माध्यमांमध्ये नवनवे प्रवाह येत असले तरी प्रिन्ट मिडियाचं महत्व आजही कमी झालेलं नाही.किमान जिल्हा पातळीवर तरी प्रिन्टची उपयुकतता आजही आहे.छापून आलेली बातमी सत्य असतेच असते यावर जोपयर्त वाचकांचा विश्वास आहे तोपयर्त प्रिन्ट मिडियाला मरण नाही हे ही तेवढंच खरं.अन्य देशातील मोठी नियतकालिकं बंद होत असली तरी भारतात दररोज नवनवी व-त्तपत्र सुरू होत असतात.हे नक्कीच स्वागताहर् आहे.
नांदेडमध्ये आज दीव्यमत नावाचे दैनिक सुरू होत आहे.गजानन पाटील आणि अजय सुयर्वंशी हे दोन तरूण दीव्यमत सुरू करीत आहेत.नांदेडमध्ये या अगोदरच प्रजावाणी,गोदातीर समाचार,श्रमिक एकजूट आदि जुनी दैनिकं असली या दैनिकाचं नांदेड जिल्हयाच्या जडणघडणीत मोठं योगदान असलं तरी नांदेडमध्ये दैनिकासाठी आणखी स्पेस आहे.ती दीव्यमतच्या निमित्तानं भरून निघावी अशी अपेक्षा आहे.वस्तुतः गजानन पाटील यांनी या दैनिकाचं प्रकाशन माझ्या हस्ते करण्याचं योजिलं होतं मात्र माझ्या काही व्यक्तिगत अडचणींमुळं मला जाता आलं नाही याचं मनस्वी दुःख होतंय,अथार्त मला जाता आलं नाही तरी माझ्या शूभेच्छा आणि सवर् प्रकारचं सहकायर् दिव्यमतला मिळत राहणार आहे.हदगाव सारख्या ग्रामीण भागातील गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी नांदेडमध्ये येऊन मोठं धाडस करतात याचं नक्कीच मला कौतुक आहे.दीव्यमतला माझ्या मनःपूवर्क शुभेच्छा.दीव्यमत नांदेडमधील एक चांगले दैनिक म्हणून नावलौकिक मिळवेल असा मला विश्वास आहे(.SM)