इस्लामिक स्टेट आतंकवाद्यांनी उत्तर बगदादच्या विविध शहरात एक इराकी फोटो जर्नालिस्ट आणि अन्य बारा जणांची निघृण हत्त्या केली.मृत पत्रकाराचे नाव राद अल अजवी असे असून तो वृत्त वाहिनी समा सलाहेद्दिनसाठी काम करीत होता.राद आणि त्याच्या भावासह इतरांना तिकरित शहराच्या पुर्व भागात असलेल्या समारा गावात गोळी घालून ठार कऱण्यात आले असे पत्रकाराच्या नातेवाईकांनी सांगितले.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या माध्यमासाठी काम करणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सात डिसेंबर रोजी या पत्रकाराला ओलिस म्हणून पकडण्यात आले होते.राद चा गुन्हा एकच होता तो पत्रकार होता आणि तो नेहमी आपला कॅमेरा आपल्या सोबत ठेवायचा.