टाइम्स – हिंदू जुंपली

0
793

हिंदू आणि टाइम्स ऑफ इंडिया या दोन प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात अधून-मधून तू तू मै मै सुरू असते.हिंदूने टाइम्स ऑफ इडियाला खुले पत्र पाठवून दीपिका पदुकोण प्रकरणाची खपली पुन्हा काढली आहे.हिंदूच्या खुल्या पत्रात टाइम्सला सल्ला दिलाय की,जेव्हा सारी दुनिया तुम्हाला छी,थू करू लागलीय तेव्हा चुकीचे खुलासे करीत बसण्यापेक्षा गप्प बसणं शहानपणाचं असतें.शिवाय आत्मपरीक्षणाचीही गरज असते.आपण जर कोणाच्या मनाला ठेच पोहचलवलीच नसेल तर सारी दुनिया काय म्हणून आपल्या नावानं बोटं मोडतेय,ते तपासलं पाहिजे.पण असं झालेलं नाही.दीपिकाचे ट्वीट आणि नंतर त्याबद्ल फेसबुकवर उमटलेल्या प्रतिक्रियाला उत्तर देताना आपण जी भाषा वापरली आहे ती उचित म्हणता येणार नाही.किंबहुना आपले उत्तर आचंबित कऱणारे आहे.आपण याबद्दल माफीच मागितली पाहिजे. नाही तर किमान याविषयावर गप्प बसले पाहिजे.मात्र आपण या दोन पैकी एकही मार्ग निवडलेला नाही असे न करून आपण आपल्यासाठी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे असेही या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here