मुंबई- माहिती आणि जनसंपर्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित असून त्याचा एक भाग म्हणून दीर्घकाळ रिक्त असलेल्या माहिती महासंचालक पदावर मुंबईचे माजी जिल्हाधिकारी श्री.चंद्रशेखर ओक यांची नियुक्ती होत असल्याची बातमी आहे.ओक हे एक कार्यक्षम आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी असून ते माहिती विभागाला सिस्त लावतील अशी शक्यता आहे.अजय अंबेकर यांना संचालक म्हणून औरंंंंंगाबादला पाठविण्यात आलं आहे.गेली अनेक वर्षे हे पद रिक्त होते.
मुख्यमंत्री कार्यालयातील पीआरओ सतीश लळित आणि अनिरूध्द अष्टपुत्रे यांचीही बदली झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आता एमएसइबीचे पीआरओ राम दुतोंडे तसेच अजय जाधव यांची नियुक्ती केली गेली आहे.माहिती आणि जनसंपर्क विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याबाबत आणि हा विभाग अधिक सक्षम कऱण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहे.
खालील अधिकाऱऱ्यांना पदोन्नती
———————
माहिती आणि् जनसंपर्क विभागातील खालील अधिकाऱ्यांना पदोन्नती देत त्याच्या विविध रिक्त पदांवर पुढील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.
विविध रिक्त पदांवर नियुक्तया करण्यात आल्या आहेत.
बी.सी.झंवर ( सहाय्यक संचालक)
पीएस मुळवाडकर ( सहाय्यक संचालक)
सुधा महाजना ः ( अधिक्षक पुस्तके व परिक्षण )
सुलभा कुरपेकर ( माहिती अधिकारी)
शांताराम शेरवाडे ( माहिती अधिकारी)
दीपक चिंचकर ( माहिती अधिकारी )
नंदकुमार वाघमारे ( माहिती अधिकारी शिर्डी)