कोकणात साऱ्याच पक्षात अस्वस्थता 

2
1213

कोकणात सध्या जोरदार पाऊस पडतोय.नद्या,नाले दुथडी भरून वाहात आहेत.निसर्गानंही हिरवा शालू परिधान केलेला असल्यानं वातावरण आल्हाददायक आहे.भात लावणी सुरू असल्यानं शेतकरीही आनंदी आहेत. विधानसभा जवळ आल्यानं राजकीय आघाडीवर मात्र गरमा-गरम वातावरणय .कोकणातील साऱ्याच राजकीय  पक्षात अस्वस्थतः आहे.भवितव्याची काळजी आणि अस्तित्वा पुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं बहुतेक राजकीय नेतेही गोंधळून गेले आहेत.इकडून तिकडे पळापळ सुरूय किंवा त्या तयारीत अनेक नेते आहेत. दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.ही सुरूवात आहे.येत्या काळात सिंधुदुर्गपासून रायगडपर्यत अनपेक्षित आणि धक्कादेणारी पक्षांतर अपेक्षित आहेत.त्यामुळं प्रत्येकजण परस्परांकडं संशयानं बघ तोय. य ायी परिणती प्रकरणं हातघाईवर येण्यावर होत आहे. .नितेश राणे यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री झालेली दगडफेक याचं उत्तम उदाहरण आहे.अनेकांना हा ट्रेलर आहे असं वाटतंय .निवडणुका जसजश्या जवळ येतील तस तसे कोकणातील राडे वाढत जातील अशी शक्यता आहे.होणारी पक्षांतरं किंवा या राड्यांना कोणतंही नैतिक अधिष्ठान नाही.लोक कल्याणासाठी हे चाललंय असंही नाही.केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थ हा साऱ्या घटनांमागचा केंद्रबिंदु असल्यानं सामांन्य कोकणी माणून राजकीय गप्पात रस दाखविणारा असला तरी या साऱ्या घटनांकडं तो सध्या तरी तटस्थपणे बघ तो आहे.दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात वाद का आहे? ते लाकोंना माहिती आहे.या वादाला राजकीय संदर्भाबरोबरच आर्थिक हितसंबंधाची देखील एक किनार असल्यानं कोण कुठं आलंय किंवा गेलंय हा सामांन्य कोकणी माणसासाठी फार महत्वाचा विषय राहिलेला  नाही.एक मात्र खरं की,नारायण राणे आणि त्याच्या दोन पुत्रांची अरेरावी आणि दादागिरी सामांन्यांच्या सहनशिलतेच्या बाहेर गेली होती.राणेंना कोणी तरी धडा दाखविला पाहिजे असं साऱ्यांना वाटायचं.दीपक केसरकर आणि त्यांचे सहकारी पुढं आले.त्यांनी राणेंच्या विरोधात आवाज उठविला.लोकांनी त्यांना साथ दिली.राणेंचं लोकसभेत पानिपत झालं.पराभवाच्या या धक्क्यानं राणे अस्वस्थ झाले.आपल्याला मतदारसंघही सांभाळता आला नाही,त्याबद्दल आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्यांनी आपल्या पराभवाचं खापर थेट मुख्यमंत्र्यांवर फोडलं.दिल्लीपर्यत त्यांच्या तक्रारीही केल्या.साध्य काहीच झालं नाही.दोन दिवसात नारायण राणे स्फोट घडवून आणणार अशा बातम्या पेरल्या गेल्या मात्र तो कथित स्फोट आजर्पयत झालेलाच नाही.होणारही नाही.कारण राजकीयदृष्टया त्यांच्यासाठी आता सारेच दरवाजे बंद आहेत.भाजपत त्यांना घ्यायला विरोध आहे,शिवसेनेचा प्रश्नच नाही.राष्ट्रवादीत जाऊन उपयोग नाही.मग जाणार कुठं ? .त्यांची ही राजकीय अगतिकता कोकणात देखील समजली असून सायबाला वर आधार उरला नाही हे स्पष्ट झाल्यानं सिंधुदुर्गातील त्यांचा जनाधारही आता घटू लागला आहे.नारायण राणे  शिवसेनेत मंत्री झाल्यापासून त्यांचा कोकणातील दरारा आणि दहशतही वाढत गेली.सिंधुदुर्गावर तरी अनेक दिवस त्यांचा एकछत्री अंमल होता.नारायण राणे यांची दहशत कशी होती याचा अनुभव त्यांनी शिवसेना सोडून कॉग्रेसमध्य प्रवेश केल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेसअनेक पत्रक ारांना आला .नंतर मुलं जेव्हा राजकारणात  अधिक सक्रीय झाली तेव्हा ही दहशत आणि दादागिरी अधिकच वाढली.लोक नाराय़ण राणे यांना सहन करीत होते मात्र कालंची पोरं थोरा-मोठ्यांचाहीआब ठेवेनासी झाली.त्यातून एक सुप्त विरोधाची लहर कोकणात निर्माण झाली.लोकसभा निकालात त्याचं प्रतिबिंब उमटलं.मात्र या पराभवाची सल ति घाही पितापुत्रांना आहे.त्याचा वचपा विधानसभेत काढायचा या इर्षेने पेटलेल्या राणेंनी मग पुन्हा सिंधुदुर्गात बैठका,मेळावे,भेटीगाठीना सुरूवात केली.कोकणी माणसाला गणपतीला कोकणात जाण्यासाठी गाड्‌य़ा सोडण्याचं एक छोटसं चॉक लेटही दिलं गेलंय. य ा साऱ्यााचा कितपत उपयोग होईल कोण जाणे ?  कारण आता शिवसेनाही तळ कोकणात पुन्हा सशक्त झालीय.नाराय़ण राणे शिवसेनेतून गेले तेव्हा सिंधुदुर्गातील  सेनेची अवस्था पाहवत नव्हती.पोटनिवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली होती.ती त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी नव्हती हे आम्ही डाळ्यांनी अनुभवलेले आहे.मात्र नंतरच्या काळात राणे पितापुत्रांच्या स्वभावामुळं शिवसेनेला बळ मिळालं हे नक्की. त्यामुळं त्यांनी आता दुसऱ्यांच्या नावानं आक्रोश कऱण्याचं कारण नाही.दहशतीच्या बळावर अपेक्षित ते साध्य करून घेण्याचे  दिवस आता राहिले नाहीत .नारायण राणे यांच्या  आजही हे लक्षात येत नाही ,त्याला कोण काय करणार ? – शिवाय जे घडतंय त्याचं बिजारोपण आपणच कोकणात केलेलं होतं हे ही नारायणरावांनी विसरून उपयोग नाही..एक काळ असा होता की,नारायण राणेंची माणसं इतरांच्या गाड्यांवर हल्ले करायचे.आता नारायण राणेंच्या मुलांच्या गाड्यावर हल्ले आणि दगडफेक व्हायली लागली आहे.म्हणजे बदल मोठा झालाय हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. आज कोकणात राणे एकाकी आहेत.कॉग्रेसचे राज्यातील नेते त्यांच्याबरोबर नाहीत,जिल्हयातील कॉगेसची मंडळीही अंतर ठेऊनच आहे.मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने तर लोकसभेतच हिसका दाखविला.दीपक केसरकरांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला भिक न घालता नारायण राणेंच्या विरोधात काम केलं.या कार्यात केवळ केसरकर एकटेच होते अस नाही तर राष्ट्रवादीचे अन्य बहुसंख्य नेतेही त्यांच्याबरोबर होते.याचा अ र्थ असा होता की,तुम्ही मुंबई-दिल्लीत बसून काही करू म्हणत असाल तर स्थानिक पातळीवरचे नेते ते ऐकत नाहीत.दोन्ही पवाराना याची प्रचिती आली.पवारांना राणेंबद्दल प्रेम असण्याचं कारण नव्हतं पण ज्या आघाडीधर्माच्या ते सातत्यानं आणाभाका घेत असतात तो  पाळण्याचा  त्यांचा प्रयत्न होता म्हणे. तोखरंच पाळला गेला की नाही सांगता येणार नाही पण या धडपडीत त्यांच्याच पक्षाची मोठी पडझड झाली. त्याचा फायदा शिवसेनेने उठविला.केसरकरांसारखा महत्वाचा  मोहरा गळाला लागला आहे. – राष्ट्रवादी आणि राणे यांचंही हे मोठं नुकसान आहे. केसरकरांना सेनेत घेण्याला भाजपने विरोध केला आहे.पण भाजपचे फुकाचे उपदेश सेना मानणार नाही.कारण जेव्हा कोणी भाजपमध्ये येते तेव्हा ते सेनेला चालते की नाही याची पर्वा भाजप नेते थोडीच करतात म्हणून शिवसेना भाजपचा मुलाहिजा राखेल.़?  म्हणजे केसरकरांचा एकदा अधिकृत सेनेत प्रवेश झाला की,कोकणातील संघर्ष अधिक धारदार होईल.कारण ही सर्वांसाठीच अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

                    -सुनील तटकरे यांच्या गावातच पक्षात बंडखोरी

तळ कोकणात अशा घडामोडी घडत असताना रत्नागिरी किंवा रायगडात शांतता आहे असं  नाही. सुनील तटकरे यांना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं.कोणी काहीही म्हणत असले तरी राष्ट्रवादी हा केवळ मराठ्यांचा पक्ष नाही हे दाखविण्यासाठी शरद पवारानी ओबीसी तटकरेंना पक्षाध्यक्ष केलंय हे सारेच जाणून आहेत.सुनील तटकरे अध्यक्ष झाल्यानं कोकणात फार खुशीचा माहोल आहे असं नाही.स्वतः भ ास्कर जाधवही आनंदी आहेत असं नाही.उलट जाधव-तटकरे पुन्हा आमने-सामने उभे राहणार असं अलिकडच्या काही घटनांवरून तरी म्हणता येईल. भचस्कर जाधव यांच्यातील कोणते गुण पाहून त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं आणि कोणत्या कारणानं त्यांची उचलबांगडी केली गेली हे स्वतः – शरद पवारही सागू शकणार नाहीत. कदाचित आपण पक्षाचे अनभिषिक्त नेते आहोत हे दाखविण्याचाही त्यामागे पवारांचा उद्देश असावा.भास्कररावाचं अध्यक्षपद काढलं तर त्यांना मंत्री कऱणं आवश्यक होतं. त्यांना लाल दिवा दिला गेला.पण तेवढ्यानं ते समाधानी नाहीत.त्यांना रायगड किंवा रत्नागिरीचं पालकमत्रीपद हवं होतं.सुनील तटकरेंनी ते त्याना मिळू दिलेल नाही.रायगडच्या पालकमंत्रीपदी आपल्या विश्वासातले सहकारी सचिन अहिर यांची वर्णी लावून भास्कररावांच्या महत्वाकांक्षेला सुरूंग लावण्यात तटकरे यशस्वी झालेत..एवढंच नाही तर भास्कररावांना सुनील तटकरेंकडील जलसंपदा मंत्रीपद हवं होतं.तेही तटकरेंनी जमू दिलेलं नाही..भास्कररावांन  तुलनेत कमी महत्वाचं कामगार खातं दिलं गेलं. त्यामुळं लाल दिवा मिळाल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय असं नाही.म्हणजे जाधव तटकरे यंाच्यातील शह-काटशह रायगड आणि रत्नागिरीतही दिसतो आहे. तो तिकिट वाटपाच्या वेळेसही दिसणार आहे.भास्कर जाधव रायगडचे पालकमंत्री झाले असते तर तटक रेंना रायगडात नक्कीच ती डोकेदुखी ठरली असती.ती टाळण्यात तटकरे यशस्वी झालेत.असं असलं तरी ते जिल्हयात अगदीच निर्धास्थ आहेत असं नाही.  नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निमित्तानं त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे.रोहा राष्ट्रवादीतच नगराध्यक्षपदाच्या निमित्तानं बंडखोरी झाली आहे.सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच एक ज्येष्ठ नगरसेवक अहमद द र्जी यांनी अ र्ज दाखल केला आहे.रोह्यात राष्ट्रवादीकडे तेरा आणि युतीकडे चार नगरसेवक आहेत.तेरा पैकी बंडखोर द र्जी यांच्याबरोबर नऊ नगरसेवक असल्याचा त्यांचा दावा आहे..युतीच्या चार नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.म्हणजे तेरा नगरसेवक आज तटकरेंच्या विरोधात आहेत.सुनील तटकरे यांनी काही जादू केली नाही तर रोहा नगरपालिका राष्ट्रवादीकडे राहणार असली तरी ती थं तटकरे कुटुंबियांची सत्ता नसेल.नगरसेवकांचा राग विद्यमान नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांच्यावर आहे.अवधूत तटकरेंचं वागणं निलेश आणि नि तेश राणे यांच्या सारखं आहे असं तेथील नगरसेवक सांगतात.खोपोलीतही राष्ट्रवादीने ज्या दत्ता मसूरकर यांना नगराध्यक्ष करायचं ठरवलं आहे त्यांच्या विरोधात ति थंही बंडखोरी झालेली आहे.18 जुलै रोजी रायगडात नगराध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत.राष्ट्रवादीतील इ तरही काही नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या जिल्हयातच पक्षात सारं अलबेल आहे असं नाही.

 शेकाप फुटीच्या उंंबरठ्यावर 

 सिंधुदुर्गात जी अवस्था नारायण राणे यांची झालीय तशीच अवस्था रायगडात शेकापचे जयंत पाटील यांची झाली आहे.सध्याच्या राजकारणात ते आणि त्यांचा शेकापक्ष एकाकी पडले आहेत.लोकसभेच्या निमित्तानं शेकापनं ज्या चुकीच्या खेळ्या खेळल्या त्यामुळं शिवसेना त्यांच्यापासून दूर गेली.त्याचा फटका शेकापला जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस तसेच विधानसभेच्या वेळेस बसू शकतो.अलिबाग,पेण आणि उरणला शेकापचे आमदार आहेत.या तिन्ही ठिकाणी 2009 साली शिवसेनेची मदत मिळाल्यानेच शेकापला विजय संपादन करता आलेला आहे.2014मध्ये शिवसेना बरोबर नसेल तर शेकापची काही धडगत नाही.शिवसेनेशी युती तोडण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आ.विवेक पाटील आणि आ.धैर्यशील पाटील यांना दिसत होतं.त्यामुळं स्वतंत्र उमेदवार उभा करायला त्यांचा विरोध होता.मात्र सर्वांना गृहित धरण्याची सवय असलेल्या जयंत पाटील यांनी मतदारांनाही गृहित धरत पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांवरच हा नि र्णय़ लादला.त्याचे परिणाम पक्षाला आता भोगावे लागत आहेत.पक्ष नेतृत्वाच्या अशा मनमानीचा उबग बहुसंख्य  कार्यकर्त्यांना आलाय.त्यामुळं 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यानंतर पक्षातील काही मोठे नेते पक्षांतर करतील अशी च र्चा रायगडात आहे.शेकापचे जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती माणगावचे ज्ञानदेव पवार आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेनेत गेले आहेत.बोललं असं जातंय की,ही सुरूवात आहे.येत्या पंधरा वीस दिवसात आणखी काही जण शिवसेेनेत जातील.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शेकापचा एक गट बाहेरपडून त ो बाहेरून शिवसेनेला मदत करील असेही संकेत मिळतात.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार मीनाक्षी पाटील यांनी डॅमेज कंट्रोलची कसरत सुरू केली आहे.त्यानी नुकतीच दिल्ली इ थं जाऊन भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली.भाजपच्या मध्यस्थीतून शिवसेनेबरोबर पुन्हा संबंध प्रस्थापित करता येतात काय याचीही शेकापकडून चाचपणी सुरूय.कारण थेट मातोश्रीवर जायला आता शेकाप नेत्यांना तोंड उरले नाही.कारण विरोधात उमेदवार उभा केला यापेक्षाही जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची मदत घेत शिवसेनेची कोंडी कऱण्याचा प्रयत्न केला याचा मोठा राग उध्दव ठाकरे यांना आहे.त्यामुळं ते शेकापला भिक घालणार नाहीत असेच आजचे चित्र आहे.दुसरीकडं अलिबागची उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पक्षांतर्गतही मोठी खेचाखेची आहे. जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांना उमेदवारी हवी आहे.जयंत पाटील यांचा ओढा आपल्या सुनबाई चित्रलेखा पाटील याच्याकडं आहे.हा विषय सामोपचारानं मिटला नाही तर अलिबागेतही मोठी राजकीय भाऊबंदकी पहायला मिळू शकते.या साऱ्या निराशजनक वातावरणात शेकापला गोठविले गेलेले खटारा हे चिन्ह पुन्हा मिळाले एवढीच काय ती दिलासा देणारी घटना.मात्र खटारा हा जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा आणि अप्रुपाचा  विषय होता.आता पिढी बदलली.शेकापचे नेते आणि कार्यकर्तेही एक एक कोटींच्या गाड्यातून फिरायला लागले आहेत.त्यामुळं त्याना खटाऱ्याचं अप्रुप उरलेलं नाही.हुकुमशाही पध्दतीनं चालणाऱ्या शेकापला खटारा कितपत तारू शकेल हे येत्या दोन-तीन महिन्यातच दिसेल.

 

 

-एस.एम.देशमुख

( हा लेख आपणास  http://www.smdeshmukh.blogspot.in/  येथून कॉपी करता येईल)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here