प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कन्डेय काटजू यांनी आज अक्षरशः बॉम्ब टाकला.त्यानं देशभर खळबळ उडालीय.त्यांच्या बॉम्बचा धमक्याची गुंज लोकसभेतही ऐकू आली.अनेक सद्स्यांनी हा मुद्दा उपस्थित करून कामकाज रोखून धरले.
काटजू यांनी आज टाइम्स ऑफ इंडियात लिहिलेल्या एका लेखात आरोप केला आहे की,युपीए सरकार वाचविण्यासाटी एक भ्रष्ट न्यायाधिशाला प्रमोशन दिलं गेलं.हे भ्रष्टाचारी जज्ज जेव्हा जिल्हा न्यायाधीस होते तेव्हा मद्रास हायकोर्टाच्या अनेक न्यायमूर्तींनी त्या भ्र्रष्टाचारी न्यायमूर्तीच्या विरोधात अभिप्रया दिलेले होते मात्र तत्कालिन चीफ जस्टीसने हे सारे अभिप्राय रद्द केले होते आणि त्यांना ऍडिशन हायकोर्ट जज्ज करण्यात आलं.या न्यायमूर्तींना तामिळनाडूच्या एका मोठ्या नेत्याचा वरदहस्त होता.या न्यायमूर्तींच्या विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आपण भारताचे चीफ जस्टीस लोहाटी यांना पत्र लिहिले होते.नंतर लोहाटी यांना आपल्याला फोन करून आपण केलेले आरोप सत्य असल्याचे ासंगितले होते.परंतू असं असतानाही त्या भ्रष्टाचारी जज्जला मुदतवाढ देत त्यांना ऍडिशनल जज्ज कऱण्यात आलं ते समजल्यावर मला आश्चर्य वाटले.त्या जज्जला प्रमोशन दिलं नाही तर केंद्र सरकारला पाठिंबा देणाऱ्या तामिळनाडूतील एका पक्षानं पाठिंबा काढून सरकार पाडण्याची धमकी दिली होती.असेही न्या.काटजू यांनी लेखात म्हटलंय
उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशावर आरोप करून न्या.काटजू यांनी देशभर खळबळ उडवून दिली आहे.स्वतः न्या.काटजू सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती होते.