भाजप-सेनेत आता जाहिरात युध्द

0
1052

 भाजपचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे व आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडली असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या जाहिरात खर्चाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल्या केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातींमध्ये त्यांचे अनेक नेते झळकत आहेत. ते स्वत: निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यामुळे या जाहिरातींवरील खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात धरला जायला हवा. तसे झाल्यास या सगळ्या उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चाची मर्यादा ओलांडली जाईल, असा दावा शिवसेनेने आयोगापुढे केला आहे. या निकषावरच फडणवीस, खडसे, तावडे, शेलार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी केल्याचे रावते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here