अलिबाग- मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आपण वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन पेणच्या प्रांताधिकारी निधी चौधरी यांनी दिल्यानंतर काल प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी मागे घेतले.
मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पामुळे रायगड जिल्हयातील अनेक शेतकरी तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांचे रहिवासी बाधित होत आहेत.त्याच्या समस्यांक डे वारंवार सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधल्यानंतरही त्यांच्या प्रश्नाची दखल न घेतली गेल्याने काल प्रकल्पग्रस्तांनी पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली होती.मात्र प्रातंाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.जमिनीला आणि घरांना बाजारभावानुसार दर द्यावा ही प्रकल्पग्रस्तांची मुख्य मागणी असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे नेत संतोष ठाकूर यांनी आकाशवाणीला सांगितले.आंदोलनाचे नेतृत्व ज्य़ेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी.जी.पारेख यानी केले.