रायगडमध्ये शेकापला खिंडार

0
1271

शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी एन.डी.पाटील यांना बाजुला सारून पक्षाचा ताबा घेतल्यापासून पक्षाची सातत्यानं अधोगती सुरू झाली आहे.याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात आला.निवडणुकीत पक्षाने कारण नसताना आयात केलेल्या रायगडच्या उमेदवारास आपले डिपॉझिटही वाचविता आलं नाही.मावळमधील उमेदवारही चारीमुंड्या चीत झाला.लोकसभेत शेकापचा बालेकिल्ली असलेल्या अलिबागमध्येही शेकापला जवळपास तीस हजार मतांचा जबरदस्त फटका बसला.कारण नसताना शिवसेनेशी काडीमोड घेत उमेदवार उभा कऱण्याची खेळी ना विवेक पाटील यांना मान्य होती ना धैर्य़शील पाटलांना .ना ज्ञानदेव पवार यांना. मात्र जयंत पाटील यांनी त्यांच्यावर हा निर्णय लादला.त्याचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.
दक्षिण रायगडमध्ये शेकापला तसं कोणी विचारत नाही.तरीही ज्ञानदेव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणगावमध्ये शेकापचे अस्तित्व टिकविले होते.मात्र लोकसभा निवडणुकीत माणगावात शेकापला कमी मतं पडल्याचं खापर शेकाप नेत्यांनी ज्ञानदेव पवार यांच्या माथी फोडले.त्यामुळं गेली काही दिवस ज्ञानदेव पवार अस्वस्थ होते.अखेर पवार यांनी आपल्या संतापाला वाट करून देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.ज्ञानदेव पवार हे जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती आहेत,त्यांच्याबरोबर माणगाव पंचायत समितीचे सदस्य अनिल नवगणे,अलिबागचे उपसभापती संदीप घरत,  महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा अंजली पवार, तळाशेत इंदापूरच्या सरपंच स्वाती नवगणे, उपसरपंच अजित भोनकर, पोटनेरच्या सरपंच सुनंदा पडवळ, उपसरपंच बबन म्हसकर, वावे-दिवाळीच्या उपसरपंच बेबी वाघमारे, धरणाची वाडी सरपंच जाधव, निळजच्या सरपंच जाधव, मुठवलीच्या सरपंच संतोषी भोसले, बामणोली सरपंच संजय वाढवळ, रमेश पारकर्डे, माणगाव विभाग चिटणीस बाबू पाखुर्डे, इंदापूर विभाग अध्यक्ष चिमणभाई मेहता, चिटणीस विश्‍वंभर दांडेकर, शहर अध्यक्ष रोहित म्हस्के, माणगाव खजिनदार विठ्ठल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास पवार, अलिबागचे उपसरपंच नरेश म्हात्रे, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र घरत, जयगणेश मंडळाचे अध्यक्ष रोहिदास वर्तक, महिला प्रमुख ज्योती घरत, असंख्य ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अलिबागपासून माणगाव तालुक्यापर्यंत शेकाप समर्थक गावेच्या गावे शिवसेनेत आली. 

माणगाव मधील शेकापचे पाच सरपंच आणि 600च्या वर कार्यकतर्यानी आज मुंबई येथे उद्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.शेकापला हा फार मोठा धक्का समजला जातो.शेकापचे आणखी काही जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते.शेकापचे काही मोठे नेतेही अस्वस्थ असून तेही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.आज झालेल्या प्रवेशाच्या वेळेस ,सुभाष देसाई महाडचे आमदार भरत गोगावले,बबन पाटील याच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ज्ञानदेव पवारांच्या शिवसेना प्रवेशामुळं माणगावधील शिवसेनेची ताकद वाढणार आहे.ही घटना सुनील तटकरे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे.कारण श्रीवर्धनमधील कॉग्रेसचे बडे पुढारी शिवसेनेत प्रेवश करतील आणि सेना त्यांनाच तिकीट देईल अशीही चर्चा आहे.अगोदर सेनेतच असलेले हे पुढारी जर सेनेत आले नाहीत तर श्रीवर्धनमधून ज्ञानदेव पवार यांना तटकरेंच्या विरोधात लढविण्याची योजना शिवसेना तयार करू शकते.पवार हे कुणबी समाजाचे असल्याने त्यांना मोठा फायदा होईल अशी चर्चा आहे.असं झालं तर ते तटकरेंना मोठं आव्हान ठरणार आहे.
माणगावमध्ये शेकापला कमी मतं पडली त्याचं खापर ज्ञानदेव पवार यांच्यावर फोडणाऱ्या जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये कमी मतं पडली त्याला कोण जबाबदार आहे हे मात्र स्पष्ट केलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here