उल्लेख करावाच लागेल.दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वीरांची उपेक्षा झाली त्यात भाई कोतवाल यांचाही समावेश आहे.भाई कोतवाल यांची उद्या 2 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे.या दिवशी कोणताही शासकीय कार्यक्रम होत नाही.रायगड प्रेस क्लबने माथेरान-नेरळ रस्तायव भाई कोतवाल यांचे स्मारक उभारले आहे आणि दर वर्षी दोन जानेवारीला येेथे अभिवादन कार्यक्रम केला जातो.शि.म.परांजपे कोण हे महाडच्या नव्या पिढीला माहित नसल्याचा अत्यंत विदारक अनुभव मला आला.या पार्श्वभूमीवर भाई कोतवालांची ओळक नव्या पिढीला व्हावी यासाठी भाईचे छायाचित्र असलेले एक कॅलेंडर कर्जत प्रेस क्लब उद्या प्रसिध्द करीत आहे.कर्जथ प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनःफूर्वक धन्यवाद.तसेच उद्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाई कोतवाल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

हुतात्मा भाई कोतवाल-मॅन ऑफ दी पीपल

कतृत्व,विद्वत्तता आणि शोर्याचे वरदान रायगडला लाभलेले आहे.गगनाला गवसणी घालणारे अनेक महापुरूष रायगडने देशाला दिले.दुर्दैवानं स्वातंत्र्योत्तर कालखंडात रायगडच्या सर्वच नररत्नांना ङ्ग न्यायङ्घ मिळालाच असं नाही.व़िठ्ठल लक्ष्मण त था भाई कोतवाल असेच उपेक्षित स्वातंत्र्यवीरांपैकी एक.अफाट बुध्दीमत्ता,अचाट कर्तुत्व,पराकोटीचे मातृप्रेम,कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये 1 डिसेंबर 1912 रोजी एका गरीब कुटुंबात झाला.जेमतेम 31 वर्षांचे आय़ुष्य लाभलेल्या हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला.पुण्यात शिक्षण घेताना शि.म.परांजपे यांच्या काळमधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला.वि.दा.सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर, तसेच जोसेफ मॅझिनी,गॅरी बोल्डी यांच्या पुस्तकांनी त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जागृत केल्या.त्यामुळं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.1942च्या चळवळीत भाई कोतवाल,हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षऱशः  सळो की पळो करून सोडलं होतें. त्यांचा ङ्गआझाद दस्ताङ्घ रेल्वेचे रूळ उखडून टाक ायचा, विजेच्या तारा तोडायचा अन्य घातपाती कारवाई करून  जंगलात पसार व्हायचा. या गनिमीकाव्यामुळं  सरकार त्रस्त झालं  होतं  मात्र .जंग जंग पछाडल्यानंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात  सरकारला यश येत नव्हतं.त्यामुळं भाई कोतवाल आणि गोमाजी रामा पाटील यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास सरकारने पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.अखेर पैश्याच्या लालसेनं घात केला.एका फितूरानं पोलिसांना भाईंचा जंगलातील ठावठिकाणा तपशीलवार सांगितला. त्यानुसार हॉल नावाचा पोलिस अधिकारी शंभर बंदुकधारी पोलिसांचा ताफा घेऊन भल्या पहाटेच जंगलात घुसला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रारंभी हिराजी पाटील हुतात्मा झाले.त्यानंतर भाई कोतवाल यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला गेला.  अ खेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला.तो दिवस होता 2 जानेवारी 1943 चा.
– मुंबई सरकारच्या गोपनीय अहवालात भाई कोतवालांचा उल्लेख ङ्ग मॅन ऑफ दी पीपलङ्घ असा केला गेला आहे.भाई हुतात्मा कोतवाल रायगडचे सुपूत्र आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.तरूणपणीच देशासाठी सर्वस्वाचं बलिदान कऱणाऱ्या भाई कोतवालांचं भव्य स्मारक रायगडात व्हावं ही रायगडवासियांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here