अलिबाग-शहरीकरण आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे रायगड जिल्हयातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसते आहे.जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात 2 हजार 587 गुन्हयांची नोंद झाली आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या उरण आणि पनवेल तालुक्यांचा समावेश नाही.सर्वाधिक 492 गुन्हयांची नोंद खालापूर तालुक्यातील पोलिस ठाणे हद्दीत झाली असून सर्वात कमी गुन्हे तळा तालुक्यातील पोलिस ठाणे हद्दीत झाली आहे.जिल्हयाचं मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यातील पोलिस ठाणे हद्दीत 369 गुन्हे नोंदविले गेले आहेत.या गुन्हयामध्ये खून,बलात्कार,विवाहितेचा छळ अशा गंभीर गुन्हयांची संख्याही मोठी आहे.सुदैवाने या गुन्हयातील 4 हजार 792 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले .असल्याची माहिती रायगड पोलिसाच्या सूत्रांनी दिली.शांत कोकण पट्टयात वाढत असलेली गुन्हेगारी सार्वत्रिक चिंतेचा विषय होत आहे.