56 मतदान केंद्रं संवेदनशील

0
779

रायगड जिल्हयातील सात विधानसभा मतदार संघात 56 मतदान केंद्रं संवेदनशील म्हणून जाहीर कऱण्यात आली असून मतदानाच्या दिवशी या केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी 76 सुक्ष्म निरिक्षकाच्या नियुक्तया करण्यात आल्याची माहिती जिल्हा सुरक्षा आराखडा समिती प्रमुख तथा रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.
सुक्ष्म निरिक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्यासाठी अलिबाग येथे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.निवडणुकीच्या दिवशी संवेदनशील मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.काही मतदान केंद्रावर पोलिसांच्या बरोबरच रॅपिड ऍक्शन फोर्स,एसआरपीच्या तुकड्याही तैनात केल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here