रायगड किल्ल्यावरील खुबलढा बुरूजाच्या बाजुने जाताना पाय़ घसरून खोल दरीत पडलेल्या परशूराम नाथा कामथे यांचा काल सायंकाळी दुदैर्वी अंत झाला.कामथे हे कांजूरमार्ग येथील राहणारे होते.
कांजूरमार्ग येथील तरूणांचा एक समुह काल रविवारी वर्षा सहलीसाठी रायगड किल्ल्यावर आला होता.किल्लयाची भटकंती करताना एका निसरड्या जागेवर हा अपघात झाला.अपघातानंतर खोल दरीत पडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरूणांनी खूप प्रयत्न केला.दोन तासानंतर हा मृतदेह काढण्यात तरूणांना यश आले.रात्री महाड तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.मृतदेङाचे शवविच्छेदन केल्यानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांक डे सोपविण्यात आला आहे.