कॉग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका गांधी एका बातमीनं चांगल्याच खवळल्या आहेत.त्यांनी खोटी बातमी दिली म्हणून आता सरळ बदनामीचा खटला दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
राजकीय फायदा मिळविण्याकरिता गांधी घराण्याचे आडनाव मिळविण्यासाठी प्रियंका आणि रॉबर्ट वद्रा हे दाम्पत्य आपला मुलगा रेहान याला राहूल गांधी यांना दत्तक देत आहे असे वृत्त एका साप्तहिकात तसेच काही माध्यमात आल ेहोते.आपल्या कुटुंबाविरोधात करण्यात आलेले हे आरोप निराधार तसेच निखालस खोटे आहेत आणि निंदनीय असल्याचे सांगून प्रियकां गांधी यांनी या माध्यमांना नोटिस पाठविली आहे.त्यांच्या विरोधात खटला दाखल करणार असल्याचे प्रियंका यांनी जाहीर केले आहे.मात्र बातमी कोणत्या साप्ताहिकाने आणि माध्यमांनी दिली होती याची नावं मात्र देण्याच्या माध्यमांनी टाळलं आहे.