रायगड जिल्हयातील महाड एमआयडीसीमधील एम्बायो कंपनीत आज पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या स्फोटात 1 ठार पाच जखमी झाले असून जखमींपैकी दोघांची प्रकृती चितांजनक असल्याचे महाड ग्रामीण पोलिसांनी सांगितले.जखमींवर महाड येथील रूग्णालयात उपचार कऱण्यात येत आहेत.स्फोट कशाचा आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.ठार झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश बबन कांबळे असे असून तो सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातला रहिवाशी आहे.( ( सोबतचा फोटो फाईल पिक्चर आहे)