उत्तर प्रदेशमधील जंगलराज जगासमोर आणण्याचा मांध्यमं सातत्यानं प्रयत्न करीत असल्याने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मिडियाला टार्गेट केलं आहे.संधी मिळेल तेव्हा यादव मिडियावर हल्ला बोल करीत असतात.मागच्या आठवड्यात अमर उजालाच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलतााना मुख्यमंत्र्यांनी मुलांना अभ्यास करण्याचा सल्ला देताना पत्रकारांची टर उडविली.ते म्हणाले,मुलांनो कॉपी करून तुम्हाला फार तर पत्रकार होता येईल पण आय़एएस,आयपीएस होता येणार नाही.त्यामुळं चांगला अभ्यास करा
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर युपीतील पत्रकारांमध्ये चर्चा तर जोरात रंगली पण याविरोधात कोणीही आवाज उठविला नाही हे विशेष