आ. जय़ंत पाटील यांची अगतिकता

0
1354

मदार जयंत पाटील यांची छबी नसलेले बॅनर्स अलिबागमध्ये लावण्याची पंडित पाटील यांची खेळी  अ खेर निर्णायक ठरली.पंडित पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर काय होऊ शकत याचा अंदाज जयंत पाटील यांना या बॅनर्सवरून  आला.अशा वेळी  पंडित पाटलांना तिकीट नाकारल्यानं जे काही होणार होतं ते व्यक्तिशः जयंत पाटीलांसाठी आणि पक्षासाठीही परवडणारं नव्हतं.त्यामुळं आपल्या मनाच्या विरोधात  नि र्णय़  घेत त्यांना पंडित पाटील यांची उमेदवारी जाहीर करणं भाग पडलं.ही  वेळ येऊ नये यासाठी जयंत पाटील यांनी करता येतील तेव ढा  आटापिटा केला. “शेकापमध्ये सहजासहजी उमेदवारी मिळत नसते”  असं सांगत आप स्टाईल जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयोगही त्यांनी पार पाडला.शेकापमध्ये” लोकशाहीचा उदय” झाल्याचं चित्र या निमित्तानं प्रथमच जगाला दिसलं.कारण शेकापच्या 66 वर्षाच्या इतिहासात जनतेला विचारून उमेदवार ठरविल्याचं कधी घडलेलं नाही.किमान रायगडमध्ये तर उमेदवार कोण असणार हे अगोदरच ठरलेलं असायचं आणि ते ज गाला ठाऊकही असायचं.त्यामुळं जयंत पाटील जनमताचा अंदाज कश्यासाठी घेत आहेत? हे पंडित पाटील आणि कार्यकर्त्यांनाही   उमगणं अवघड नव्हतं.जनमताचा कौल घ्यायचा म्हणजे काय करायचं ? – ”   आपल्या डोक्यात जो उमेदवार आहे त्याचंच नाव कार्यकर्त्यांकडून वदवून घ्यायचं. .जयंत पाटील यांच्या मनात कोण उमेदवार आहे हे साऱ्याच कार्यकर्त्यांना नक्की माहित  असल्यानं समोर येणारा कार्यकर्ता जयंत पाटलांच्या मनातलं बोलणार हे उघड होतं.पंडित पाटील यांनाही याची जाणीव होतीच होती.त्यामुळंच जयंत पाटलांची ही सारी खेळी निष्प्रभ ठरविण्यासाठी .पंडित पाटील यांनी   “पोस्टर लावण्याचा मास्टर स्ट्रोक” लगावला.  त्यातून पंडितशेठ यांना हवे ते घडले .  पंडित पाटील या टोकाला का गेले ? त्याची नक्कीच  काही कारणं आहेत.पहिलं म्हणजे त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता.  उरण- पनवेलचा प्रश्नच नव्हता,विवेक पाटलांनी अगोदरच दोन्ही नावं जाहीर करून बॅनर्सही लावले होते.पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात  केवळ त्यांची नावं जाहीर कऱण्याची औपचारिकता जयंत पाटील यांनी पार पाडली.पंडित पाटील यांना खात्री होती की,वर्धापनदिन कार्यक्रमात आपली उमेदवारी जाहीर होईल. तसे  झाले  नाही . पंडित पाटलांना हात हालवत परत यावं लागलं.नंतर पेणच्या मेळाव्यात धैर्यशील पाटील यांनाही “ग्रीन सिग्नल” दिला गेला.अडकले होते ते पंडित पाटील.निवडणुकांच्या तयारीसाठी पीएनपीमध्ये जी मिटिंग झाली तेथेही काही झालं नाही.  त्यामुळं  जयंत पाटील आपणास उमेदवारी देत नाहीत हे अधिक प्रकर्षानं पंडित पाटलांना जाणवायला लागलं होतं.पंडित पाटील आजची संधी सोडायची नव्हती.. कारण आमदार होण्याचं स्वप्न बघत बघत त्यांची पन्नाशी केव्हाच उलटून  गेली होती.जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांच्या समवेत जे होते तेे  पंडित पाटलांना ओव्हरटेक करून पुढं निघूुन गेले होते. .यात विवेक पाटील होते,महाडला माणिक जगताप होते,सुनील तटकरे होते,भरत गोगावले होते.ही सारी मंडळी केव्हाच आमदार झाली होती.पंडित पाटील यांना ज्युनिअर असलेले धैर्यशील पाटील,प्रशांत ठाकूरही आमदार झाले होते.तरीही आपणास परत परत जिल्हा परिषदेतच ज्युनिअर लोकांसमोर बसावे लागते याची खंत पंडित पाटील यांना बोचत होती.शिवाय पक्षासाठी आपण रात्रीचा दिवस  करतो,जिल्हयात पक्ष कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याचं,त्यांची छोटी -मोठी अडलेली कामं करण्याचं उत्तरदायीत्व आपणच गेली वीस-पंचवीस वर्षे   पार पाडतो. त्यामुळं पक्षाच्या तिकिटावर आपलाच खरा  हक्क आहे असं त्यांना स्वाभाविकपणे वाटत होतं. ते  चुकीचही नव्हते .   हे सारं वास्तव असताना राजकारणात आपल्यापेक्षा ज्युनिअर  व्यक्तीला  उमेदवारी मिळणार असेल तर पंडित पाटील गप्प बसणे शक्य नव्हते. .कारण प्रश्न पंडित पाटलांच्या स्वप्नांचा आणि अस्तित्वाचाही होता. “आपल्याला डावलून यावेळेस चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आपलं आमदार होण्याचं स्वप्न कधीच प्रत्यक्षात येऊ शकत नाही” हे पंडित पाटील  ओळखून होते  एकदा चित्रलेखा पाटील आमदार झाल्या तर “त्यांच्या ऐवजी मला तिकीट द्या,अशी मागणी पुढच्या किमान तीन टर्म घरातील अन्य कोणी करू शकत नव्हतं” .आणखी पंधरा वर्षे वाट पहायची तर नवी पिढी पुन्हा दावा सांगणार.  हे सारे गणित पंडित पाटील यांच्या स्वप्नावर पाणी फेरणारं होतं.म्हणजे आज नाही तर कधीच नाही अशी स्थिती  पंडित पाटील यांच्यासमोर होती.  उमेदवारीसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची तयारी होती ती यामुळंच..त्यांच्या हालचाली आणि बॉडीलॅग्वेज हेच सांगत होती.  परिणामतः जयंत पाटील यांचा  नाइलाज झाला. खरे तर पंडित पाटील याचं नाव जाहीर करायला टाळाटाळ करताना जयंत पाटील यांनाही पंडित पाटलांसारखीच भिती  होती.म्हणजे पंडित पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले तर किमान पुढची आणखी एक टर्म तरी त्यांना द्यावीच लागेल . पंडित पाटील तसा दावा कऱणार आणि तो संयुक्तिकही असणार.दहा वर्षांनी पक्षाची परिस्थिती कशी असेल हे सांगणं कठीण आहे.त्यामुळं जयंत पाटीलही चित्रलेखा पाटलांसाठी दहा वर्षे वाट पहायला तयार नव्हते. सारी रस्सीखेच त्यामुळंच होती..तरीही  स्फोट होईल इतपत ताणने योग्य नव्हत .भाई ते जाणून होते .

पं डित पाटलांना उमेदवारी देताना लोकसभेत पक्षाचं झालेलं पानिपत हा घटकही फारच महत्वाचा ठरला.लोकसभेच्या वेळेस जयंत पाटील यांचे सारेच डावपेच त्यांच्या अंगलट आले.मनसेशी सोईरीक कर,अ.र.अंतुले यांचे आशीर्वाद घे  अशा अनाकलनीय भूमिका त्यानी घेतल्या. त्या  विवेक पाटील,धैर्यशील पाटीलच काय पण पक्षाच्या सामांन्य कार्यकर्त्यांनाही मान्य होणाऱ्या नव्हत्या . जयंत पाटील यांच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरून  हेच दिसून आले.इतर मतदार संघातलं सोडाच अलिबागमध्येही तब्बल तीस हजार  मतांचा फटका पक्षाला बसला.यामुळं व्यक्तिशः जयंत पाटील आणि शेकापही कमालीचा बॅकफुटवर गेला.पक्षातच जयंत पाटील एकटे पडले.अशा स्थितीत पंडित पाटील यांना डावलणे पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यासाऱखे होते. लोकसभेत जर जयंत पाटलांच्या खेळ्या यशस्वी झाल्या असत्या तर मग त्यांनी कोणालाच भीक न घालता चित्रलेखा पाटलांची उमेदवारी लोकांवर लादली असती. आज तेवढं धाडस कऱण्यासारखी जयंत पाटलांची  परिस्थिती  नाही.त्यामुळं इच्छा असो, नसो पंडित पाटलांच्या नावावर त्यांना शिक्कामोर्तब करणे भाग होते.ते केले गेले.आता उमेदवारी जाहीर झाल्यानं स्पर्धा  संपली असली तरी पंडित पाटील यांच्यासमोरील आव्हानाची मालिका संपली आहे  असं म्हणता येणार नाही.

  जयंत पाटलांना राष्ट्रीय नेते व्हायचंय.त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात संदर्भहिन ठरलेल्या पाच -सहा पक्षांना बरोबर घेऊन “महाराष्ट्र डावी लोकशाही समिती”  अशा नावाची एक मोट बांधली आहे.गेल्या वेळेस या मोटीचं नाव “राष्ट्रीय डावी लोकशाही समिती” असं होतं.या मोटीनं तेव्हा  महायुती आणि आघाडीला समर्थ तिसरा पर्याय देण्याची भाषा केली होती. तशी भाषा आजही केली जातेय. गेल्या वेळेस पर्यायाचं सोडाच पाच आमदारही या समितीला निवडून  आणता आले नाहीत.उद्याच्या निवडणुकीत आहे तेवढे आमदार टिकवता आले तरी मिळविली. खुद्द रायगडातही जर कॉग्रेस आणि राष्ट्रवादी निष्ठेनं एकत्र राहिले तर ज्या शेकापच्या हक्काच्या जागा आहेत त्या देखील धोक्यात येऊ शकतात असा अंदाज आहे.मात्र राष्ट्रीय नेता होण्याची आणि दररोज टीव्हीवर चमकण्याची हौस असलेले जयंत पाटील कॉ.ढवळे,कॉ.रेड्डींना घेऊन तेच ते प्रयोग पुनःपुन्हा करीत आहेत.निवडणुकीसाठी निधी उभा करण्याची क्षमता जयंत पाटील यांच्याकडं असल्यानं “लोकसभेत तुम्ही मनसे आणि अंतुले बरोबर कसे गेलात? आणि त्याअगोदर जिल्हा परिषदेच्या राजकाऱणात तुम्ही शिवसेनेबरोबर कसे होतात?” असे प्रश्न  विचारण्याची हिमंत कॉम्रेड दाखवू शक त नाहीत.विचारांशी द्रोह करणाऱ्या आणि  संधीसाधूपणाच्या तडजोडी कऱणाऱ्या या साऱ्या नेत्यांनी राज्यातील डावी चळवळ संपून टाकली आहे.चळवळ किंवा पक्षाशी कोणाला काही दे़णं घेणं  उरलेलं नाही.आपलं महत्व,आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे एवढाच या साऱ्यांचा अजिंडा असल्यानं फसलेले प्रयोग परत परत करीत जनतेला मुर्ख समजून निवडणुकांना सामोरे जाण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसते आहे.आता जयंत पाटील या समितीचे नेते आहेत,त्यांचा शेकाप चाळीस जागा लढवतो आहे.म्हणजे या जागा निवडून आणण्यासाठी त्यांना अलिबागमध्ये अडकून चालणार नाही. त्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे.”आपण समर्थ पर्याय आहोत” हे दाखविण्यासाठी त्यांना तसे करावे लागणार असल्यानं ते अलिबागमध्ये पंडित पाटलांसाठी कितपत वेळ देऊ शकतील हे बघावं लागेल.जयंत पाटील यांचं अलिबागमध्ये नसणं हे देखील पंडित पाटील यांच्या समोरील मोठे आव्हान ठरणार आहे .

 

एस.एम,देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here