कोकण रेल्वे मार्गावर गणपतीत डबल डेकर

    0
    808

    अलिबाग- कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर वातानुकूलीत गाडी सुरू कऱण्यातील सारे अडथळे दूर झाल्याने गणपतीच्या काळात ही गाडी सुरू होईल अशी शक्यता आहे.सुरूवातीला ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालेल असे रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

    लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी गोवा या दरम्यान गाडीची चाचणी पूर्ण झाली असून या चाचणीत गाडीने सारे अडथळे पार केले आहेत.पनवेल ते रोहा दरम्यान काही तांत्रिक मुद्दे होते मात्र त्याचेही मध्य रेल्वेने निराकरण केल्याने आता कोणत्याहीक्षणी ही गाडी सुरू होईल.डबल डेकरचे काही डबे मुंबईत आले आहेत.आणखी काही डबे लवकरच येत आहेत.गाडी बारा डब्याची असेल.या रेल्वेने ऐन गणपतीच्या काळात चाकऱमाण्यांची होणारी ससेहोलपट कमी होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here