एस.एम.देशमुख
पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील माळिण गावावर आज सकाळी दरड कोसळळी.चाळीस घरं गाडली गेली आहेत.त्यात किती लोकांचा बळी गेला हे ढिगारे पुर्ण उपसल्याशिवाय समजणार नाही.आज सकाळी अकराच्या सुमारास ही बातमी टीव्हीवर दिसायला लागली अन माझा थरकाप उडाला.अनेकाना फक्त ऐकूनच माहित असेल पण दरड कोसळणे काय प्रकार असतो हे मी जातीनं पाहिलं, अनुभवलं आहे. दरड कोसळळी या बातमीनंच कोकणातील जनतेचा तर ह्रदयाचा ठोकाच चुकतो..मला आठवतंय,26 जुलै 2005 चा तो दिवस होता.सलग आठ दिवस पावसाची झड लागलेली होती.सगळीकडं पाणीच पाणी झालं होतं.त्यातच 26 तारखेला पावसाची जोर आणखीनच वाढला.पाऊस कोसळत असतानाच समुद्राला भरती असल्यानं नद्याचं पाणी स्वीकारायला समुद्र तयार नव्हता.त्यामुळं नद्या आपली सीमा सोडून दिसेल तिकडं वाहू लागल्या होत्या.गोरेगावला कधी पूर आलेला नव्हता पण गोरेगावात नद्याच्या पाण्ीी घुसलं आणि या बाजारपेठेच्या गावाची मोठी हानी झाली.नद्यांना आलेल्या पुरामुळं न दी काठी असलेली 262 गावं जलमय झाली होती.खाडीच्या तोंडावर असलेल्या 70 गावांमध्ये घरादारात पाणी खेळत होतं आणि समुद्राच्या काठावर असलेली 53 गावं जीव मुठीत घेऊन जगत होती. जिल्हयातील शेकडो गावं निसर्गाच्या प्रकोपाला(?) तोंड देत असतानाच 26 च्या एकाच रात्री अनेक गावांवर दरडी कोसळल्या.पुर येणं वगैेरे प्रकार रायगडला आणि कोकणाला नवे नव्हते.1989या वर्षी दर नागोठणे आणि जांभुळपाडा या गावंाची अबंा नदीच्या पुरानं दैना उडवून टाकली होती.त्यामुळं पुराला तोंड देण्याची मानसिक तयारी असते.पण 2005मध्ये दरडी कोसळण्याचं नवं संकट कोकणावर आदळलं होतं.तत्पुर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या नव्हत्या.त्यामुळं या नव्या संकटानं कोकणी माणून पार मोडून पडला.ज्या गावावर दरडी कोसळल्या त्या गावांची नावं मला आजही आठवतात.त्यात महाड तालुक्यातील दासगाव,रोहन,जुई,कोंडिवते,अप्पर तुडील,पोलादपूर तालुक्यातील कुडपण,कोंढवी,कोतवाल या गावांचा उल्लेख करता येईल.डोंगर कपारीत आपल्याच धुंदीत राहणारी ही आणि अन्य सहा सात गावं एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. मी अलिबागला होतो. मला सकाळी बातमी कळली तेव्हा परिस्थितीचा मला अंदाज आला आणि रिपोर्टर जनार्दन पाटील आणि फोटोग्राफर जि तू शिगवणला घेऊन मी दासगाव,रोहन आदि गावांमध्ये पोहोचलो.अजून शासकीय यंत्रणा पोहोचली नव्हती.आम्ही या दरड कोसळण्याच्या घटनेची जी दृश्ये पाहिली ती अजूनही माझ्या विस्मृतीत गेलेली नाहीत. ती विसरणंही शक्य नाही.माणसाच्या शरिराचे तुकडे आम्ही पाहिले.कोणाचा हात इकडं तर धड तिकडं,कोणी पार चिखलातू मिसळून गेलेला तर कोणाची अवस्था ओळखू न येण्यासारखी.अंगाचा थरकाप उडविणारी सारी दृश्यं होती.दासगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरचं एका वळणावरचं गाव.एका बाजुला न दी आणि उश्याला डोंगर असलेल्या या गावाच्या अर्ध्या भागावर दरड कोसळली होती.55 जणांचा ति थं बळी गेला होता. – सारा आकांत होता. रोहऩ या गावची स्थिती तर अशी होती की, ति थं माहिती द्यायलाही किंवा नातेवाईक गेलाय म्हणून त्याच्यासाठी रडणारंही कोणी दिसत नव्हतं. नऊ गावात मिळून 300वर लोक मृत्यूमुखी पडले होते.अनेक कुटुंबं अशी होती की,ती पूर्णतः – संपली होती.म्हणजे घरातला एकही वाचला नव्हता.एक घटना अशी होती की,चार वर्षांची एक मुलगी वाचली होती,मात्र तिच्या घरातली सात माणसं गाढली गेली होती.दोन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या एका तरूणाच्या घरावर झालेला आघात आणि त्याचा आकोश मन पिळवटून टाकणारा होता.एका घरातील अकरा माणसं गेली होती आणि 75 वर्षांची म्हातारी तेवढी जिवंत होती.ती अक्षरशः- वेडीपिशी झाली होती.ह्रदयपिळवटून टाकणाऱ्या अशा अनेक घटना समोर येत होत्या.जुई नावाचं जे गाव होतं,ति थं दरड कोसळली ती गावाला जोडणाऱ्या रस्तावर.त्यामुळं दरड कोसळळ्यावर तीन दिवस त्या गावाचा संपर्क तुटलेला होता. जुईच नव्हे तर अन्य 46 गावांचा दोन-दोन दिवस संपर्क तुटलेला होता.कल्पना करा काय अवस्था झाली असेल तेथील लोकांची. अशी वेळ सत्रूवर येऊ नये असं म्हणतात.ती वेळ आज आंबेगावच्या माळिण गावावर आली.ति थंही बचाव कार्यात अनेक अडथळे येताना दिसतात.माळिणमधील कोणी माहिती सांगण्यासाठी अ जून समोर आलेला नाही.त्यामुळं भिती वाटते.मुख्यमंत्री वगैरे घटनास्थळावर पोहोचले आहेत.नंतर आता अनेक पुढारी येतील.आपल्या दातृत्वाचं प्रदर्शन करणारेही अनेकजण असतात.कोकणात हेच चित्र होतं किंवा 1992च्या किल्लारी भूकंपाच्या वेळेसही हेच दृश्ये मी पाहिलं संकटग्रस्तांना कोरड्या सहानुभुतीची नव्हे मदतीची गरज असते.ती होत नाही.संताप असा येतो की,रायगडमध्ये 2005मध्ये झालेल्या अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही.ज्या सामाजिक संस्थांनी काही गावं दत्त्तक घेतली ति थंलं पुनर्वसन झालं पण दासगावचे दरडग्रस्त आजही पुनर्वसानाच्या प्रतिक्षेत आहेत.त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही.अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून पत्रकारांनी त्यांच्या दुःखाना वाचा फोडली पण उपयोग झालेला नाही.थोडी फार मदत करून सरकार हात वर करते हा अनुभव सर्वत्र येतो.तसाच तो माळिणच्या दरडग्रस्तांनाही येणार यात शंका नाही.
– पुर्वी पुर्वांचलातून किंवा जम्मू काश्मीरमधून दरड कोसळल्याच्या बातम्या येत असतं..हे लोण कोकणात आणि आता थेट घाटावर कसं आलं याचं आत्मपरिक्षण सरकारनं आणि पर्यावरणाचा खेळखंडोबा कऱणाऱ्यांनी केलं पाहिजे..कोकणात 2005मध्ये दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्याचं मुख्य कारण मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड होती असं या विषयातले तज्ज्ञ सांगतात.झाडांची मुळं डोंगराची माती घट्ट धरून ठेवतात.परंतू झाडं तोडल्यानं आणि सततच्या पावसानं ही माती सैल होते आणि ती ढिगारे किंवा दरडीच्या स्वरूपात खाली येतात.या शिवाय मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्यासाठी जे सुरूंग लावले जातात त्याचाही परिणाम डोंगर कमकुवत होण्यात होतो. त्यामुळंही दरडी कोसळत आहेत.ही कारणं सत्य असतील तर सरकार काय उपाययोजना करतंय हा प्रश्न आहे.उन्हाळ्यात कोकणातील डोंगरांना वर्षानुवर्षे वनवे लावले जातात.लाकूड माफिया ही काम बेभोबाट करतात.विजेचा एक खांब जंगलातून न्यायचा असेल तर त्याला विरोध करणारे वन खाते हे वनवे थांबवू शकत नाही.त्यामुळं दरवर्षी लाखो झाडं भस्मसात होत आहेत.हेच प्रमाण कायम राहिलं तर कोकणातील डोंगरं उघडी -बोडखी व्हायला वेळ लागणार नाही. असं झाल्यास दरडी कोसळण्याचा धोक कित्येक पटीनं वाढू शकतो. दुसरीकडं नवी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यत जिकडं तिकडं हितसंबंधियांनी डोंगर कुरतडलेले दिसतात.हे कोणी थांबवू शकत नाही.कारण हे उद्योग कऱणारेच सरकार आहेत.विकासाच्या गोंडस नावाखाली इको सेन्सेटीव्ह झोनला विरोध क रणारेही तेच आहेत.त्यामुळे येत्या काही काळात दरडी कासळण्याच्या घटना वाढणार हे नक्की.निसर्ग आणि सामांन्यांच्या विरोधात सुरू असलेलं हे षडंयंत्र थांबविता येत नाही तर किमान दरडी कोसळण्याचा ज्या गांवांना धोका आहे अशी गावं धोका रेषेच्या बाहेर हलविली गेली पाहिजेत..ते ही होत नाही.रायगड जिल्हयात दरडी कोसळण्याचा धोका असणारे 73 गावं आहेत.या गावांचं तातडीनं प पुनर्वसन करावं अशा शिफारशी तेव्हाच केल्या गेलेल्या आहेत. – मात्र 2005च्या घटनेपासून बोध घेत एकाही गावाचं पुनर्वसन केलं गेलेलं नाही. त्या शिफारशीच्या फाईलवरील धुळ झटकायला कोणाला वेळ नाही.अशा स्थिळीत माळीण सारखी एखादी घटना घडली की नक्राश्रू गाळायचे.दोन दिवस दुःख झाल्याचं नाटक करायचं आणि मग पुन्हा शिफारशींकडं दुर्लक्ष करायचं हा रिवाज आहे.तो जो पर्यत थांबत नाही तोपर्यत अशा घटनाही थांबणार नाही.अशी घटना घडली की,निसर्गाचा प्रकोप आहे आपण काय करू शकतो ? असं म्हणून हात वर करायला राज्यकर्ते मोकळे असतात .निसर्गाकडं बोट दाखविणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे.कारण जे घडतंय त्याला निसर्गापेक्षा माणूसच जास्त जबाबदार आहे हे उत्तराखंडात आणि अन्यत्रही दिसून आलेलं आहे. माळिण या गावाची भौगोलिक परिस्थिती मला माहिती नाही.त्यामुळं तेथील परिस्थितीवर लगेच काही मत व्यक्त करता येणार नाही.पण हे गाव भिमाशंकरच्या पट्ट्यात आहे आणि ति थंही मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली गेलेली आहेत हे मी एकून आहे.त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माळिणवरही डोंगर कोसळण्याचं कारणही कोकणातल्या कारणासारखंच असू शकतं. मी रायगडात भरपूर फिरलेलो असल्यानं गावंनगावं मला माहिती आहेत.ज्या गावांवर दरडी कोसळळ्या तेथील डोंगरावरची झाडं तरी तोडली गेली आहेत किंवा ति थं सुरूंग तरी लावले गेलेेल आहेत.अशा स्थितीत दोष निसर्गाला कसा देता येईल ? निसर्गाला दोष देणारे कोणाला तरी पाठिशी घालत असतात हे नक्की.2005 पुर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याचं आणि एवढी मोठी वित्तहानी आणि जिवित हानी झाल्याचं उदाहरण नाही. 2005 नंतरच असं काय घडलं की ज्यामुळं हे संकट वारंवार येत आहे याचं उत्तर निसर्गाकडं बोट दाखविणाऱ्यंानी दिलं पाहिजे.
.