पाकिस्तानच्या जिअो न्यूज चे लोकप्रिय अॅन्कर हमिद मीर यांनी अखेर पाकिस्तान सोडल्याची बातमी आहे.हमिद मीर यांच्यावर १९ एप्रिल रोजी कराची येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला होता.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.या हलल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा आरोप मीर यांनी केला होता.त्यानंतर पाकिस्तानी लष्कर मीर यांच्या मागे लागले होते.जियो न्यूजला पंधरा दिवसासाठी बंद करण्याचा निणर्य सरकारने घेतला होता.मीर यांच्यावर लष्कराची असलेली वक्रदृष्टीमुळे कोणत्याही क्षणाला काहीही घडू शकते हे लक्षात घेऊन त्यांनी सहपरिवार पाकिस्तानला अलविदा करण्याचा निणर्य घेतला आहे.