आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद

0
790

इस्लामी अतिरेकी संघटना आयएसआयएसने आज आणखी एक व्हिडिओ प्रसिध्द केला आहे.या व्हिडिओत ब्रिटेनचे पत्रकार एलन हेनिंगचे शीर उडवताना दाखविले गेले आहे.उत्तर इंग्लंडचे रहिवाशी असलेले हेनिंग मागच्या वर्षी सिरियातून अतिरेक्यांनी पकडले होते.हेनिंगच्या पत्नीने वारंवार पतीच्या सुटकेची अपिल करीत होती,पण ते झाले नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड यांनी या अमानविय प्रकरणात असलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी आम्ही शक्य तो प्रय़त्न क रू अशे म्हटले आहे.
या अगोदर ब्रिटनचे डेव्हिड हेन्स यांचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जारी केला होता.त्यानंतर अमेरिकेच्या जेम्स फॉली आणि स्टीवेन सोटलोफ यांचा शिरच्छेद करतानाचे फोटो जारी केले होते.हेनिंगच्या हत्येबद्दल अमेरिकेने दुःख व्यवक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here