सुनील तटकरे कामाला लागले

0
655

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आजपासून महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार असून त्याची सुरूवात नवनिर्मित पालघर जिल्हयापासून होणार आहे.या दौऱ्यात अर्थमंत्री अजित पवार हे सुनील तटकरे यांच्यासमवेत असतील.

आघाडी सरकारने आपल्या काळात अनेक मोठी कामं केली मात्र ती लोकांपर्यत पोहोचविण्यात आम्ही अपयशी ठरलो त्यामुले या दौऱ्याच्या निमित्ताने जनसामांन्यांपर्यत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सुनील तटकरे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून कार्यकर्त्यांना पूर्ण क्षणतेनं आणि ताकदीने उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश कार्यकारिणीत येत्या चार दिवसात फेरबदल कऱण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
कॉग्रेसबरोबरचा एकोपा कायम राखण्याचे स्पष्ट करतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला अधिक जागा द्याव्यात या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here