इंडिया टीव्हीच्या अ्रंकर तनू शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी आठ दिवसांनी का होईना एक आवाज उटला आहे.तनू शर्माला न्याय मिळवून देण्यासाठी आज दिल्लीच्या नोएडा फिल्म सिटीमध्ये अनेक साथी एकत्र आले.यामध्ये पत्रकार होते आणि स्वयंसेवी संस्थांनचे प्रतिनिधी होते.यावेळी बोलताना अनेकांनी माध्यमातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल संताप आणि चिंता व्यक्त केली.त्यानंतर हे निदर्शने मोर्चात रूपांतरीत झाली.त्यानंतर एसडीएमना एक निवेदन देण्यात आले.त्यात तनू शर्माला न्याय देण्याची आणि आरोपींना शिक्षा कऱण्याची मागणी केली गेली आहे.माध्यमाच्या कार्यालयात महिला पत्रकारांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध लावण्यासाठी काय करता येईल याबाबत या निवेदनात मौलिक सूचना कऱण्यात आल्या आङेत.
तनू शर्मा यांना त्यांच्या कार्यालयात झालेल्या त्रासानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र या घटनेची दखल कोणत्याही माध्यमांनी घेतली नाही.प्रिती झिंटा प्रकरणी तास तास बातम्या दाखविणारे चॅनेल्स तनू प्रकराणी मौन धारण करून आहेत.तरूण तेजपाल प्रकरणाचा पाठपुरावा कऱणाऱ्या माध्यमांना तनूची कौफियत ऐकूच आली नाही.ही शोकांतिका आहे.