टाइम्स नाऊवरील Newshour या कार्यक्रमास चांगली टीआरपी आहे.अनेक जण आवडीने आणि न विसरता ही चर्चा बघतात. मी देखील नियमित ही चर्चा पाहतो.विषय चांगले असतात आणि पॅनलवरील वक्तेही महनिय असतात.पण गेली काही दिवस टाइम्स नाऊवरील ही चर्चा टीव्ही वरील चर्चा आहे की,मासळीबाजार आहे असा प्रश्न पडतो. कारण पहिली गोष्ट अर्णब गोस्वामी कोणाला बोलूच देत नाहीत. एक तर लंबाचौडा प्रश्न विचारायचा ,ज्याला आपण प्रश्न विचारतो तो कोणी आरोपी आहे अशी भाषा वापरायची,पॅनलवरील तज्ज्ञ उत्तर देऊ लागला की ,त्याला मध्येच रोखायचे आणि नवा प्रश्न विचारत राहायचे. हा प्रश्न विचारत विचारतच दुसऱ्या जझ्ज्ञाकडे जायचे.या प्रकारामुळे ज्याला प्रश्न विचारलेला असतो तो उत्तरच देऊ शकत नाही.बोलणारांनी आपल्याला जे हवंय तेच बोललं पाहिजे असाही अर्णवचा दंडक असावा. अर्णवच्या मतांनुसार जे बोलतात त्यांना मग वेळही अधिक दिला जातो.काल सानिया मिर्झा यांच्यासंबंधीच्या चर्चेच्या वेळेस अर्णवच्या मतांशी सहमती दाखविणा़ऱ्या शोभा डे यांना अधिक वेळ दिला जात होता . चर्चा चालू असताना हे प्रकर्षाने जाणवत होते.भाजपचे प्रतिनिधी असलेले सुधांशू यांना अर्णव बोलूच देत नव्हते .किरण बेदी यांचीही त्यांनी पहिल्या झटक्यात बोलती बंद केली होती.आपल्या मतांच्या विरोधात कोणी बोलायला लागले की,त्याचा आवाज बंद कऱण्यासाठी अर्णव गोस्वामी आपला आवाज वाढवतात.अर्णवचा आवाज वाढला की,समोरचाही आवाज वाढवायला लागतो.त्याच वेळेस पॅनलवरील इतर तज्ज्ञही बोलत असतात.त्यामुळं कोण काय बोलतंय हेच कळत नाही.आरडा ओरडा कऱण्यातच एक तास निघून जातो.त्यामुळं चर्चेचा अंतिम निष्कर्ष काय हेच कोणाला कळत नाही. वैदिक यांच्या विषयावर तर दोन दिवस चर्चा झाली.पहिल्या दिवशी स्वतः वैदिक चर्चेत सहभागी होते.वैदिक आणि अर्णव यांंनी टीव्हीवरील चर्चेचे सर्वसंकेत पायदळी तुडवत अगदी नळावरच्या भांडणासाऱखे वाद घातले.दोघंही परस्परांबद्दल जी भाषा वापरत होते ती सभ्यतेच्या साऱ्या पातळ्या सोडून होती हे नक्की.वैदिक यांनी एका अतिरेक्याची मुलाखत घेतली हे कदाचित अ्रं्रकर म्हणून तुम्हाला मान्य नसेल पण वैदिक यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना त्याची बाजू माडण्यासाठी पुरेसा वेळ देणं अपेक्षइत असतं पण अर्णव त्यांना बोलूच देत नव्हते आणि ते जे बोलत होते ते सारं सभ्यता सोडून..
.अँकरनं तटस्थपणे चर्चेचे सूत्रसंचलन करावे अशी अपेक्षा असते.बऱ्याचदा अर्णव बायस असतात.असं अनेकदा वाटतं यापेक्षा तर आमचा एबीपीमाझावरचा प्रसन्न जोशी हजारपटीनं चागला ऍन्कर आहे.प्रसन्न जोशी बर्याचदा तटस्थ असतो शिवाय चर्चेतील सर्व वक्त्यांना पुरेसा वेळ देतो,आणि अर्णव सारखा आवाज वाढवायचीही गरज प्रसन्नला पडत नाही.ही चर्चा एकल्यावर आपल्याला काही वैचारिक खाद्य मिळाल्याचं समाधान मिळतं. अर्णवच्या चर्चेतून ते मिळतंच असं नाही.चर्चेचं सूत्रसंचलन करणारांनी कमीत कमी बोलून समोरच्याकडून जास्तीत जास्त काढून घेतलं पाहिजे.( रजत शर्मा यांच्यासारखं ) अनेक ऍकर आपली विद्वत्तता दाखविण्यातच वेळ घालवतात.मग ज्यांना चर्चेसाठी बोलावलेलं असतं त्यांना बोलूच दिलं जात नाही.त्यामुळं चर्चेचा निष्कर्ष काय कळत नाही.चर्चा अर्ध्यावरच संपली असं चर्चा पाहणाऱ्यांना वाटत राहतं.