रायगड जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या निवडणुका आज बिनविरोध पार पडल्या.त्यानुसार अर्थ आणि बांधकाम सभापतीपदी शेकापच्या चित्रा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.अर्थ आणि बांधकाम सभापती होणा़ऱ्या रायगड जिल्हा परिषदेतील त्या पहिल्याच महिला आहेत.अन्य सभापतीची निवडही बिनविरोध झाली.त्यानुसार समाजकल्याण सभापतीपदी गीता जाधव,शिक्षण आणि आरोग्य सभापतीपदी भाई पाशिलकर,आणि महिला आणि बालकल्याण सभापतीपदी प्रिया मुकादम यांची निवड कऱण्यात आली.रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे.त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी दोन सभापतीपदं आली आहेत.