सलग चार दिवस आलेल्या सुट्यांमुळे रायगड जिल्हयातील अलिबाग,मुरूड जंजिरा,हरिहरेश्वर,रायगड किल्यांसह सर्वच पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.जिल्हयातील सर्वच समुद्र किनारे,किल्लयांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे.त्यामुळे बहुतेक ठिकाणची हॉटेल्स,लॉजेस हाऊस फुल्ल झाली आहेत. अनेक ठिकाणी घरगुती निवास व्यवस्था केली जाते मात्र तेथेही हाऊस फुल्लचे बोर्ड लागले आहेत.माथेरानला तर जत्रेचं स्वरूप आलं आहे.पावसाळ्यात माथेरानची नेरळ माथेरान रेल्वे बंद असली तरी अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू असते.दहा मिनिटाच्या या रेल्वे प्रवसासाठीही पर्य़टकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केलेली दिसते.दस्तुरी नाक्यावर अपुऱ्या वाहनतळामुळे एक किलो मीटरपर्यतच्या रांगा लागल्याचे दिसते आहे.